ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दारूड्यांची उतरणार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, यासोबतच आचारसंहिता देखील लागू झाली आहे, या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्व निवडणुका या एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, याबाबत निवडणूक आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.
आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्यांच्या व्यवहारावर लक्ष असणार आहे. व्हेकल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं निवडणूक आयोगानं यावेळी म्हटलं आहे, निवडणूक काळामध्ये मद्यविक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते, या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभाग आणि पोलिसांची यावर करडी नजर असणार आहे, कुठेही अनुउचित प्रकार आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान विरोधकांकडून वारंवार मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा विरोधकांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली होती, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत निवडणूका घेऊ नये, अशी विरोधकांची भूमिका आहे, यावर देखील यावेळी निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आलं आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटलं. त्यांनी मागणी केली त्यानुषंगाने आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी मागवली. पण त्यावर अद्याप काही रिप्लाय आलेला नाहीये, दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदारयादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
