Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Voting LIVE : महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Latest News and Updates : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारीला मतदान होत आहे.

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Voting LIVE : महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद

| Edited By:

Jan 15, 2021 | 7:00 PM

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Latest News and Updates : महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, 18 जानेवारीला निकाल लागणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज 15 जानेवारीला मतदान पार पडलं. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी  मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Jan 2021 07:00 PM (IST)

  दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झालं

  दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झाले आहे.

  ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप • निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 • आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,776 • एकूण प्रभाग- 46,921 • एकूण जागा- 1,25,709 • प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 • अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 • वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 • मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 • बिनविरोध होणारे उमेदवार- 26,718 • निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

 • 15 Jan 2021 06:04 PM (IST)

  महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान

  महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, 18 जानेवारीला निकाल

 • 15 Jan 2021 05:31 PM (IST)

  गडचिरोली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : पाथरगोटा गावाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

  गडचिरोली :- पाथरगोटा गावाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गावातुन एकही मतदान नाही, मतदान केंद्र फक्त नावापुरते, शासन मात्र अजूनही गावकर्यांच्या प्रश्नावर उदासीन

 • 15 Jan 2021 05:23 PM (IST)

  कल्याण ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates: 90 वर्षीय आजींनी बजावला मतदानाचा हक्क, 

  कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये मतदान सुरू आहे. या मतदाना दरम्यान 90 वर्षीय आजीबाई रामुबाई साळवे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 • 15 Jan 2021 05:08 PM (IST)

  जळगाव ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 4 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

  जळगाव जिल्ह्याची 4 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

  जळगाव 62.89 जामनेर 72.76 धरणगाव 69.42 एरंडोल 65.73 पारोळा 74.68 भुसावळ 56.81 मुक्ताईनगर 69.92 बोदवड 66.46 यावल 65.61 रावेर 73.65 अमळनेर 78.35 चोपडा 67.53 पाचोरा 71.51 भडगाव 64.00 चाळीसगाव 63.18 -----------------------‐‐------ एकूण टक्के 66.47

 • 15 Jan 2021 05:05 PM (IST)

  सांगली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत 3.30 वाजेपर्यंत 68.10 टक्के मतदान पूर्ण

  सांगली - ग्रामपंचायत निवडणूक 3.30 वाजेपर्यंत 68.10 टक्के मतदान, 142 ग्रामपंचायत साठी मतदान होत आहे.

 • 15 Jan 2021 04:40 PM (IST)

  कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीत कार्यकर्ते आपापसात भिडले

  कल्याण : कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींमध्ये खोणी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खोणी गावातील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. मात्र या मतदानादरम्यान खोणी ग्रामपंचायतीतील कार्यकर्ते आपापसात भिडले. कार्यकर्ते आमने सामने आल्याने प्रचंड गोंधळ सुरु झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या ग्रामपंचायतीत महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे.

 • 15 Jan 2021 04:31 PM (IST)

  सोलापूर मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी, मतदारांच्या लांबच लांब रांगा

  सोलापूर : मतदानाच्या शेवटच्या एक तासात चुरशीने मतदान, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे मतदानासाठी मोठी गर्दी, मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

 • 15 Jan 2021 03:47 PM (IST)

  ठाणे जिल्ह्यात दुपारी 1.30 पर्यंत 55.65 टक्के मतदान

  ठाणे जिल्हा ग्रामपंचायत - दुपारी 1.30 पर्यंत जिल्ह्यात 55.65 टक्के मतदान झाले.

 • 15 Jan 2021 03:45 PM (IST)

  जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत 48.34 टक्के मतदान

  जळगाव जिल्ह्यात 3.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

  जळगाव - 45.44 जामनेर - 54.96 धरणगाव - 54.00 एरंडोल - 49.71 पारोळा - 54.68 भुसावळ - 44.90 मुक्ताईनगर - 55.40 बोदवड - 50.35 यावल - 48.25 रावेर - 57.67 अमळनेर - 52.57 चोपडा - 51.44 पाचोरा - 27.54 भडगाव - 47.28 चाळीसगाव - 49.14 ------------------------------- एकूण टक्के 48.34

 • 15 Jan 2021 03:20 PM (IST)

  अहमदनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नेवासामध्ये सर्वाधिक, तर जामखेडमध्ये सर्वात कमी मतदान

  अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, नेवासामध्ये सर्वाधिक मतदान, तर जामखेड मध्ये सर्वात कमी, 11.30 वाजेपर्यंतची‌ मतदान आकडेवारी प्राप्त, नेवासा मध्ये 35.98 टक्के, तर जामखेड मध्ये 21.93 टक्के ‌मतदान, दुपारनंतर मतदानाचा टक्का मात्र वाढला

 • 15 Jan 2021 03:18 PM (IST)

  सोलापूर ठाणे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : मतदानाला काही तास शिल्लक असताना खैराटच्या उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

  सोलापुरात मतदानाला कााही तास शिल्लक असताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू, सायबण्णा बिराजदार असे मृत उमेदवाराचे नाव, गेल्या काही दिवसापासून विजयी होण्यासाठी बिराजदारांनी वार्डातील प्रत्येक घर पिंजून काढले, सकाळ संध्याकाळ होते प्रचारात मग्न, हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने काल खाजगी हॉस्पिटलमध्ये केले होते दाखल, मतदानाच्या दिवशीच उपचारादरम्यान मृत्यू, तालुक्यातील खैराट येथील घटना

 • 15 Jan 2021 03:16 PM (IST)

  उस्मानाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : सर्वाधिक 52.61 टक्के मतदान तुळजापुरात

  उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 1.30 या वेळेत 49.09 टक्के मतदान, जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार मतदारांपैकी 2 लाख 90 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, सर्वाधिक 52.61 टक्के मतदान तुळजापूर तालुका येथे झाले, उस्मानाबाद जिल्ह्यात 382 ग्रामपंचायतमध्ये मतदान होत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ सचिन गिरी यांनी दिली

 • 15 Jan 2021 03:09 PM (IST)

  यवतमाळ ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतदान खोळंबलं

  यवतमाळ यवतमाळ तालुक्यातील अर्जुना गावात मतदानादरम्यान मतदान केंद्र क्रमांक 312 मध्ये वॉर्ड क्रमांक 2 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, झोनल ऑफिसर, केंद्राध्यक्ष कडून मशीन बदलविणे सुरु

 • 15 Jan 2021 03:06 PM (IST)

  वाशिम ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 152 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारपर्यंत 40.88 टक्के मतदान

  वाशिम जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी 7: 30 ते 1:30 दरम्यान 40.88 टक्के मतदान झालं आहे

 • 15 Jan 2021 03:05 PM (IST)

  वर्धा ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : दुपारी दीड वाजेपर्यंत 41.97 टक्के मतदान

  वर्ध्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 41.97 टक्के मतदान, जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीसाठी सुरू आहे मतदान

 • 15 Jan 2021 03:04 PM (IST)

  निफाड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 60 ग्रामपंचायतीत 1.30 वाजेपर्यंत 46.65 मतदान

  निफाड तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीत 1.30 वाजेपर्यंत 46.65 मतदान

  पुरुष - 39,309

  स्त्री - 43,827

  एकूण - 43,186

  टक्के - 46.65

 • 15 Jan 2021 03:02 PM (IST)

  सोलापूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : भोसले-भिंगारे गटात दगडफेक, कार्यकर्ते जखमी

  सोलापुरातील तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी दोन गटात दगडफेक,  भोसले-भिंगारे गटात मतदान केंद्राच्या जवळ दगडफेक, दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल

 • 15 Jan 2021 02:19 PM (IST)

  रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 33.18 टक्के मतदान

  रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 33.18 टक्के मतदान, 360 ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान सुरु आहे , साडे अकरा वाजेपर्यंत 1 लाख 56 हजार 16 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, महिलांपेक्षा पुरुषांची मतदानाची आकडेवारी अधिक

 • 15 Jan 2021 02:04 PM (IST)

  गोंदिया ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 34.34 टक्के मतदान

  गोंदिया जिल्ह्याची 1 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

  गोंदिया - 26.10 टक्के

  तिरोडा - 27.62 टक्के

  गोरेगांव - 28.13 टक्के

  देवरी - 43.11 टक्के

  आमगांव - 40.28 टक्के

  सलेकसा - 38.94 टक्के

  अर्जुनी मोर - 42.41 टक्के

  सडक अर्जुनी - 43.81 टक्के

  एकूण - 34.34 टक्के

  स्त्री - 51, 845

  पुरुष - 56,406

 • 15 Jan 2021 02:01 PM (IST)

  बुलडाणा ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : दुपारी साडे 11 वाजेपर्यंत 28.18 टक्के मतदान

  बुलडाणा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी साडे 11 वाजेपर्यंत 28.18 टक्के मतदान, तर परभणी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 29.79 टक्के मतदान, सातारा जिल्ह्यात 11.30 पर्यंत 33.55 टक्के मतदान

 • 15 Jan 2021 01:49 PM (IST)

  ठाणे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात दुपारपर्यंत 38.86 टक्के मतदान

  ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत 38.86 टक्के मतदान , दुपारी 11:30 वाजेपर्यंत मतदान, ग्रामपंचायतसाठी जिल्ह्यात 38.86 टक्के मतदान झाले आहे

 • 15 Jan 2021 01:47 PM (IST)

  अमरावती ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची तुफान गर्दी

  अमरावती जिल्हा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, अमरावती जिल्ह्यात सकाळी साडे अकरापर्यंत 23.20 टक्के मतदान, दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची तुफान गर्दी

 • 15 Jan 2021 01:36 PM (IST)

  रायगड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात पहिल्या चार तासात 35.12 टक्के मतदान

  रायगड जिल्ह्यात पहिल्या चार तासात 35.12 टक्के मतदान, सकाळी 9.30ते 11.30 पर्यंतची आकडेवारी,

  स्त्रिया - 33.64%

  पुरुष - 36.55%

 • 15 Jan 2021 01:35 PM (IST)

  मुक्ताईनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 47 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 14.36 टक्के मतदान

  मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामीण भागात मतदारांच्या मतदान करण्यासाठी केंद्रांवर दुपारनंतर लागल्‍या लांबच लांब रांगा, मुक्ताईनगर तालुक्यात शांततेच्या मार्गाने मतदान सुरु, 47 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 14.36 टक्के मतदान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांचीही मुक्ताईनगर तालुक्यात भेट

 • 15 Jan 2021 01:30 PM (IST)

  लासलगाव ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : शास्त्रीनगर मतदान केंद्रावर सोशल डिस्टन फज्जा

  निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक शास्त्रीनगर मतदान केंद्रावर सोशल डिस्टन फज्जा, तीन प्रभाग एकाच मतदान केंद्रावर आल्याने मतदारांची मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी, मतदान केंद्रावर अनेक मतदार मास्क विना मतदान करण्यासाठी दाखल,  प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव, ज्येष्ठ नागरिक अपंग नागरिकांची देखील हेळसांड

 • 15 Jan 2021 01:23 PM (IST)

  रायगड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 14.80 टक्के मतदान

  रायगडरायगड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 14.80 टक्के मतदान, सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंतची आकडेवारी, स्त्रिया 12.69 %,  तर पुरुष 16.92% मतदान

 • 15 Jan 2021 01:20 PM (IST)

  सांगली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : लेंगरेवाड़ी गावात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद, गावात तणाव

  सांगली : लेंगरेवाड़ी गावात निवडणूक सुरु असताना भाजप आणि शिवसेना कार्यत्यात जोरदार वाद झाला आहे. भाजप कार्यकर्ते संतोष लेगनरे या तरुणाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे लेंगरेवाडी या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

 • 15 Jan 2021 01:19 PM (IST)

  नाशिक ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नांदगाव तालुक्यात दुपारपर्यंत 27 टक्के मतदान

  नाशिकमधील नांदगाव तालुक्यात दुपारपर्य़ंत 27 टक्के मतदान झाले आहे. नांदगाव तालुक्यात सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी

  पुरुष -13746

  स्रिया -11090

  एकूण -24836

  टक्केवारी -27.66

 • 15 Jan 2021 01:13 PM (IST)

  अमरावती ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates :मंत्री यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

  महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाकरीता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 12 वाजता त्यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्या स्वतः रांगेत उभ्या राहिल्या होत्या. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी मतदारांना केले. यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.

 • 15 Jan 2021 01:00 PM (IST)

  ठाणे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : तालुक्यात 51 जागांसाठी मतदान, 12 वाजेपर्यंत 32 % मतदान

  ठाणे : शहापूर तालुक्यात 5 ग्रामपंचायतीमध्ये 51 जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत येथे 32 % मतदान झाले आहे.

 • 15 Jan 2021 12:55 PM (IST)

  धुळे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 12.54 टक्के मतदान

  धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 12.54 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय.

 • 15 Jan 2021 12:14 PM (IST)

  रत्नागिरी ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

  रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान, मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदातांची रांग, रत्नागिरी जवळच्या मिरजोळे ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर लाईन, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी मतदान केंद्रावर ग्रामिण भागातल्या मतदारांचा ग्रामपंचायतीच्या मतदानाला उत्फुर्त प्रतिसाद

 • 15 Jan 2021 12:07 PM (IST)

  डोंबिवली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : खोणी ग्रामपंचायतमधील उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले

  एका उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले, डोंबिवलीतील खोणी ग्रामपंचायतमधील घटना, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रात्री घडली होती घटना, पैसे वाटणाऱ्या व्यक्तीचे नाव आकाश ठोंबरे, आकाश ठोंबरे याची काकू निवडणुकीच्या रिंगणात

 • 15 Jan 2021 11:37 AM (IST)

  वर्धा ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : पहिल्या दोन तासात 8.15 टक्के मतदान

  वर्ध्यात पहिल्या दोन तासात 8.15 टक्के मतदान, जिल्ह्याच्या 50 ग्रामपंचायतीसाठी मतदान, 206 मतदान केंद्रावर सुरु आहे प्रक्रिया

 • 15 Jan 2021 11:37 AM (IST)

  दौंड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट, दोन गटातील कार्यकर्ते भिडले

  दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट, कुसेगावमधील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले, दोन गटात बाचाबाची, शाब्दिक वादाचे रुपांतर वादात, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज

 • 15 Jan 2021 11:04 AM (IST)

  अकोला ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यातल्या 224 ग्रामपंचायतीत 7.17 टक्के मतदान

  अकोला जिल्ह्यातल्या 224 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 7.17 टक्के

 • 15 Jan 2021 11:02 AM (IST)

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचा हक्क बजावा अण्णांनी केले आव्हान, सदृढ आणि निकोप लोकशाही च्या वाढीसाठी मतदान करणे गरजेचा आहे, म्हणून मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे, यादव बाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी केले मतदान, राळेगणसिद्धी जिल्हा परिषदेच्या प्रधामिक शाळेतील केंद्रावर केले मतदान

 • 15 Jan 2021 11:01 AM (IST)

  मुक्ताईनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : मुक्ताईनगरातील 47 ग्रामपंचायतीत आतापर्यंत 14.60 टक्के मतदान

  मुक्ताईनगर 47 ग्रामपंचायत निवडणूक आतापर्यंत 14.60 टक्के मतदान, मुक्ताईनगर आतापर्यंत झालेले एकूण मतदान 11,140, मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींसाठी मतदान केंद्रांची संख्या 151, निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले कर्मचारी संख्या 755, एकूण मतदार संख्या 76,300

 • 15 Jan 2021 10:33 AM (IST)

  मुक्ताईनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : एकनाथ खडसेंविना रक्षा खडसेंनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला

  परिवार म्हणून आम्ही सोबतच आहे, नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते, एका घरात राहतो, विचार पक्षांना घेवू वेगवेगळे असू शकतात, एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे आज मतदानाचा हक्क गावकऱ्यांसोबत बजावला, एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशानंतर एकनाथ खडसे विना खासदार रक्षा खडसे यांनी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुक साठी मतदानाचा हक्क बजावला

 • 15 Jan 2021 10:27 AM (IST)

  वाशिम ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला

  वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातील काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला, मूळगावी मागुळ झनक इथे ग्रामपंचायत निवडणुकीत रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला

 • 15 Jan 2021 10:19 AM (IST)

  हिंगोली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे अद्याप मतदानाला सुरुवात नाही

  वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे वार्ड क्रमांक एक मध्ये आद्यपही मतदान प्रक्रियेला सुरुवात नाही, ईव्हीएम मशिनवर चिन्ह बदलून आल्याचा आरोप, ग्रामविकास पॅनल प्रमुख बबन होळपादे यांचा आरोप, एकूण 9 जागा होत्या, त्यापैकी 5 जागा बिनविरोध, 4 जागेसाठी मतदान, वार्ड क्रमांक 01 साठी अद्यापही मतदानाला सुरुवात नाही, दोन्ही उमेदवारांचे चिन्ह बदलून आल्याचा आरोप

 • 15 Jan 2021 10:16 AM (IST)

  वाशिम ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 52 ग्रामपंचायतसाठी आज मतदान, चोख पोलीस बंदोबस्त

  वाशिम जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतसाठी आज मतदान, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 96 पोलीस अधिकारी, 983पोलीस कर्मचारी आणि 472 गृहरक्षक दलाचे जवान, आरसीपीचे 02, क्युआरटीचे 01 आणि एसआरपीएफचे 02 असे नियुक्त करण्यात आले आहेत, जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट, जनतेला निर्भीड पणे मतदान करण्याचं आवाहन.

 • 15 Jan 2021 09:55 AM (IST)

  सोलापूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ग्रामपंचायतच्या मतदानासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  सोलापूर ग्रामपंचायतच्या मतदानासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे मतदान करण्यासाठी लागली मोठी रांग, महिलांची सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी

 • 15 Jan 2021 09:55 AM (IST)

  हिंगोली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप, सकाळपासून मतदान प्रक्रिया बंद

  ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप, सकाळपासून मतदान प्रक्रिया बंद, सेनगाव तालुक्यातील बनबरडा येथील वार्ड क्रमांक 01 मधील मतदान प्रक्रिया ठप्प

 • 15 Jan 2021 09:41 AM (IST)

  नांदगाव ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नांदगावात ईव्हीएम मशीन बंद, अद्याप एकही मतदान नाही

  नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रभाग क्र. 3 चे ईव्हीएम मशीन बंद, मतदान प्रकिया ठप्प, आतापर्यंत एकही मतदाराला बजावता आला नाही मतदानाचा हक्क, तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत देखील घडला असाच प्रकार, येथेही ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले

 • 15 Jan 2021 09:35 AM (IST)

  पाचोड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : शिवसेना मंत्री संदीपान भुमरे मतदानासाठी केंद्रावर

  शिवसेना मंत्री संदीपान भुमरे मतदानासाठी केंद्रावर दाखल, पाचोड येथील मतदान केंद्रावर संदीपान भुमरे दाखल, पाचोड ग्रामपंचायत निवडणूक संदीपान भुमरे यांच्यासाठी समजली जाते प्रतिष्ठेची, थोड्याच वेळात संदीपान भुमरे करणार आहेत मतदान

 • 15 Jan 2021 09:20 AM (IST)

  सोलापूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात 590 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु

  सोलापूर जिल्ह्यात 590 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु, 2,325 केंद्रावर मतदान, मतदानासाठी 8530 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अनेक ठिकाणी होत आहे चुरशीने मतदान

 • 15 Jan 2021 09:04 AM (IST)

  औरंगाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कन्नड तालुक्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

  औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान यंत्रात बिघाड, मतदान यंत्र सुरु न झाल्यामुळे मतप्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रासमोर मतदारांच्या लागल्या रांगा, मतदान प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

 • 15 Jan 2021 09:01 AM (IST)

  मुक्ताईनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : खासदार रक्षा खडसेंनी कोथळी गावात मतदानाचा हक्क बजावला

  खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी गावात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशानंतर एकनाथ खडसे विना खासदार रक्षा खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला

 • 15 Jan 2021 09:00 AM (IST)

  पालघर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : पालघर सागावे ग्रामपंचायतीसाठी आतापर्यंत 5 टक्के मतदान

  पालघर येथील सागावे ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, 3 मतदान केंद्रावर मतदान सुरु, कोव्हिडचे नियम पाळून ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया, ग्रामपंचायतीसाठी मतदार सकाळपासून मतदान केंद्रावर, 3 प्रभागातल्या 4 जागांसाठी निवडणूक, 631 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, पुरुष मतदारांपैक्षा महिला मतदारांवर उमेदवारांची मदार, मतदान प्रक्रियेला एक तास पूर्ण, आतापर्यंत 5 % मतदान झाले आहे

 • 15 Jan 2021 09:00 AM (IST)

  उस्मानाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ओमराजे निंबाळकरांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, विना मास्क मतदान

  कोरोनाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विना मास्क केले मतदान, मास्क न घालता साधला मतदारांशी संवाद, गोवर्धनवाडी या मतदान केंद्रावर एकाही अधिकारी-कर्मचाऱ्यानी मास्क घातलेला नाही, लोकप्रतिनिधी कडूनच कोरोना नियमांच उल्लंघन

 • 15 Jan 2021 09:00 AM (IST)

  औरंगाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढली

  ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढली, पाचोड मतदान केंद्रावर वाढली मतदारांची गर्दी, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर उत्स्फूर्त गर्दी, 617 ग्रामपंचायतसाठी पार पडत आहे मतदान प्रक्रिया, 5086 उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात

 • 15 Jan 2021 08:59 AM (IST)

  धुळ्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, एक तासापासून मतदान प्रक्रिया खोळंबली

  धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर गेल्या एक तासापासून मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा, मतदान प्रक्रिया एक तासापासून खोळंबली

 • 15 Jan 2021 08:59 AM (IST)

  कोल्हापूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद

  कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद, प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीएम मशीन पडले बंद, मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार आला लक्षात

 • 15 Jan 2021 08:47 AM (IST)

  कर्जत ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कर्जतमध्ये नातवाने आजीला उचलून मतदान केद्रांत नेले

  कर्जतमधील कडाव ग्रामपचांयत मध्ये 85 वर्षाच्या आजीला नातवाने उचलून नेले मतदान केद्रांत, लिलाबाई सावंत यांना  चालता येत नसल्याने मतदान केद्राबाहेर कार ने आणून मतदान केद्रात उचलून नेल्याने आजीने बजावला मतादानचा हक्क

 • 15 Jan 2021 08:43 AM (IST)

  बारामती ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

  बारामती आमदार रोहित पवार यांचं पिंपळी लिमटेक येथे मतदान, पिंपळी ग्रामपंचायतीसाठी बजावला मतदानाचा हक्क, वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार यांच्या समवेत बजावला मतदानाचा हक्क

 • 15 Jan 2021 08:42 AM (IST)

  कल्याण ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 21 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु

  कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु, तर एक ग्रामपंचायत ही बिनविरोध, या 20 ग्रामपंचायतीत एकूण 82 केंद्र उभारण्यात आले असून 167 जागी मतदान होणार,  या 20 ग्रामपंचायतीसाठी 378 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उतरले असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरस

 • 15 Jan 2021 08:41 AM (IST)

  पुणे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतसाठी मतदान

  पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतसाठी आज निवडणूक, प्रत्यक्षात 11 हजार 07 उमेदवार रिंगणात, जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत

 • 15 Jan 2021 08:40 AM (IST)

  अमरावती ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : अमरावतीच्या घुईखेडमध्ये अपंग वृध्द व्यक्तीने बजावला मतदानाचा हक्क

  राज्यात बऱ्याच ठिकाणी अपंग व्यक्ती मतदानापासून मुकतानाचं चित्र असतं, परंतु अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात या उलटच पहायला मिळाले, अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील विठोबा कीसन मेश्राम हा अपंग वृध्द व्यक्ती सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचला, यानंतर मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या व्हीलचेअरच्या माध्यमातून मतदान कक्षात जाऊन मतदानाचा हक्क बजावला

 • 15 Jan 2021 08:38 AM (IST)

  मनमाड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : अजब कारभार, ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब

  ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब, मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायतीमधील प्रकार, वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवाराचे नाव झाले होते गायब, नाव गायब झाल्याने गोंधळ, वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रिया थांबली, प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरू

 • 15 Jan 2021 08:33 AM (IST)

  रायगड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कडाव ग्रामपचांयतीमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात

  कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या कडाव ग्रामपचांयतीमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात, एकूण 5 मतदान केद्रांवर मतदारांचा उत्साह, कर्जत पोलिसांचा तालुक्यातील 8 ग्रामपचांयतमध्ये कडक बंदोबस्त

 • 15 Jan 2021 08:31 AM (IST)

  गडचिरोली ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 170 ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरुवात

  गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये आज सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात,  जिल्ह्यातील सहा कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यातील 499 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु, मतदारांमध्ये मोठा उत्साह

 • 15 Jan 2021 08:29 AM (IST)

  मुक्ताईनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates :47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान

  मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त, सोशल डिस्टन्सचे नियम पाळून मतदान

 • 15 Jan 2021 08:28 AM (IST)

  उस्मानाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : मतदान केंद्रांवर कोरोना नियमांचे तीनतेरा

  उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीत 5 लाख 97 हजार 291 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, मात्र उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी मतदान केंद्रासह अन्य मतदान केंद्रांवर कोरोना नियमांचे तीनतेरा, मतदान केंद्रावरील कंर्मचारीसह मतदारांनी मास्क घातले नव्हते, सॅनिटायझर आणि इतर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणूक काळात मतदान कर्मचारी आणि उमेदवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही

 • 15 Jan 2021 08:26 AM (IST)

  जळगाव ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

  जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात, जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 154 जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवार रिंगणात

 • 15 Jan 2021 08:24 AM (IST)

  परभणी ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु

  परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु, 1 हजार 573 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी 8 हजार 717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती, कोविडचे नियम पाळून ग्रामिण भागात मतदान, 6 लाख 82 हजार 170 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 • 15 Jan 2021 08:23 AM (IST)

  अकोला ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : बाळापूर मतदान केंद्रातील ईव्हीएम यंत्रात बिघाड

  अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात मतदान सुरु होण्यापूर्वीच गायगाव येथील ईव्हीएम यंत्रात बिघाड

 • 15 Jan 2021 08:22 AM (IST)

  गोंदिया ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : 189 ग्रामपंचायतीकरिता मतदान

  गोंदिया जिल्ह्यात आज 189 ग्रामपंचायतीकरिता मतदान, नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

 • 15 Jan 2021 08:20 AM (IST)

  धुळे ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : धुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु

  धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून उर्वरित 181 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, धुळे जिल्ह्यात 1 हजार 409 जागांसाठी 3 हजार 228 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, जिल्ह्यात 626 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी 3 हजार 128 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 • 15 Jan 2021 08:20 AM (IST)

  अहमदनगर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : अहमदनगरला ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात, नागरिकांमध्ये उत्साह

  अहमदनगरला ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात, 767 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले, सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात, राळेगणसिद्धी त मतदानाला सुरवात

 • 15 Jan 2021 08:19 AM (IST)

  बुलडाणा ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : बुलडाणा जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

  बुलडाणा जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, 527 पैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध, तर एक ग्रामपंचायत निवडणूक स्थगित, मतदारांमध्ये उत्साह

 • 15 Jan 2021 08:19 AM (IST)

  अकोला ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : अकोला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात, थंडीमुळे मतदारांचा ओघ कमी

  अकोला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली असून थंडीमुळे ओघ थोडा कमी आहे, 9 वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढेल

 • 15 Jan 2021 08:19 AM (IST)

  उस्मानाबाद ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

  उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक मतदान करत मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी गाव पातळीवर निवडणूक महत्वाची असते, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन खासदार ओमराजे यांनी केलं

 • 15 Jan 2021 08:18 AM (IST)

  अमरावती ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाला सुरुवात

  अमरावती जिल्ह्यातील होवू घातलेल्या 537 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7:30 वाजता पासून सुरुवात, अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 537 ग्रामपंचायतीमध्ये 4397 जागेकरिता प्रत्यक्ष निवडणूक, तर 13 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहे, अमरावती जिल्ह्यात एकूण 10 लाख 40 हजार मतदार प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजवणार, निवडणूक प्रक्रियेमध्ये 15321 कर्मचारी कार्यरत असून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त मतदान केंद्रवर ठेवण्यात आला आहे, तर 1 हजार अतिरिक्त होमगार्ड कार्यरत असल्याचं प्रशासनाने सांगितलं

 • 15 Jan 2021 08:18 AM (IST)

  वाशिम ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात मतदानाला उत्साहात सुरुवात

  वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात, जिल्ह्यात एकूण 163 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध, तर उर्वरित 152 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात, सकाळी गर्दी जरी कमी दिसत असेल, मात्र हळूहळू गर्दी वाढणार आहे, दरम्यान निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त

 • 15 Jan 2021 08:18 AM (IST)

  नागपूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीमध्ये मतदानाला सुरुवात

  नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीमध्ये मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील 485 मतदान केंद्रावर सुरु झाली मतदानाची प्रक्रिया, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मतदारांचं ॲाक्सीजन आणि तापमानात तपासणी, जिल्ह्यात 485 मतदान केंद्रावर 1455 मतदान अधिकारी कर्मचारी तैनात

 • 15 Jan 2021 08:18 AM (IST)

  रत्नागिरी ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : रत्नागिरीतील 360 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

  रत्नागिरीतील 360 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, 990 मतदान केंद्रावर मतदान सुरु, कोविडचे नियम पाळून ग्रामिण भागात मतदान, ग्रामपंचायतींसाठी मतदार सकाळपासून मतदान केंद्रावर, 915 प्रभागातल्या 2009 जागांसाठी होतेय निवडणूक, 990 मतदान केंद्रावर मतदान सुरु, 4 लाख 59 हजार 121 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, पुरुष मतदारांपैक्षा महिला मतदारांवर उमेदवारांची मदार, महिला मतदार 2 लाख 37 हजार 498, तर पुरुष मतदार 2 लाख 21 हजार 613

 • 15 Jan 2021 08:17 AM (IST)

  नांदेड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नांदेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सकाळपासून मतदारांचा चांगला प्रतिसाद

  नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत, ग्रामीण भागातील उत्साह सकाळपासून दिसून येतोय

 • 15 Jan 2021 08:17 AM (IST)

  नाशिक ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नाशिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात

  नाशिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात, सकाळच्या सुमारास मतदानाला चांगला प्रतिसाद, पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडते आहे मतदान प्रक्रिया, अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक

 • 15 Jan 2021 08:17 AM (IST)

  कोल्हापूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कोल्हापूर जिल्ह्यात 386 ग्रामपंचायतींसाठी मतदान, थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात

  कोल्हापूर जिल्ह्यात 386 ग्रामपंचायतींसाठी मतदान, थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात, बहुतांशी गावात तिरंगी लढती, पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदानासाठी पॅनल प्रमुखांचे प्रयत्न, जिल्ह्यात साडेसात हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 • 15 Jan 2021 08:16 AM (IST)

  कल्याण ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : कल्याण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये मतदान, एक ग्रामपंचायत बिनविरोध

  कल्याण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये मतदान, एक ग्रामपंचायत बिनविरोध, एकूण 82 केंद्रांवर 167 जागी मतदान, 378 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 • 15 Jan 2021 08:16 AM (IST)

  उरण ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : उरण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीत 70 जागांवर मतदान

  उरण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, 6 ग्रामपंचायतीत 70 जागांवर मतदान, तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, वेशवी, फुंडे या 6 ग्रामपंचायत, एकूण 166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, बहुतांश ठिकाणी भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये खरी लढत, एकूण 43 मतदान केंद्रावर होणार मतदान, एकूण 31 हजार 301 मतदार यापैकी 15 हजार 615 पुरुष, तर 15 हजर 688 महिला, 25 प्रभाग आणि 70 उमेदवार, ग्रामपंचायतींसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससह, मास्कसह अधिकारी वर्गाला देण्यात आल्या इतर आवश्यक सूचना

 • 15 Jan 2021 08:16 AM (IST)

  नागपूर ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

  नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, जिल्ह्यातील 485 मतदान केंद्रावर मतदान, एकूण 1015 उमेदवारांमध्ये लढत, जिल्ह्यात 485 मतदान केंद्रावर 1455 मतदान अधिकारी कर्मचारी, 127 ग्रामपंचायतीच्या 431 प्रभागापैकी 411 प्रभागात मतदान, 1196 एकूण जागांपैकी 1086 जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान

 • 15 Jan 2021 08:16 AM (IST)

  अकोला ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : अकोला जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1,741 जागांसाठी मतदान

  अकोला जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 हजार 741 जागांसाठी आज मतदान, त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील 224 ग्रामपंचायतींच्या 2 हजार 70 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे, तर निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये 2 हजार 395 महिला उमेदवार असून, 2 हजार 16 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे

 • 15 Jan 2021 08:15 AM (IST)

  रायगड ग्रामपंचायत मतदान 2021 Latest Updates : रायगडमध्ये 78 ग्रामपचांयती मधील 299 मतदान केद्रांवर मतदान

  रायगडमध्ये आज 78 ग्रामपचांयती मधील 299 मतदान केद्रांवर मतदान होणार, 1,77,383 मतदार, 612 जागांसाठी 1,588 उमेदवार निवडणुक रिगंणात, तर जिल्ह्यात तीन ठिकाणी नामनिर्देशन प्राप्त न झालान्ये किवां उमेदवार अपात्र ठरल्याने जागा रिक्त,

 • 15 Jan 2021 07:39 AM (IST)

  मनमाडच्या नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायत निवडणुकीत 5 ग्रामपंचायत बिनविरोध

  मनमाडच्या नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायत निवडणुकीत 5 ग्रामपंचायत बिनविरोध, 54 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, 386 जागांसाठी 877 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 182 मतदान केंद्रावर 89 हजार 796 मतदार बाजाणावर मतदानाचा हक्क, थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात

 • 15 Jan 2021 07:22 AM (IST)

  नाशकात 621 ग्रामपंचायतीच्या 5,895 जागांसाठी थोड्याच वेळात मतदान

  नाशिक जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीच्या 5,895 जागांसाठी थोड्याच वेळात मतदान, 1,627 जागा अविरोध, तर लिलाव प्रकरणामुळे उमराणेची निवडणूक यापूर्वीच रद्द, 1,1056 उमेदवार रिंगणात, 1,952 मतदान केंद्रांची व्यवस्था, 389 अधिकारी तर 9,760 कर्मचारी तैनात, तर जिल्हाभरात 44 केंद्र संवेदनशील, तर 8 केंद्र अतिसंवेदनशील, 12 लाख 84 हजार मतदार नोंदवणार आपलं मत, तर कोरोना संशयित असलेल्या रुग्णांना शेवटच्या अर्धा तासात मतदानाची व्यवस्था

 • 15 Jan 2021 07:22 AM (IST)

  पनवेल तालुक्यात आज 186 जागांसाठी मतदान, 390 उमेदवार रिंगणात

  पनवेल तालुक्यात आज 186 जागांसाठी मतदान, 390 उमेदवार रिंगणात; 94 केंद्रावर मतदान, 750 पोलीस बंदोबस्तासाठी त्यापैकी 600 पुरुष पोलीस तर 150 महिला पोलीस, तालुक्यात एकूण 55 हजार 279 एकूण मतदार ; 26 हजार 91 महिला, तर 29 हजार 205 पुरुष 6 मतदार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग करुनच मतदान केंद्रात प्रवेश, पनवेल शहरातील व्ही के हायस्कुल मध्ये 18 तारखेला पार पडणार मतमोजणी, नवडणुकीआधीच खनावले आणि आकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध

  ग्रामपंचायत निवडणूक: 24

  एकूण प्रभाग: 84

  निवडणुकीच्या रिंगणात एकूण उमेदवार : 390

  महिला उमेदवार : 155

  एकूण मतदार केंद्र: 94

  निवडणूक अधिकारी संख्या: 100

  कर्मचारी संख्या : 500

 • 15 Jan 2021 06:59 AM (IST)

  भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींमधील 466 सदस्य निवडीकरीता आज मतदान

  भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींमधील 466 सदस्य निवडीकरीता आज मतदान, 175 प्रभागातून 466 सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यासाठी 1,082 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 30 प्रभागातील 105 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत

 • 15 Jan 2021 06:47 AM (IST)

  मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

  मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, मुक्ताईनगर तालुक्यात 51 ग्रामपंचायत, त्यापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध, 47 ग्रामपंचायत साठी आज मतदान, तालुक्यात 734 उमेदवार रिंगणात उभे, आज मतदार राजा ठरविल याचं भवितव्य

 • 15 Jan 2021 06:36 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, केंद्रांवर तयारी पूर्ण

  औरंगाबाद जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात, मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड मतदान केंद्र मतदारांसाठी सज्ज

 • 15 Jan 2021 06:33 AM (IST)

  अहमदनगरमध्ये आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग

  अहमदनगरमध्ये आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग, मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडले, सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने पकडले, 10 लाख रुपयांची इनोव्हाकार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त, महिलांसह 4 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें