मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ

मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करु, अशा भावना भुजबळांनी व्यक्त केल्या.

मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 11:27 AM

मुंबई : मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु, असं वचन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलं. बाळासाहेबांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त भुजबळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले होते. (Chhagan Bhujbal pays tribute to Balasaheb Thackeray on his death anniversary)

“बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करु” अशा भावना भुजबळांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या.

“मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांची कुंचल्याने भंबेरी उडविणारे ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला” असे लिहित भुजबळांनी ट्विटरवरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळावर गेले होते. याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत, नेते रामदास कदम, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही स्मृतिस्थळावर दर्शन घेतले.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…

‘असा मोहरा कधी न जाहला’, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राऊतांकडून दंडवत, पवार-खडसेंचीही आदरांजली

(Chhagan Bhujbal pays tribute to Balasaheb Thackeray on his death anniversary)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.