AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक जाहीर होताच उत्तर भारतीय सेनेने मातोश्रीबाहेर लावले वादग्रस्त बॅनर, त्यावर लिहिलय की…

महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने वादग्रस्त बॅनर लावला आहे.

निवडणूक जाहीर होताच उत्तर भारतीय सेनेने मातोश्रीबाहेर लावले वादग्रस्त बॅनर, त्यावर लिहिलय की...
| Updated on: Nov 05, 2025 | 9:02 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या २ डिसेंबरला यासाठी मतदान होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक

महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, शिवाजी पार्क, मातोश्री, शिवतीर्थ आणि शिवसेना भवन या ठिकाणी झळकत असलेल्या एका बॅनरमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या बॅनरवर सावधान असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा मजकूर यात पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना आणि त्यांचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.

उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे, असा या बॅनरमागील उद्देश असल्याचे बोललं जात आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात फूट पाडणाऱ्यांविरुद्ध हा इशारा असल्याचेही बोललं जात आहे. राज्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, निवडणुकीच्या काळात या घोषणांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

दरम्यान उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तसेच न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र आता या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...