Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

भीमराव गवळी, Tv9 मराठी

भीमराव गवळी, Tv9 मराठी | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Nov 14, 2022 | 7:35 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking News
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आज रविवार, 13 नोव्हेंबर 2022. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर आव्हाड यांनी विरोधकांवर टीका करतानाच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. शिंदे गटाचे नेते आमदार सुहास कांदे यांची नाराजी. पदाधिकारी नियुक्त्यावंर व्यक्त केली नाराजी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोलीत पोहोचली आहे. या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या जाणून घेण्यार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 13 Nov 2022 08:50 PM (IST)

  तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट

  Marathi News LIVE Update

  तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट

  या बॉम्बस्फोटात 4 लोकांचा मृत्यू

  तर अनेक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त

  वर्दळीच्या ठिकाणी हल्लेखोरांनी केला बॉम्बस्फोट

 • 13 Nov 2022 07:51 PM (IST)

  मुकेश अंबानींची इंग्लंडमध्ये नवी इनिंग

  Marathi News LIVE Update

  मुकेश अंबानींची इंग्लंडमध्ये नवी इनिंग

  प्रसिद्ध फुटबाल क्लब Liverpool ताब्यात घेण्यासाठी तयारी

  लिव्हरपूलच्या मालकीसाठी अंबानींनी कंबर कसली

  हा क्लब 381 अरब रुपये किंमतीला विक्रीचा प्रस्ताव

  अनेक जण क्लब खरेदी करण्यासाठी इच्छूक

 • 13 Nov 2022 06:34 PM (IST)

  खाद्यतेलाची लवकरच स्वस्ताई

  Marathi News LIVE Update

  खाद्यतेलाची लवकरच स्वस्ताई, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

  गेल्या आठवड्याच्या शेवटी बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण

  आयात पाम, पामतेलाच्या किंमतीत झाली घसरण

  डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचा परिणाम

  सूर्यफूल, सोयाबीन, तीळ तेलबियांचा बाजारात तुटवडा

 • 13 Nov 2022 06:31 PM (IST)

  वाय जंक्शन पुलावरुन शिंदे-आव्हांडामध्ये श्रेयवाद

  Marathi News LIVE Update

  वाय जंक्शन पुलावरुन शिंदे-आव्हांडामध्ये श्रेयवाद

  श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हांडामध्ये वाकयुद्ध

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच दोघांमध्ये वाकयुद्ध

  पुलावरुन श्रेयवादाची लढाई

 • 13 Nov 2022 05:47 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा पुलांचं लोकार्पण

  Marathi News LIVE Update

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा पुलांचं लोकार्पण

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर

  या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी सूटण्याचा दावा

  ठाणेकरांना मिळणार दिलासा -शिंदे

 • 13 Nov 2022 05:33 PM (IST)

  उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर स्फोट, 13 दिवसापूर्वीच झाले होते उद्घाटन

  उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर स्फोट

  13 दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

  स्फोटामुळे ट्रॅकच झाला उद्धवस्त

  मार्गावरील अनेक रेल्वे रुळांना तडे

 • 13 Nov 2022 04:42 PM (IST)

  कळवा पूलाचा खर्च आव्हाडांनी वैयक्तिक केला नाही

  Marathi News LIVE Update

  कळवा पूलाचा खर्च आव्हाडांनी वैयक्तिक केला नाही

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हाडांच्या टिकेला उत्तर

  पुलाचा खर्च महानगरपालिकेने केल्याचे केले स्पष्ट

  कळवा पूलाचा श्रेयवाद रंगला

 • 13 Nov 2022 04:25 PM (IST)

  अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार

  बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय

  पनवेलमधील पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात वाद

  फडके गटाने पाटील गटावर केला अंदाधुंद गोळीबार

  15  ते 20 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती

  अंबरनाथ MIDC तील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना

  शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल

  राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी दाखल

 • 13 Nov 2022 04:11 PM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रंगत वाढणार

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रंगत वाढणार

  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचा उद्या उद्घाटन समारंभ

  विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन

  भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसस ,शिवसेना असा होणार थेट सामना

  सावित्रीबाई फुले प्रगती पँनल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं पँनल

  भाजपाच्या विद्यापीठ विकास मंच भाजपाचं पँनल

  विद्यापीठ निवडणूकीही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी , शिवसेना सामना

 • 13 Nov 2022 04:09 PM (IST)

  शहाजीबापू पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी आखली नवी रणनिती

  शहाजीबापू पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी आखली नवी रणनिती

  लक्ष्मण हाकेंकडे दिली शिवसेना उद्ध् बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी

  जबाबदारी मिळताचं हाकेंनी शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात थोपटले दंड

  शहाजीबापू पाटील यांना पुढच्या विधानसभेला पराभूत करणार

  तानाजी सावंत , अनिल बाबर यांना पराभूत करणार

  शिंदे गटातील गद्दार आमदारांना बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतल्याशिवाय चालत नाही

  भाजपही राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या करिष्म्यावर उभा राहिला

  गद्दारी कोणी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे

  ऊसतोड कामगाराच्या मुलाला ठाकरेंनी प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार

  लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

 • 13 Nov 2022 03:51 PM (IST)

  ब्लू टिकची सेवा पुन्हा सुरु होणार

  Marathi News LIVE Update

  ब्लू टिकची सेवा पुन्हा सुरु होणार

  पुढील आठवड्याच्या शेवटी ही सेवा सुरु होण्याची शक्यता

  एलॉन मस्कने केले सेवा सुरु करण्यासंबंधीचे ट्विट

  बनावट खाते उघडल्याने ब्लू टिकची सशुल्क सेवा केली होती खंडीत

 • 13 Nov 2022 03:48 PM (IST)

  भाजप युवा मोर्चा नेते प्रवीण नेत्तरू हत्येप्रकरणी 15वा आरोपी अटकेत

  भाजप युवा मोर्चा नेते प्रवीण नेत्तरू हत्या प्रकरण

  कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एनआयएने राबवली शोधमोहीम

  हत्या प्रकरणातील 15 व्या आरोपीला अटक

 • 13 Nov 2022 03:29 PM (IST)

  संजय राऊत यांच्या 63 व्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशनची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू

  संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भांडुप आणि कांजूर गावात उत्साहाचं वातावरण

  राज्यातील अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि नेते संजय राऊत यांची भेट घेणार

  पहाटे 6 वाजल्यापासून संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी पक्षातील सर्व नेते आणि पदाधिकारी घेणार संजय राऊत यांची भेट...

  त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून सरकार आणि योद्धा नावाचे दोन स्पेशल केक तयार

  63 किलोचा केक तयार केला जाणार असल्याची माहीती

  वाढदिवसाच्या दिवशी संजय राऊत हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची घेणार भेट

  सामना ऑफिसमध्येही होणार ग्रॅंड सेलिब्रेशन

 • 13 Nov 2022 03:28 PM (IST)

  विम्यांचा दाव्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक नाही

  Marathi News LIVE Update

  विम्यांचा दाव्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक नाही

  कोणतीही विमा कंपनी केवळ पीयूसी प्रमाणपत्राअभावी विम्याचा दावा नाकारु शकत नाही

  मात्र नवीन विमा खरेदी करताना पीयूषी प्रमाणपत्र आवश्यक आहे

  विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याविषयीचे निर्देश दिलेले आहेत

 • 13 Nov 2022 02:29 PM (IST)

  MCD निवडणूक: तिकीट न मिळालेल्या AAP नेत्याचा हायव्होल्टेज ड्रामा

  MCD निवडणूक: तिकीट न मिळालेल्या AAP नेत्याचा हायव्होल्टेज ड्रामा

  पूर्व दिल्लीतील गांधीनगर मतदारसंघाचे 'आप'चे माजी नगरसेवक हसीब-उल-हसन चढले टॉवरवर

  "पक्षाने तिकिटही दिलं नाही, कागदपत्रंही ठेवली", हसीब-उल-हसन यांचा आरोप

 • 13 Nov 2022 01:38 PM (IST)

  मोबाईल फोनवर अचानक राहुल गांधींचा आवाज ऐकू येऊ लागल्याने महाराष्ट्रातील अनेकांना आश्चर्याचा धक्का

  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा महाराष्ट्रातही प्रचार

  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आवाजातील संदेशाच्या ध्वनिफितीचा मोबाईल फोनवर प्रसार

  राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत आहेत व्यस्त

  मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांची अनुपस्थित जाणवू नये यासाठी काँग्रेस धुरिणींनी लढवली शक्कल

 • 13 Nov 2022 01:36 PM (IST)

  नवी मुंबईत शिंदे गटाला धक्का, राष्ट्रवादीतून शिंदे गटात गेलेले तालुकाध्यक्ष पुन्हा राष्ट्रवादीत

  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पाच तालुकाअध्यक्ष गेले होते शिंदे गटात

  आज पुन्हा त्यातील दोन तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीत आले आहेत

  त्यामुळे राष्ट्रवादीचे ताकद वाढली आहे

  काही शिंदे गटाचे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे ते देखील लवकरच येतील असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी व्यक्त केलंय

  नियाज शेख व अरुण कांबळे यांची परत घरवापसी

 • 13 Nov 2022 01:29 PM (IST)

  मुंबई- धोबीघाट परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण

  मुंबई- धोबीघाट परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण

  मारहाणीप्रकरणी एका व्यक्तीला अटक

  झोपी गेलेल्या वृद्ध महिलेची बॅग चोरण्याचा आरोपीकडून प्रयत्न

  महिलेला जाग येताच केली बेदम मारहाण

  मुंबई पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल

 • 13 Nov 2022 01:11 PM (IST)

  PAK vs ENG T20 WC Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने जिंकला टॉस

  पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्नच्या स्टेडियममध्ये हा फायनल सामना खेळला जाणार आहे. वाचा सविस्तर...

 • 13 Nov 2022 01:01 PM (IST)

  रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट

  डिव्हाईन कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट

  स्फोटामध्ये पाच कामगार भाजल्याची माहिती

  कामगारांना चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं

 • 13 Nov 2022 12:39 PM (IST)

  चेन्नई, तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू

  चेन्नई, तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू

  शहरात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस

  भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज

 • 13 Nov 2022 12:18 PM (IST)

  PAK vs ENG T20 WC Final: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड आज वर्ल्ड कप फायनल होणार नाही?

  आज T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना रंगणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन टीम्स फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. फायनल का होणार नाही, वाचा सविस्तर....

 • 13 Nov 2022 12:04 PM (IST)

  कोल्हापूरची अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

  कोल्हापूरची अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

  मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथं डंपरने दिली होती धडक

  तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवनं केलं होतं काम

  कल्याणीने अलिकडेच हालोंडी फाटा इथं नव्याने सुरू केलं होतं हॉटेल

  मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने दिली धडक

 • 13 Nov 2022 11:48 AM (IST)

  राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ: चंद्रशेखर बावनकुळे

  राहुल गांधी यात्रेत स्वतः असताना कार्यकर्ते पक्ष कां सोडत आहे हा चिंतनाचा विषय आहे.

  काँगेस नेत्यांनीच यात्रा हायजॅक केलीय, यात्रेत सर्वसामान्य कार्यकर्ते फार कमी दिसत आहेत

  यात्रेची फलश्रुती काही दिसत नाही

  काँगेस-राष्ट्रवादीत मोठी निराशा आहे, ते सत्तेशीवाय राहू शकत नाहीत

  2024मध्ये राष्ट्रवादीमधील असंतोषाची मोठी यादी समोर येईल

  काँगेस-राष्ट्रवादी साठी आगामी काळात लोकसभा, विधानसभासाठी उमेदवार भेटणार नाहीत

  गजानन कीर्तिकर सारखे निष्ठावंत सोडून जात असतील तर यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करायला हवा

 • 13 Nov 2022 11:10 AM (IST)

  हर हर महादेव चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शकांना आता 7 दिवसांची मुदत

  हर हर महादेव चित्रपटाच्या लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकाला वकिलांमार्फत नोटीस

  संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी दिलेली नोटीस निर्माता दिग्दर्शकांना मिळाली

  वकिल विकास शिंदे यांच्या मार्फत देण्यात आली नोटीस

  नोटीसीद्वारे घेण्यात आलेल्या आक्षेपांवर उत्तर देण्याची मागणी

  उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली,

  7 दिवसांत उत्तर दिलं नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करणार

 • 13 Nov 2022 10:39 AM (IST)

  पुण्यात चोरट्याने केली चक्क श्वानाची चोरी

  पुण्यातील कॅम्प परिसरातील घटना

  पुण्यातील कॅम्प परिसरातून एका भुरट्याच चोराने सायबेरियन हस्की प्रजातीच्या कुत्र्याला पळवून नेलं

  याप्रकरणी आता पोलिसात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे

  28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोराने मेसी नावाच्या श्वानाची केली चोरी

  ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

 • 13 Nov 2022 10:05 AM (IST)

  उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदी प्रा.लक्ष्मण हाके यांची नियुक्ती

  उद्वव ठाकरे यांनी केली प्रा. लक्ष्मण हाके यांची नियुक्ती

  सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात हाके यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी

  प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याने प्रा. लक्ष्मण हाके यांना मिळालं बळ

 • 13 Nov 2022 10:01 AM (IST)

  म्हाडा भरती पेपर फुटी आणि TET घोटाळा बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

  राज्यात गाजलेल्या अनेक प्रकरणाचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

  पुणे पोलीस दलातील अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर बदली

  आरोग्य भरती घोटाळा म्हाडा भरती पेपर फुटी आणि टीईटी घोटाळा बाहेर काढणाऱ्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूरला बदली

  निरोप देताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी झाले भावूक

  फुलांचा वर्षाव करत महिला पोलीस अधिकाऱ्याला निरोप

 • 13 Nov 2022 09:53 AM (IST)

  भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

  खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला

  राजन पाटील आणि धनंजय महाडिक गटात लढत

  निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास- महाडिक

 • 13 Nov 2022 09:36 AM (IST)

  एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर येण्याची शक्यता

  कळवा खाडीवरच्या पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात दोघांनाही निमंत्रण

  अटक नाट्यानंतर दोघे एकत्र येणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण

 • 13 Nov 2022 09:25 AM (IST)

  पुणे आर्थिक गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आदेश

  शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरु

  आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख तपास अधिकारी

  वजीर शेख यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घ्यावा

  प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडून करण्यात यावी

 • 13 Nov 2022 09:19 AM (IST)

  पुण्यातून बँकॉकसाठी स्पाईसजेट कंपनीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

  कालपासून बँकॉक विमानसेवेला झाली सुरुवात

  दर मंगळवार, शनिवारी आणि रविवारी असणारी सेवा उपलब्ध

  केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं उद्घाटन

  पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम लवकरच पूर्ण करणार सिंधिया यांची माहिती

  कार्गो एअरपोर्ट डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार

 • 13 Nov 2022 09:16 AM (IST)

  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं मोठं विधान

  महाविकास आघाडीच्या सरकारमुळे हे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले

  गेलेल्या प्रकल्पापेक्षा जास्त रोजगार महाराष्ट्राला मिळेल

  काळा तलावाचे सुशोभीकरण महिन्याभरात पूर्ण होणार

  अद्ययावत काळा तलाव नववर्ष भेट ठरणार

 • 13 Nov 2022 09:13 AM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच मिळणार पूर्णवेळ कुलगुरू

  कुलगुरू निवड शोध समितीनं जाहिरात केली प्रसिद्ध

  महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विद्यापीठ कायद्यातील बदल राज्यपालांनी न स्विकारल्यानं कुलगुरू निवड प्रक्रीया लांबणीवर पडली होती

  आता कुलगुरू निवड शोध समिती स्थापन केल्यानंतर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

  कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांचा या समितीत समावेश आहे

 • 13 Nov 2022 09:11 AM (IST)

  ऊसतोड कामगारांसाठी आनंदाची बातमी

  ज्या गावात काम तिथंच मिळणार महिन्याचं रेशन

  कार्ड पोर्टेबिलीटीची सुविधा केली जाणार उपलब्ध

  राज्यात 10 लाख ऊसतोड कामगार आहेत

  गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांनाच मिळणार सुविधा

  समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांची माहिती ...

 • 13 Nov 2022 09:09 AM (IST)

  नवी मुंबईतील चौघांचे भांडण, एकाचा मृत्यू; दोघे कोमात

  नवी मुंबईतील घणसोली सेक्टर 4 मध्ये नशा करणाऱ्या तीन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला

  अन्य दोघे कोमात गेले.

  पोलीस घटनास्थळी पोहोचले दाखल

  पुढील तपास तपास चालू आहे

Published On - Nov 13,2022 9:06 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI