AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: स्वातंत्र्यापासून एकही मतदान चुकवलं नाही, 115 वर्षीय देवईबाई मुंढेंच्या बोटावर अभिमानाची शाई

Maharashtra Gram Panchayat Elections 2021: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी ग्रामपंचायत निवडणुकीत देवईबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. (Parabhani 115 Years old voter)

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: स्वातंत्र्यापासून एकही मतदान चुकवलं नाही, 115 वर्षीय देवईबाई मुंढेंच्या बोटावर अभिमानाची शाई
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:49 PM
Share

परभणी : निवडणुका म्हणजे जणू लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीच्या उत्सवात अनेक जण उत्साहाने सहभागी होतात. व्याधी, व्यंग, वय यासारख्या प्रतिकूलतेवर मात करत मतदानाचा हक्क बजावणारे ज्येष्ठ नागरिक कायमच नवमतदारांना प्रेरणा देत आले आहेत. परभणीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या 115 वर्षांच्या आजीबाई अशाच प्रकारे सर्वांसाठी आदर्श ठरल्या आहेत. (Parabhani 115 Years old voter Devaibai Mundhe votes for Gram Panchayat Election)

देवईबाई मुंढे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. देवईबाईंना पाहून वय म्हणजे केवळ आकडे असल्याचा प्रत्यय कोणालाही येईल. कारण त्यांचे वय आहे अवघे 115 वर्ष. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी ग्रामपंचायत निवडणुकीत देवईबाईंनी मतदानाचा हक्क बजावला.

स्वातंत्र्यापासून एकही मतदान चुकवलं नाही

विशेष म्हणजे त्या एकही मतदान चुकवत नाहीत. लोकसभेची पहिली निवडणूक ते आताची ग्रामपंचायत निवडणूक… स्वातंत्र्यापासून एकही मतदान त्यांनी चुकवलं नाही. सगळ्या निवडणुकीत त्या हिरीरीने सहभाग घेतात.

कुणाच्याही मदतीविना देवईबाईंचे मतदान

कुणी कितीही प्रलोभन दाखवलं, तरी देवईबाई बळी पडत नाहीत. कौतुकाची बाब म्हणजे वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय मतदान प्रक्रिया पार पडली. त्याहूनही विशेष म्हणजे पुढची निवडणूक कधी आहे, हे विचारायला त्या विसरल्या नाहीत. आजीबाईंचा दांडगा उत्साह पाहून इतर मतदार आणि मतदान अधिकारीही भारावून गेले.

रायगडमध्ये 95 वर्षांचे आजोबा मतदानाला

दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातही शंभरीकडे झुकलेल्या आजोबांनी मतदानाचा हक्क बजावला. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत मतदान केंद्रावर 95 वर्षांचे आजोबा आले होते. आजोबांना नातवाने उचलून घेऊन मतदान केद्रांवर आणले होते.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

दौंडमधील कुसेगावत मतदान प्रकियेला गालबोट, दोन गटातील कार्यकर्ते भिडले

(Parabhani 115 Years old voter Devaibai Mundhe votes for Gram Panchayat Election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.