निकालाला 8 दिवस उलटल्यानंतरही सरकार स्थापन होईना, वेट अँड वॉच कायम, आता थेट ‘याच’ दिवशी होणार निर्णय?

महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली आहे.

निकालाला 8 दिवस उलटल्यानंतरही सरकार स्थापन होईना, वेट अँड वॉच कायम, आता थेट 'याच' दिवशी होणार निर्णय?
महायुती
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:28 PM

Maharashtra Government Formation : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत, पण अद्याप सत्तास्थापनेचा तिढा संपलेला नाही. त्यातच आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी अजूनही वेट अँड वॉच करावं लागणार आहे. कारण सत्तास्थापनेचा निर्णय आता थेट सोमवारीच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर

गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थितीत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला. तर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री स्वीकारणार असल्याचे बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे दोन दिवस मूळगावी जाणार

त्यातच आता महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसाठी महायुतीची बैठक लांबली आहे. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील मूळगाव देरे गावात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीत. तसेच आता थेट सोमवारी महायुतीची बैठक होणार आहे.

२ तारखेपासून चांगले मुहूर्त – दीपक केसरकर

यानंतर आता सोमवारी भाजप गटनेत्याची महाराष्ट्रात निवड होईल. ही निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार आहे. यानंतर सत्तास्थापनेची बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे दोन दिवसानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर बैठक होणार आहे. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सध्या चांगला मुहूर्त नाही, येत्या २ तारखेपासून चांगले मुहूर्त आहेत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. यामुळे २ डिसेंबरनंतर नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी होऊ शकतो असे बोललं जात आहे.

'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ.
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री.
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला.
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन.