बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार; अजित पवारांचं अभिवादन

महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Maharashtra Deputy Cm Ajit Pawar Pays Tribute To Balasaheb Thackeray)

बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न पूर्ण करणार; अजित पवारांचं अभिवादन
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 12:05 PM

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, असं सांगतानाच महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Maharashtra Deputy Cm Ajit Pawar Pays Tribute To Balasaheb Thackeray)

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांची कुंचल्याने भंबेरी उडविणारे ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…

LIVE | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन

(Maharashtra Deputy Cm Ajit Pawar Pays Tribute To Balasaheb Thackeray)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.