Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 12, 2022 | 12:04 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज रविवार, 11 डिसेंबर 2022. आज समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या लोकार्पण सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना काय बोलतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शनिवारी संध्याकाळी उमटले होते. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली. आजही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या प्रश्नावरील अपडेट्सही जाणून घेणार आहोत. तसंच मुंबई लोकलच्या मेगाब्लॉकसह महत्त्वाच्या शहरातील आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Dec 2022 11:33 PM (IST)

    पुण्यातील रिक्षाचालक उद्या पुन्हा जाणार संपावर

    पुणे : 

    पुण्यातील रिक्षाचालक उद्या पुन्हा जाणार संपावर

    अल्टिमेटम देऊन देखील मागण्या मान्य न झाल्याने उद्या पुन्हा करणार आंदोलन

    28 नोव्हेंबरला प्रशासनाने शब्द दिल्यानंतर आंदोलन घेण्यात आले होते मागे

    परंतु प्रशासनाने शब्द न पाळल्याने सव्वा लाख रिक्षा उद्या RTOमध्ये जमा करणार असल्याची संघटनेने दिली माहिती

    उद्या सकाळी 11 वाजता पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक पुणे RTOला घालणार घेराव

  • 11 Dec 2022 09:21 PM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर बस उलटली, अनेक विद्यार्थी जखमी

    रायगड :

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात खाजगी आराम बस पलटी.

    मावळ येथील वेट न जॉय या थीम पार्क मध्ये चेंबूर येथून गेली होती सहल.

    क्लासेस ची ट्रिप गेली होती एकूण 48 विध्यार्थी होते.

    जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील सरकारी व खाजगी रुग्णालयात केले दाखल..

    खोपोली पोलीस, IRB यंत्रणा, अपघात ग्रस्तच्या मदतीसाठी ची टिम मदत कार्यात.

    एकूण जखमी विद्यार्थांचा आकडा मात्र कळू शकाल नाही..

  • 11 Dec 2022 09:08 PM (IST)

    कायदेतज्ज्ञ असीम सरोदे शाईफेक प्रकरणात केस लढायला तयार

    कायदेतज्ज्ञ असीम सरोदे शाईफेक प्रकरणात केस लढायला तयार

    या प्रकरणात 307 चं कलम लावण्यात आलंय ते चुकीचं आहे

    पोलिसांवर दबाव आणून हे करायला लावलं आहे असं दिसतंय

    यामध्ये प्रकरण अतिरंजित करण्याचा प्रयत्न केला जातोय

    मात्र जेव्हा हे प्रकरण कोर्टात जाईल तेव्हा ही केस कमजोर होईल

    ज्या प्रमाणात इजा तशीच कलमं लावली गेली पाहिजे

    पण जबाबदार व्यक्तींनी योग्य बोललं पाहिजे

    पोलिसांच निलंबन ही सुद्धा चुकीचं आहे

    त्यांनीही कायदेशीर मदत मागितली तर करू

    असीम सरोदे यांची भूमिका

  • 11 Dec 2022 07:27 PM (IST)

    धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी

    नवी दिल्ली :

    धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी

    उद्या दुपारी तीन वाजता होणार सुनावणी

    ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता

    सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात होणार सुनावणी

    ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब उपस्थित राहणार

  • 11 Dec 2022 01:22 PM (IST)

    पंतप्रधान मोदी नागपूरहून गोव्यासाठी रवाना

  • 11 Dec 2022 12:10 PM (IST)

    स्कूल बस आणि एसटी बसचा सामोरासमोर अपघात

    परभणी : स्कूल बस आणि एसटी बसचा सामोरासमोर अपघात, अपघातात 20 पेक्षा अधिक जखमी, गंगाखेड -राणीसावरगाव दरम्यान अपघात, संत जनाबाई विद्यालय गंगाखेड येथील स्कूल बस विद्यार्थ्याना घेऊन चाकूर येथे ट्रिपला जाताना अपघात

  • 11 Dec 2022 11:20 AM (IST)

    पंतप्रधानांचा ताफा नागपूच्या एम्स रुग्णालयात दाखल 

    आरोग्य सेवांचे होणार लोकार्पण

    लोकार्पणानंतर देशाला करणार संबंधित

    नागपूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण
  • 11 Dec 2022 11:03 AM (IST)

    वायफळ टोल नाक्यावरून एम्स रुग्णालयाकडे पंतप्रधानांचा ताफा रवाना 

    एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे करणार लोकार्पण
    एम्स रुग्णालयातून पंतप्रधान करणार देशाला संबोधित
  • 11 Dec 2022 10:58 AM (IST)

    नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच उद्घाटन

    नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच्या पहिल्या फेजच उद्घाटन. महाराष्ट्राचे राज्यपाल बीएस कोशयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित.

  • 11 Dec 2022 10:56 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली

    ढोलताशा पथकाला केले अभिवादन

  • 11 Dec 2022 10:52 AM (IST)

    पंप्रधानांचा ताफा वायफाळ टोल नाक्यावर दाखल 

    समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांनी केला 10 कि.मीचा प्रवास

    समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार

    लेझीम पथकाकडून मोदींचे स्वागत

  • 11 Dec 2022 10:45 AM (IST)

    मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव

    जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा हायव्होल्टेज लढतीत दिमाखदार विजय

  • 11 Dec 2022 10:43 AM (IST)

    उद्या, परवा रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

    रत्नागिरी : हवामान बदलाचा काजू आणि आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता, उद्या आणि परवा रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

  • 11 Dec 2022 10:35 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथे सभास्थानी रवाना 

    पंतप्रधान नागपूर येथून करणार देशाला संबंधित

    नागपूरच्या एम्स रुग्णालयात आरोग्य सुविधांचे करणार लोकार्पण

    2017 मध्ये याच एम्स रुग्णालयाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली होते

  • 11 Dec 2022 10:29 AM (IST)

    भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

    नाशिक : नाशिकच्या जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अपघाताची संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद, 9 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली अपघाताची घटना, श्रीकांत विजय साबळे असे मृत दुचाकी चालकाचे नाव, अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार

  • 11 Dec 2022 10:16 AM (IST)

    मेट्रोला पंतप्रधांनी दिला ग्रीन सिग्नल

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण

    खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर  मेट्रो धावणार

    पंतप्रधानांनी केला मेट्रोने प्रवास

    भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • 11 Dec 2022 10:10 AM (IST)

    नागपूरच्या फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनवर पंतप्रधानांचा ताफा दाखल 

    नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित
    पंतप्रधान करू शकतात मेट्रोने प्रवास
    पंतप्रधानांच्या नागपूरदौऱ्याचा दुसरा कार्यक्रम
  • 11 Dec 2022 10:03 AM (IST)

    नागपूर रेल्वेस्थानकाहून पंतप्रधान मेट्रो स्टेशनकडे रवाना

    नागपूर मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पाचे होणार लोकार्पण

    नागपूरच्या फ्रिडम पार्क स्टेशनकडे पंतप्रधान मोदी रवाना
    नागपूर मेट्रोच्या प्रकल 2 ची देखाली होणार पायाभरणी
  • 11 Dec 2022 09:57 AM (IST)

    नागपुरात वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखविला

    वंदे भारत एक्सप्रेस प्रवासासाठी सज्ज

    नागपूरहून बिलासपूरसाठी रेल्वे रवाना

  • 11 Dec 2022 09:51 AM (IST)

    पंतप्रधानांचा ताफा नागपूर रेल्वे स्थानकात दाखल

    नागपुरात पंतप्रधान मोदी यांचे आगमन

    राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

    वंदे भारत एक्सप्रेस प्रवासासाठी सज्ज

  • 11 Dec 2022 09:42 AM (IST)

    Video : मोदी आज नागपुरात, स्वातगासाठी जय्यत तयारी

    नागपूर : नागपूर मधील तेजस्विनी ग्रुपच्या शेकडो महिला करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत, मोदी आज नागपुरात, समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यासोबत वंदे भारत ट्रेनलाही दाखवणार हिरवा झेंडा

    पाहा व्हिडीओ :

  • 11 Dec 2022 09:16 AM (IST)

    अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण स्टेरॉईडच्या विळख्यात

    कोल्हापूर : अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण स्टेरॉईडच्या विळख्यात, भरती प्रक्रियेसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहात स्टेरॉईड इंजेक्शनचा खच, दोन दिवसांपूर्वी ओव्हर डोसमुळे तरुण बेशुद्ध पडल्याची माहिती

  • 11 Dec 2022 08:55 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकी नंतर 8 पोलीस कर्मचारी आणि 3 अधिकारी निलंबित

    पिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली

    आता या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पडलेत

    या घटनेनंतर 8 पोलीस कर्मचारी आणि 3 अधिकारी निलंबित करण्यात आलेत

    चोख बंदोबस्त असताना ही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या 2 साथीदारांना शाई फेकण्यात यश आलं

    या घटनेनंतर अखेर 11 पोलीस निलंबित करण्यात आलेत

  • 11 Dec 2022 08:44 AM (IST)

    जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : मतमोजणी सुरु

    जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजपा आमदार संजय सावकारे एससी मतदार संघातून विजयी, तर एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलने खातं उघडलं ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे विजयी

  • 11 Dec 2022 08:29 AM (IST)

    बस खाली चिरडून एक जण जागीच ठार

    पुणे : येरवड्यात पीएमपीएल बस खाली चिरडून एक जण जागीच ठार, शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना, सादल बाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर घडला अपघात

  • 11 Dec 2022 08:08 AM (IST)

    जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत कुणाची बाजी?

    जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, काल झालं होतं दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान, सहकार पॅनल विरुद्ध शेतकर पॅनल सामना

  • 11 Dec 2022 07:38 AM (IST)

    पुणे विभागात नोव्हेंबर महिन्यात मोठी वीजचोरी

    पुणे विभागात नोव्हेंबर महिन्यात मोठी वीजचोरी

    महावितरण विभागानं आणली उघडकीस

    जवळपास 3 कोटी 56 लाख रुपयांची प्रकरण उघडकीस आणली आहेत

    महावितरणच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे

    वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई होत असल्यानं वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत

  • 11 Dec 2022 07:30 AM (IST)

    राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

    पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मँन दौस चक्रीवादळामुळे राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे, 11 , 12 आणि 13 डिसेंबरला पावसाची शक्यता, दक्षिणेतील अनेक राज्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Published On - Dec 11,2022 7:29 AM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.