AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तळपायाची आग मस्तकात गेली, …अन् राज ठाकरे प्रचंड संतापले, निवडणूक जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

तळपायाची आग मस्तकात गेली, ...अन् राज ठाकरे प्रचंड संतापले, निवडणूक जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 6:28 PM
Share

आज अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील  246  नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहेत, तर तीन डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून सुरू आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ मिटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे.

आज देखील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली होती, त्यावेळी देखील विरोधकांनी आपली ही भूमिका कायम ठेवत, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर देखील निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर आपली पोस्ट शेअर केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

‘आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.  हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.  दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन’ असं या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.