Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 01, 2022 | 7:34 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज बुधवार, 30 नोव्हेंबर 2022. सुप्रीम कोर्टात आज दोन महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहेत. बेळगाव सीमाप्रश्नासोबत आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत सुनावणी होईल. या सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेणार आहोत. शिवाय राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता कोकण दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दुसरीकडे पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला.. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींसह श्रद्धा हत्याप्रकरणी आज नेमके काय खुलासे होतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, उद्या आरोपी आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट होणार आहे. या घडामोडींवरही आज दिवसभर आपली नजर असेल. महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी, ताज्या अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूजचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Nov 2022 08:58 PM (IST)

    प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची होणार लाडू तुला

    पुणे :

    उद्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची होणार लाडू तुला

    अपंग मंत्रालय सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे करणार कार्यक्रम

    लाडू तुला करून फुलांची उधळण केली जाणार

    अपंग आयुक्त कार्यालयात होणार कार्यक्रम

    प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन

  • 30 Nov 2022 04:59 PM (IST)

    सोन्यावरील उत्पन्न आता ठरणार कर पात्र?

    Marathi News LIVE Update

    सोन्यावरील उत्पन्न आता ठरणार कर पात्र?

    केंद्र सरकार कर लावण्याच्या तयारीत

    सोन्यावरील उत्पन्नावर कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच विचार

    आगामी अर्थसंकल्पात होऊ शकते तरतूद

  • 30 Nov 2022 01:26 PM (IST)

    ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबं

    धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद, एक महिला सदस्यासह 7 जणांना अटक

  • 30 Nov 2022 01:06 PM (IST)

    हिंगोलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन सुरू

    शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू

    शहरातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात

    महावितरणच्या गेटवर पोलीस बंदोबस्त

  • 30 Nov 2022 12:45 PM (IST)

    मंगलप्रभात लोढा यांचं विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, मंगलप्रभात लोढा यांचं विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • 30 Nov 2022 12:31 PM (IST)

    औरंगाबादेत राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन

    औरंगाबादेत राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन

    आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

    सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 30 Nov 2022 12:18 PM (IST)

    महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले

    सोलापूर जिल्ह्यातील 18 ते 20 गावे कर्नाटकात जाण्यास उत्सुक

    जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी घेतला निर्णय

    बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असोच्या घोषणा, अक्कलकोट तालुक्यातील तडवळ तालुक्यात ग्रामस्थ एकवटले

    रोड, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने घेतला निर्णय

  • 30 Nov 2022 11:08 AM (IST)

    बीड देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

    एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई

    धस यांच्यासह पाच जणांवर अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल, आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

    2019 मध्ये देवस्थानची जमीन बळकाविल्याचा धस यांच्यावर ठपका

  • 30 Nov 2022 10:17 AM (IST)

    उदयनराजे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात बैठक

    आज मराठा संघटना प्रतिनिधी आणि शिवप्रेमींची बैठक

    बैठकीत 3 डिसेंबरच्या रायगडावरील कार्यक्रमाच्या नियोजनावर होणार चर्चा

    सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरुवात

  • 30 Nov 2022 10:09 AM (IST)

    मालवणात पाच खलाशांसह मासेमारी नौका बेपत्ता

    सिंधुदुर्ग : मालवणात पाच खलाशांसह मासेमारी नौका बेपत्ता, सिंधुदुर्गात खळबळ, सोमवारी मध्यरात्री पासून मालवण तळाशील समुद्रातून नौका खलाशांसह गायब, नौकेची सिग्नल यंत्रणा बंद होऊन झाली बेपत्ता झाल्याचा संशय

  • 30 Nov 2022 09:49 AM (IST)

    नागपूरच्या मेडीकल कॅालेजमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग

    रॅगिंग करणाऱ्या सहा जणांची इंटर्नशिप रद्द, वसतिगृहातूनही बाहेर काढलं

    नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीचा तातडीचा निर्णय

    रॅंगिंग करणाऱ्या सहा जणांविरोधात लवकरंच पोलीसांत तक्रार दाखल होणार

    रॅगिंग करत एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मारली झापड

  • 30 Nov 2022 09:48 AM (IST)

    टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

    टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

    वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

    टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं

  • 30 Nov 2022 09:44 AM (IST)

    औरंगाबादेत रिक्षाचालकांनी संप पुकारला

    औरंगाबादेत रिक्षाचालकांनी संप पुकारला

    उद्या दिवसभरासाठी संप पुकारला

    रिक्षा चालकांच्या संपत 15 संघटना सहभागी

    रिक्षा मीटरच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात संप

  • 30 Nov 2022 09:33 AM (IST)

    येत्या 4 तारखेला शिंदे गटाचा मेळावा

    पुणे : येत्या 4 तारखेला शिंदे गटाचा मेळावा, मेळाव्यात सगळ्याच पक्षातून लोक शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भागगिरेंचा दावा, खासदार श्नीकांत शिंदे ,नरेश मस्के , शिवाजी आढळराव पाटलांच्या उपस्थितीत होणार मेळावा

  • 30 Nov 2022 09:30 AM (IST)

    शिवप्रताप दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रतापगडासाठी रवाना 

    प्रताप गडावर सोहळ्यासाठी शिवप्रेमींची गर्दी

    पालखी सोहळ्याला सुरवात

    अफजल खानच्या कबरीची सुरक्षा वाढविली

  • 30 Nov 2022 08:50 AM (IST)

    पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताची मालिका सुरुच..

    ट्रक आणि पिकअपचा अपघात

    पिकअपमधील 7 जण जखमी.

    जखमीना ससून रुग्णालयात केलं दाखल

  • 30 Nov 2022 07:37 AM (IST)

    मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात

    खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरताना तीन ते चार वाहनांचा अपघात, एक ठार, तर 100 फूट खाली पडलेल्या कंटेनर केबिन मध्ये अडकलेल्या चालकाला वाचावीण्याचे प्रयत्न सुरु, एका कंटेनरसह आणखी एका ट्रकची चालक कॅबिन दरीत कोसळली

  • 30 Nov 2022 07:30 AM (IST)

    सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

    मुंबई : सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित, राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून आदेश जारी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही सुरू असल्याने तणाव टाळण्यासाठी निवडणुका लांबणीवर

  • 30 Nov 2022 07:27 AM (IST)

    बैलगाडी शर्यती बाबत आजही सुनावणी

    नवी दिल्ली : तामिळनाडू मधील जलीकट्टू आणि महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यती बाबत आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Published On - Nov 30,2022 7:25 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.