VIDEO | धावत्या ट्रकवर महाकाय झाड कोसळलं, केबिनच्या काचेतून फांद्या आत शिरल्या, पण…

राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 6 वर धावत्या ट्रकवर विशाल वृक्ष पडला. भंडारा शहरालगत असलेल्या बेला येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जवळपास 30 किलोमीटर दूर अंतरापर्यंत वाहनांची गर्दी झाली होती.

VIDEO | धावत्या ट्रकवर महाकाय झाड कोसळलं, केबिनच्या काचेतून फांद्या आत शिरल्या, पण...
भंडाऱ्यात ट्रकवर झाड कोसळून अपघात
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 8:40 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकवर महाकाय झाड कोसळल्याचं पाहायला मिळालं. भंडारा शहरालगत असलेल्या बेला येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडला. झाडाच्या फांद्या ट्रकच्या पुढील काचेतून केबिनमध्ये शिरल्या, मात्र सुदैवाने यात चालकाला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 6 वर धावत्या ट्रकवर विशाल वृक्ष पडला. भंडारा शहरालगत असलेल्या बेला येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली, तर रस्त्याने जाणाऱ्या दोघा पादचाऱ्यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वृक्ष ट्रकवर पडल्याने ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

वाहनांच्या 30 किलोमीटरपर्यंत रांगा

झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. यामुळे भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते मुजबीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास 30 किलोमीटर दूर अंतरापर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच भंडारा पोलीस, वाहतूक नियंत्रण शाखा, गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस पथक पोहोचले. त्यांनी स्थानिकांची मदत घेऊन महामार्गावर कोसळलेले वृक्ष क्रेनच्या मदतीने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

झाडाची फांदी कोसळून मुंबईत बाईकस्वार पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला

VIDEO | अंबरनाथमध्ये दोन प्रवाशांसह निघालेल्या रिक्षावर झाड कोसळलं

Video : भलं मोठं झाड रिक्षावर कोसळलं, रिक्षाचे मधून दोन भाग, पण ड्रायव्हरच्या केसालाही धक्का लागला नाही!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.