AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळलात तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू राहील. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे ५०% मर्यादा ओलांडलेल्या या संस्थांचे निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील.

विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळलात तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा
maharashtra election
| Updated on: Nov 28, 2025 | 2:22 PM
Share

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेली ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या ५७ संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने काय म्हटलं?

ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका थांबवण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही मागणी स्पष्टपणे फेटाळली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील. कोणीही ती थांबवू शकणार नाही, असे कोर्टाने यावेळी स्पष्टपणे सांगितले. यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिली असली तरी ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींचा समावेश असलेल्या एकूण ५७ संस्थांच्या निकालाबाबत मोठी अट घातली आहे. ज्या ५७ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे, त्यांचा निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे. याचाच अर्थ, या ठिकाणी उमेदवार जरी विजयी झाले तरी कोर्टाकडून अंतिम निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील. त्यामुळे या ५७ संस्थांच्या विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला तरी त्यांचा अंतिम फैसला २१ जानेवारीच्या सुनावणीनंतरच होणार आहे.

निवडणुकांना परवानगी देताना आणखी एक मोठी अट

दरम्यान, न्यायालयाने निवडणुकांना परवानगी देताना आणखी एक मोठी अट घातली आहे. यापुढे जाहीर होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता कामा नये. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल, पण या निवडणुका घेताना आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांहून अधिक नसावी, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ जानेवारी रोजी होणार आहे. म्हणजेच, ५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर, त्या निकालांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...