AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा एकत्र मोर्चा, मामा चंद्रकांत वैद्य यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहभागाने हा मोर्चा आणखी बळकट होणार आहे. मामा चंद्रकांत वैद्य यांनी या एकत्रित मोर्चाबद्दल आनंद व्यक्त केला.

हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा एकत्र मोर्चा, मामा चंद्रकांत वैद्य यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
raj thackeray uddhav thackeray chandrakant vaidya
| Updated on: Jun 27, 2025 | 12:11 PM
Share

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारत मोर्चा काढण्याची घोषणा केली. येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेची युतीच्या दिशेने सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत. यामुळे सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातील मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र सहभागी होणार असल्याची माहिती मिळताच टीव्ही ९ मराठीने त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबद्दलची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मी मामा म्हणून फक्त ते दोघे जण एकत्र येण्याचे स्वप्न बघत होतो आणि ते लवकरच पूर्ण होईल, असे चंद्रकांत वैद्य म्हणाले.

दोघेही एक एक पाऊल पुढे

“हा प्रश्न तुम्ही त्या दोघांनाच विचारलेला बरा आहे. आजच्या घडीला मराठी माणसासाठी आणि मराठीच्या मुद्द्यावर ते दोघे एकत्र येतात, हीच एक चांगली घटना आहे. त्या दृष्टीने सकारात्मक पावलं पडतात हे एक देवाच्या कृपेने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी चांगली घटना आहे. मी बोलणी करणार कोणीही नाही. त्यांचे नेते आणि ह्यांचे नेते असतात, त्यांच्या बोलणी होतात. मी मामा म्हणून फक्त ते दोघे जण एकत्र येण्याचे स्वप्न बघत होतो आणि ते लवकरच पूर्ण होईल, अशी मला पूर्ण खात्री आहे. आज ते दोघेही एक एक पाऊल पुढे आलेले आहेत, पुढे एक एक हात पुढे येऊन एकत्र येतील असं मला वाटतं”, असे चंद्रकांत वैद्य यांनी सांगितले.

पुढची पावलं नक्कीच सकारात्मक

“सल्ला देण्याएवढं ते दोघेही लहान नाहीत. ते मॅच्युअर आहेत. सल्ला देण्यापेक्षा त्या दोघांना चांगली जाण आहे. यापुढची पावलं नक्कीच सकारात्मक असतील, अशी आपण तुळजाभवानी चरणी प्रार्थना करुया. ती नक्कीच या गोष्टीला यश देतील. मी एक मामा म्हणून एवढंच सांगेन की वेळ आणि तारखेबद्दल दोघांना सहमती मिळाली, ही एक शुभ गोष्ट आहे. यामुळे चांगली गोष्ट घडण्याची वेळ जवळ आलीय, असं वाटतंय. चित्र किती बदलेल आणि किती नाही हे मी आताच सांगू शकत नाही. मी राजकीय अभ्यासक नाही. पण एकच आहे की मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून सर्वांना बळ मिळेल. मराठी माणसाला जोर येईल. आपल्या मागे कोणीतरी उभं राहिलंय, याची एक मनोमन खात्री होईल. त्यानंतर नक्कीच मराठी माणसाला बळ मिळेल”, असेही त्यांनी म्हटले.

मला नक्कीच आनंद होईल

“एक मराठी माणूस म्हणून मी नक्कीच एकत्र येईल. मामा म्हणून ते एकत्र आलेले पाहताना मला नक्कीच आनंद होईल. आदित्य आणि अमित अजून लहान आहेत. त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतलाय. तेही या गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून बघतील”, असेही चंद्रकांत वैद्य यांनी सांगितले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.