
अंबरनाथ नगरपरिषदेच्या ५९ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र निवडणुकीत पैसे वाटप, ईव्हीएम छेडछाड व बोगस मतदार आढळल्याचा आरोप भाजप व काँग्रेसने केले आहेत.
पण एकही अधिकृत तक्रार प्राप्त न झाल्याने कुठलाच गुन्हा दाखल नाही अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
सातारा: फलटण नगरपालिका निवडणूक होत असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये पुन्हा एकदा EVM मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया थांबवली असून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.
एक प्रभाग, एक जागा आणि एकाच वर्गातील तीन मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोस्तीत कुस्ती नाय म्हणत हे तिघेही खेळीमेळीत रिंगणात उतरले आहेत. भाजप कडून विराज करचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गिरीष ढोरे, उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी तीन मित्रांची नाव आहेत. एक वकील, दुसरा इंजिनिअर आणि तिसरा उद्योजक आहे. तिघांची मैत्री राजकारणापलीकडची आहे. फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. प्रभाग १ मधून तिघेही उमेदवार आहेत.
वाशिम नगरपरिषदेमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात साडे नऊ वाजेपर्यंत 6. 53 टक्के मतदान झाले तर रिसोड नगर परिषद मधील 2 प्रभागातील 2 उमेदवारांसाठी 8. 41 टक्के मतदान झाले आहे.
अंबरनाथ 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संस्थेत मतदारांमध्ये लहान मुलं बुरख्याधारी महिला यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे समोर येत आहे.
शिवसेना (शिंदे) गटाला युतीमध्ये कमी जागा मिळणार असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र कार्यकर्ते नाराज आहेत त्याचबरोबर आहे.प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा अस माझं मत असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले. आम्ही 165 जागा लढायला तयार आहोत, तसा अहवाल शिंदेना पाठवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या 2 प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू झालीय. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर तुरळक मतदार पाहायला मिळतायेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम मतदान केंद्रावर जाणवतोय. मोहोळमध्ये 11 ते 12 अंश सेल्सीयस तापमान असल्याने प्रचंड थंडी पडलीय. दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढाच्या नगराध्यक्ष पदासह 31 जागा, मोहोळ नगरपरिषदच्या दोन प्रभाग, मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या एक प्रभागाच्या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतेय
अंबरनाथ पोलिसांनी सुमारे २०० जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे परिसरातील इमारतीत ठेवले आहे. सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी सुरू आहे. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याची चौकशी सुरू आहे. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री २०० बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केला. भिवंडीवरून आलेले नागरिक कोसगाव परिसरातील सभागृहात आढळले आहेत.
ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार गजानन लवटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुलगा यश लवटे आणि संपूर्ण कुटुंब मतदानासाठी दाखल झाले आहेत. अंजनगाव सुर्जीच्या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंजनगाव सुर्जी च्या निवडणुकीत आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला आहे. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धूके पाहायला मिळत आहेत. थंडीचा शेती पिकांवर देखील परिणाम होत आहे. द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी आहे…
भुसावळ सावदा वरणगाव,परिसरात मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी एक दोन जागेसाठी मतदान होत आहे. थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ असल्यामुळे मतदारांचा प्रतिसाद अल्प स्वरूपात प्रतिसाद दिसून येत आहे. केंद्रांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसतोय.
नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र 4/3 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड बिघाड झाल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीन सुरू झाल्याने पुन्हा एकदा मतदान सुरळीत सुरू झाले. अंजनगाव सुर्जी मध्ये आज नगरपरिषद मतदानाला साडेसात वाजता झाली सुरुवात..
महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवाराच्या मध्ये महत्वपूर्ण लढत. महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचे मध्ये महत्त्वपूर्ण लढत. 20 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत.
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत
बनावट आधार कार्ड बनवून आला होता मतदानाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला दिले पोलिसांच्या ताब्यात. भावाच्या जागेवर आलेल्या मतदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात. सिन्नर मध्ये आज होते आहे 3 जागांसाठी मतदान
सकाळी सात पासून कर्मचारी आणि उमेदवार मतदान केंद्रावर दाखल. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून बंडू बोरुडे,.पाथर्डीत एकूण 10 प्रभागातून नगराध्यक्ष पदासह 21 जागेसाठी मतदान , 27 मतदान केंद्र, कर्मचारी 135मतदान केंद्रावर तैनात
दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्याने मतदान केंद्रावर थंडीपासून बचाव करण्यासाठी कामगारांनी पेटवल्या शेकोट्या. मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात तापमानात घट..थंडीचा कडाका वाढला
देऊळगावराजा नगर परिषदेसाठी आज मतदान होणार असून त्यापूर्वीची पूर्ण तयारी म्हणजेच मोकपॉल पूर्ण झाली आहे.. सर्व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले असून त्यांनी प्रतिनिधींना बोलावून ई व्ही एम मशीन मोकपॉल करून दाखविली .. तसच थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे..
शिवसेना शिंदें गटाने हे सर्व बोगस मतदार आणण्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढार्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या, काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघड केला प्रकार. रात्रभर केला मंगल कार्य ल्याच्या बाहेर पहारा
कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान. मतदान प्रकियेला सुरूवात , मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी. जिल्हयाचे तापमान 11 डिग्री सेल्सिययवर. नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला….
.
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या जागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार आज 20 रोजी मतदान होत आहे. त्यात वरणगाव येथील 10 11 अ आणि 12 ब, भुसावळ येथील 4 ब आणि 11 ब सावदा येथील 4 ब येथील 1 अ आणि यावल येथील 8 ब या जागांसाठी मतदान होईल. या जागांसाठी एकूण 44 मतदान केंद्रे आहेत, यात एकूण 33 हजार 664 मतदार आपला हक्क बजावतील.
अंबरनाथ नगरपरिषद च्या 59 जागांसाठी आज मतदान होणार असून थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे अंबरनाथ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे सत्ता आहे यावेळी भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहेत.
नगराध्यक्ष व 28 सदस्यांसाठी मतदान.नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला. आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात. शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था. प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी व महिला कर्मचारी नियुक्त.
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत. सिन्नर येथे 3, ओझर येथे 2 तर चांदवड येथे 1 जागेसाठी मतदान
नाशिक जिल्ह्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची. सिन्नर नगरपरिषद निवडणूक माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपसमोर ठाकरे शिवसेनेकडून कडवे आव्हान. तिन्ही ठिकाणी मतदान प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात. शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज
नगराध्यक्षासह 32 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार. पहिलीच नगरपरिषद निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये उत्साह.
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात घोळ बघायला मिळाला. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होता. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर 21 डिसेंबरपर्यंत निकाल राखीव ठेवण्यात आली. आता आता 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडेल. अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल.