AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2025 : प्रतिक्षा संपली, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, वाचा A to Z माहिती

अखेर आता प्रतिक्षा संपली आहे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात आज निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली, या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Election 2025 : प्रतिक्षा संपली, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर,  वाचा A to Z माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 5:45 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

राज्यात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 246  नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 246  नगर परिषदेमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे तर  42 नगर पंचायतींमध्ये 15 नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. एकूण  6 हजार 859  सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.

 महत्वाच्या तारखा

* नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025

* नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025

* नामनिर्देशन पत्राची छाननी- 18 नोव्हेंबर 2025

* अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर माघारीची अंतिम मुदत- 21 नोव्हेंबर 2025

* अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025

* मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025

* मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025

एकूण मतदार व मतदान केंद्र

* पुरुष मतदार- 53,79,931 * महिला मतदार- 53,22,870

* इतर मतदार- 775

* एकूण मतदार- 1,07,03,576

* एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355

एकूण जागा आणि आरक्षित जागा

* निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा- 246

* निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- 42

* एकूण प्रभाग- 3,820

* एकूण जागा- 6,859

* महिलांसाठी जागा- 3,492

* अनुसूचित जातींसाठी जागा- 895

* अनुसूचित जमातींसाठी जागा- 338

* नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 1,821

नगरपररषद/ नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या  

पालघर- 4 रायगड- 10 रत्नागिरी- 7 सिंधुदुर्ग- 4 ठाणे- 2 कोकण विभाग एकूण- 27

अहिल्या नगर- 12 धुळे- 4 जळगाव- 18 नंदूरबार- 4 नाशिक- 11 नाशिक विभाग एकूण- 49

कोल्हापूर- 13 पुणे- 17 सांगली- 8 सातारा- 10 सोलापूर- 12 पुणे विभाग एकूण- 60

छत्रपती संभाजीनगर- 7 बीड- 6 धाराशिव- 8 हिंगोली- 3 जालना- 3 लातूर- 5 नांदेड- 13 परभणी- 7 छत्रपती संभाजीनगर एकूण- 52

अमरावती- 12 अकोला- 6 बुलढाणा- 11 वाशीम- 5 यवतमाळ- 11 अमरावती विभाग एकूण- 45

भुंडारा- 4 चंद्रपूर- 11 गडचिरोली- 3 गोंदिया- 4 नागपूर- 27 वर्धा- 6 नागपूर विभाग एकूण- 55

दरम्यान आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्याेच्या व्यवहारावर लक्ष आहे. व्हेकल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

FAQ :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५

१. महाराष्ट्रातील २०२५ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी जाहीर झाल्या?

निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या.

२. या निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारच्या स्थानिक संस्थांचा समावेश आहे?

निवडणुका २४६ नगरपरिषदा (म्युनिसिपल कौन्सिल) आणि ४२ नगरपंचायती (ग्रामपंचायत) साठी आहेत, यात १० नवीन नगरपरिषदा आणि १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या घोषणेत नाहीत.

३. एकूण किती जागा आणि वॉर्ड्ससाठी निवडणूक होणार आहे?

एकूण ३,८२० वॉर्ड्स असून ६,८५९ जागा उपलब्ध आहेत, यात २८८ अध्यक्षपदांचा समावेश आहे.

४. निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक काय आहे?

अधिसूचना आणि नामनिर्देशन अर्ज भरणे: १० ते १७ नोव्हेंबर २०२५.

नामनिर्देशन छाननी: १८ नोव्हेंबर २०२५. माघार घेण्याची मुदत: २१ नोव्हेंबर २०२५ (अपील नसलेल्या मतदारसंघांसाठी); २५ नोव्हेंबर २०२५ (अपील असलेल्यांसाठी). मतदान दिवस: २ डिसेंबर २०२५. मतमोजणी दिवस: ३ डिसेंबर २०२५.

५. एकूण किती मतदार आहेत आणि किती मतदान केंद्रे असतील?

एकूण मतदार १,०७,०३,५७६ आहेत – पुरुष: ५३,७९,९३१, महिला: ५३,२२,८७०, इतर: ७७५. सुमारे १३,३५५ मतदान केंद्रे उभी केली जातील.

६. मतदान कोणत्या पद्धतीने होईल?

सर्व निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) द्वारे होतील.

७. जागांसाठी आरक्षण आहे का?

हो:महिला: ३,४९२ जागा. अनुसूचित जाती: ८९५ जागा. अनुसूचित जमाती: ३३८ जागा. मागासवर्गीय: १,८२१ जागा.

८. जिल्हानिहाय स्थानिक संस्थांची वाटणी कशी आहे?

कोकण विभाग: २७ (पालघर: ४, रायगड: १०, रत्नागिरी: ७, सिंधुदुर्ग: ४, ठाणे: २). नाशिक विभाग: ४९ (अहिल्यानगर: १२, धुळे: ४, जळगाव: १८, नंदुरबार: ४, नाशिक: ११). पुणे विभाग: ६० (कोल्हापूर: १३, पुणे: १७, सांगली: ८, सातारा: १०, सोलापूर: १२). छत्रपती संभाजीनगर विभाग: ५२ (छत्रपती संभाजीनगर: ७, बीड: ६, धाराशिव: ८, हिंगोली: ३, जालना: ३, लातूर: ५, नांदेड: १३, परभणी: ७). अमरावती विभाग: ४५ (अमरावती: १२, अकोला: ६, बुलढाणा: ११, वाशिम: ५, यवतमाळ: ११). नागपूर विभाग: ५५ (भंडारा: ४, चंद्रपूर: ११, गडचिरोली: ३, गोंदिया: ४, नागपूर: २७, वर्धा: ६).

९. राजकीय वाद किंवा चिंता कोणत्या उठवल्या गेल्या?

विरोधी पक्ष (MVA आणि MNS) यांनी मतदार यादीतील अनियमितता, निष्काळजीपणा आणि पक्षपाताचा आरोप करून निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. भाजप नेत्यांनी “वोट जिहाद” आणि डुप्लिकेट मतदारांचा दावा केला आहे. इतर वादांमध्ये भाषा वाद आणि ठाण्यात सावरकरांशी संबंधित नाटकावर झालेला निषेध समाविष्ट आहे.१०. निवडणुकीदरम्यान कोणते नियम किंवा आचारसंहिता लागू आहे?आदर्श आचारसंहिता लागू आहे – दारू विक्री आणि रोख व्यवहारांवर बंदी. पोलिसांना मार्गदर्शक तत्त्वे मिळाली असून बँका, सहकारी संस्था, वाहने आणि वाहतूक यांचे निरीक्षण सुरू आहे जेणेकरून निष्पक्षता राहील.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.