AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : ‘पुढचे काही दिवस हळूहळू कुठपर्यंत जाणार..’ PM मोदींच्या आवाहनानंतर छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही आवाहनं केली आहेत. त्यामागे अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत. मोदींच्या आवाहनानंतर देशवासियांमध्ये थोडी चलबिचल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आता छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal : 'पुढचे काही दिवस हळूहळू कुठपर्यंत जाणार..' PM मोदींच्या आवाहनानंतर छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रिया
PM Modi-Chhagan BhujbalImage Credit source: PTI / Facebook
| Updated on: May 12, 2026 | 1:31 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना काही महत्वाची आवाहनं केली. एक म्हणजे पेट्रोल-डिझेलचा वापर जपून कार, पुढचं वर्षभर सोनं खरेदी टाळा आणि WFH अशी आवाहनं त्यांनी देशातील जनतेला केली. महत्वाचं म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची आवाहन केली. त्यामुळे देशात वेगवगेळ्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. पुढच्या काही दिवसात ऊर्जा संकट अजून गंभीर होणार का? देशासमोर कुठलं आर्थिक संकट आहे का? अशा वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. विरोधी पक्षांनी लगेच या मुद्यावर सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. सरकारची आर्थिक धोरण फसल्याची टीका सुरु झाली आहे. हे मोदी सरकारच अपयश असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर मंत्री छगन भुजबळ बोलले आहेत. ते राज्य सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.

“आपण इथे सगळ्या देशांचा अभ्यास करुन माहिती घेतली आहे. यापूर्वी कितीतरी पटीने भाववाढ झालेली आहे. पेट्रोल-डिझेल भाववाढ हे सगळं तुम्ही रिपोर्टिंग करत होता. आतापर्यंत जे आहे, आपला देश अजून मजबुतीने उभा आहे, याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी पूर्वी 27 देशांकडून डिझेल घेत होते. आता 40-45 देशांकडून घेतो म्हणून टिकाव धरलेला आहे” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. “तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं चाललं आहे असं निश्चितपणे म्हणता येईल” असं भुजबळ म्हणाले.

‘स्वत:ला सावरणं गरजेचं’

“शेजारच्या पाकिस्तान, बांग्लादेशात काय चाललय, अगदी जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या पेट्रोलियम पदार्थांमुळे. सहाजिकच हे जे काही आहे, पुढचे काही दिवस हळूहळू कुठपर्यंत जाणार. इराण-अमेरिका युद्ध थांबणार की नाही? थांबणार म्हणतात पुन्हा सुरु होतं. अशी डामाडौल परिस्थिती जगामध्ये आहे. संभ्रामावस्था आहे. अशावेळी प्रत्येक देशाने स्वत:ला सावरणं गरजेचं आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ