Maharashtra News LIVE: राष्ट्रवादीला बदनाम केले जात आहे – सुरज चव्हाण

Maharashtra News LIVE: भोंदू अशोक खरातचा ताबा आज ईडी घेणार आहे. ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरातचा ईडी ताबा घेणार आहे.

Maharashtra News LIVE: राष्ट्रवादीला बदनाम केले जात आहे - सुरज चव्हाण
tv9 marathi blog
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 19, 2026 | 6:53 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 May 2026 06:53 PM (IST)

    संभाजीनगर : आरसीसी क्लासवर उबाठाचे आंदोलन, बॅनरला जोडे मारले

    नीट पेपर फुटी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मध्येही पडसाद उमटले आहेत, काल आणि आज आरसीसी क्लासवर काळे फासणे, दगडफेक करणे या घटना घडल्या आहेत. यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅनरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.

  • 19 May 2026 06:37 PM (IST)

    उल्हासनगरात धोकादायक इमारत कोसळली

    उल्हासनगरात धोकादायक इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.  पुनर्बांधणी सुरू असतानाच ‘लेक व्ह्यू’ नावाची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडीओ आला समोर आला आहे.

  • 19 May 2026 06:05 PM (IST)

    राष्ट्रवादीला बदनाम केले जात आहे – सुरज चव्हाण

    सुनेत्रा पवार हे पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार की नाही हे तुम्हाला सांगितले जाईल. पक्षात कोणतीही धुस फूस नाही, सर्व नीट आहे,खोडसाळ बातम्या पेरल्या जात आहेत आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे असे राष्ट्रावादीचे नेते सुरज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

  • 19 May 2026 05:59 PM (IST)

    गंगापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याने पेट्रोल ओतून आंदोलनाचा प्रयत्न

    छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याने पेट्रोल ओतून आंदोलनाचा प्रयत्न केला आहे. रस्ता मोकळा न झाल्याने तहसीलदारांच्या केबिनसमोर संतप्त शेतकऱ्याने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

  • 19 May 2026 05:48 PM (IST)

    अखेर युद्धनौका सिंधुदुर्गच्या समुद्रात विसावली, पर्यटकांना मिळणार अनोखी संधी

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात आय एन एस गुलजार ही युद्ध नौका पाच वाजता विसावली आहे. यासाठी एमटीडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी गेले 48 तास काम करत होते. 48 तासाच्या प्रयत्नानंतर ही युद्धनौका खोल समुद्रात विसावली आहे आता ती पर्यटकांना लवकरच पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणबुडी प्रकल्प राबविल्या जाणार आहे.

  • 19 May 2026 05:21 PM (IST)

    भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात बिबट्या जेरबंद

    भंडारा वनविभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करून सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्यात आले.  केसलवाडा परिसरातील गावाजवळ बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी, श्वान बचाव पथक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. बिबट्या एका बंद नाल्यात लपल्याचे आढळून आल्यानंतर पिंजरा लावून त्याला सुरक्षित पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले. मानवी-वन्‍यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल वनविभागाने आभार मानले असून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
  • 19 May 2026 05:03 PM (IST)

    भोर तालुक्यातील शिंद-गवडी गावचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद-गवडी गावचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या ग्रामसेवक सालगुडे याने एका घरकुलधारकाकडून घरकुल योजनेचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.
  • 19 May 2026 04:54 PM (IST)

    गोंदिया : पाटबंधारे विभागाच्या गोदामाला लागली आग

    गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील पाटबंधारे विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामात ठेवलेल्या फाईल्स, फर्निचर व अन्य साहित्य जळून राख झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

  • 19 May 2026 04:40 PM (IST)

    लासलगाव : दूध डेअरी व्यवसायिकांना तापमान वाढीचा फटका

    गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेचा फटका आता दूध डेअरी व्यवसायिकांना बसू लागला आहे. लासलगाव परिसरातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे 42 अंश सेल्सिअसवर गेल्याने दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून दूध खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे खराब झालेले दूध उखरड्यावर फेकण्याची वेळ आल्याने डेअरी चालक आणि दूध व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • 19 May 2026 04:26 PM (IST)

    अहिल्यानगर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा

    अहिल्यानगर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुरेसा साठा नसल्याने अनेक पंपांवर पेट्रोल विक्री थांबवण्यात आली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही पंप व्यवस्थापकांनी आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. शहरात पेट्रोलटंचाईची चर्चा रंगू लागली असून प्रशासन आणि कंपनीच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • 19 May 2026 04:12 PM (IST)

    रायगड : पेणमधील वरेडी कोळीवाडा बंदरावर भीषण आग

    रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरेडी कोळीवाडा बंदर येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत मच्छीमार समाजाच्या अनेक होड्या, बोटींचे इंजिन, मासेमारीचे जाळे तसेच डोल्या मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्या. कोळी महिला आणि मच्छीमार बांधवांनी तब्बल दोन तास अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत झालेले मोठे नुकसान भरून काढणे मच्छीमार समाजासाठी कठीण बनले आहे.

  • 19 May 2026 03:50 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर

    उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटं नाव सांगून हिंदू तरुणीची केली फसवणूक. नाव बदलून हिंदू तरुणीशी केला विवाह. बुरखा हिजाब आणि गोमांस खाण्याची केली सक्ती.

  • 19 May 2026 03:35 PM (IST)

    तापमानाचा फटका आता एसटी बसलाही

    भर उन्हात तापमानाचा फटका आता एसटी बसलाही बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.चाकणच्या आंबेठाण चौकात संगमनेर-पुणे ‘लालपरी’ एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • 19 May 2026 03:15 PM (IST)

    विदर्भात 3 नीट परीक्षार्थींची CBIने केली झाडाझडती

    नागपूरच्या दोन परीक्षार्थी विद्यार्थिनी तर एक चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील एका परीक्षार्थी विद्यार्थ्याच्याच घरी राबवले सर्च ऑपरेशन. सीबीआयच्या दिल्लीच्या पथकाने नागपूर टीमसोबत तिन्ही परीक्षार्थींच्या घरी राबवले सर्च ऑपेरेशन.

  • 19 May 2026 03:02 PM (IST)

    पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्तात डिझेलचे वितरण

    जळगावच्या जामनेरमध्ये पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना डिझेलचे वितरण करण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर गर्दी होऊन गोधळ उडत असल्याने पोलिस बंदोबस्तात डिझेल वाटप. केवळ शेतकऱ्यांनाच डिझेलचे वितरण केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 19 May 2026 01:55 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून अतिरिक्त डिझेल साठा करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून अतिरिक्त डिझेल साठा करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन… अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा…नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर याचं आवाहन..

  • 19 May 2026 01:45 PM (IST)

    मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतीय व्यापारावर मोठा परिणाम

    मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतीय व्यापारावर मोठा परिणाम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कुटुंबालाही मोठा आर्थिक फटका. युद्धामुळे गडकरींच्या कुटुंबाचे शेकडो व्यावसायिक कंटेनर वाटेतच अडकून. यामुळे कोट्यवधी रुपयांचं मोठं नुकसान झाल्याची गडकरींची माहिती

  • 19 May 2026 01:30 PM (IST)

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीची आज दुपारी दीड वाजता मंत्रालयात बैठक

    ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीची आज दुपारी दीड वाजता मंत्रालयात बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ओबीसींच्या अनेक विषयावर चर्चा होणार. बैठकीला छगन भुजबळ, गणेश नाईक, अतुल सावे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती असणार. लक्ष्मण हाके ओबीसी मंत्री मंडळ उपसमितीची भेट घेणार

  • 19 May 2026 01:15 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील आमदारांमध्ये अस्वसस्थता वाढली- सूत्र

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील आमदारांमध्ये अस्वसस्थता वाढली. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या घडामोडींच्या संदर्भात आमदार अस्वस्थ. पक्षातील अंतर्गत वादावर अनेक आमदार सुनेत्रा पवारांची भेट घेणार.  पक्षातील नियमित बैठका घेतल्या गेल्या पाहिजेत यासाठी आमदारांकडून मागणी केली जाणार- सूत्र

  • 19 May 2026 01:00 PM (IST)

    आष्टीकर- शिंदे भेटीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

    खासदार अष्टीकरांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भेट घेतली. ऑपरेशन टायगरवर चर्चा रंगली आहे. यावर खूप चर्चा सुरू आहे. मात्र खासदाराने काम निमित्ताने भेट घेतली असेल तर लगेच यावर ऑपरेशन टायगर म्हणता येत नाही. मंत्री असल्याने काम असू शकतं. याला ऑपरेश टायगर म्हणणे योग्य नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

  • 19 May 2026 12:50 PM (IST)

    अमरावतीत आजचेही तापमान 46 अंशा वर जाण्याचा अंदाज….

    सकाळपासून अमरावती उन्हाचे चटके बसत आहे. पुढील चार दिवस अशा पद्धतीने तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अमरावतीत आजचेही तापमान 46 अंशा वर जाण्याचा अंदाज आहे. अमरावतीकर घराबाहेर निघताना पुरेपूर काळजी घेत आहेत.

  • 19 May 2026 12:40 PM (IST)

    वीज चोरांविरोधात महावितरणची धडक मोहीम

    पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर ,कोहिनूर सोसायटी नागसेन सोसायटी व विविध भागात 15 पथकांद्वारे छापे टाकण्यात आले. उच्चभ्रू वसाहतीत एक ते दीड तासात पन्नास लाखांहून अधिकची वीज चोरी पकडली. वीज चोरीमध्ये राजकीय व्यक्तींचाही सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे. नागरिक घरादारांना कुलूप लावून पसार झाले आहेत .

  • 19 May 2026 12:30 PM (IST)

    आरसीसी क्लासेस समोर तगडा पोलीस बंदोबस्त

    छत्रपती संभाजीनगर मधील आरसीसी क्लासेस समोरील तणावानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. काल एमआयएम व भाजपाच्या वतीने क्लासेस समोर आंदोलन करण्यात आले होते

  • 19 May 2026 12:20 PM (IST)

    राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यामधील राजकीय वैर संपणार?

    काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार रवी राणांचे मोठे भाऊ सुनील राणा यांनी यशोमती ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन सुनील राणा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा फोटो tv9 मराठीच्या हाती लागला आहे. अमरावतीच्या राजकारणात राणा दांपत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये कट्टर राजकीय वैर होते. मात्र दुसरीकडे राणा परिवारातीलच सदस्यानी यशोमती ठाकूर यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले आहे. आगामी काळामध्ये राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यामधील राजकीय वैर संपणार का? अशी चर्चा होत आहे.

  • 19 May 2026 12:10 PM (IST)

    धाराशिवमध्ये नेपियर गवतापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची शक्यता

    धाराशिव जिल्ह्यात इंधन आणि सीएनजी गॅसला पर्याय म्हणून नेपियर गवतापासून इंधन निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे पर्यायी ऊर्जानिर्मितीस चालना मिळणार असून, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नेपियर गवत लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या गवतापासून इंधन निर्मिती करण्यात येणार असून, भविष्यात पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

  • 19 May 2026 12:00 PM (IST)

    ठाण्यात दीड वर्षात कोसळली 560 झाडे

    वारा पाऊस नसतानाही पाच महिन्यात पडली 560 झाडे पडली. स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या ठाण्याचे तब्बल 560 झाडे उन्मळून पडली तर 389 फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत ..विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळ वारे नसतानाही गेल्या पाच महिन्यात 55 मोठी झाडे पडली आहेत..

  • 19 May 2026 11:58 AM (IST)

    जळगावच्या पारोळा येथे बालाजी देवतेला २५० किलो आंब्यांची आरास

    जळगावच्या पारोळा येथे बालाजी देवतेला २५० किलो आंब्यांची आरास. पारोळा येथीलश्रद्धास्थान बालाजी मंदिरात आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी २५० किलो आंब्यांनी बालाजी महाराज यांची आरास सजवण्यात आली. यामध्ये विविध पालेभाज्या आंबा, कैरी, विविध फुलांची आरास अशी सजावट केली जात आहे.  भाविकांना आंब्यांचा प्रसाद वाटप करून आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.

  • 19 May 2026 11:37 AM (IST)

    हिंगोली- डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दोन किलोमीटर रांगा

    हिंगोली- डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपा बाहेर दोन किलोमीटर रांगा लागल्या आहे. पहाटे 3 पासून वाहनधारक  हे डिझेल घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.  जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसत आहे. जिल्ह्यातील 84 पेट्रोल पंपापैकी 45 पंपांवर डिझेल उपलबद्ध आहे.

  • 19 May 2026 11:27 AM (IST)

    जळगाव – सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ

    जळगाव –  सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली.  सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये तर  चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत.

    आयात शुल्कामध्ये वाढ झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत.

  • 19 May 2026 11:18 AM (IST)

    वांद्रे पूर्व : गरीब नगरमध्ये रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर कारवाई

    वांद्रे पूर्व रेल्वे परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली. रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम केले जात आहे.

    रेल्वे परिसरात बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या हटवण्यासाठी 6 बुलडोझर तैनात करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले

  • 19 May 2026 11:03 AM (IST)

    गोंदिया – पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन

    गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन. महसुल नोंदीतुन 1.67 हेक्टर शेतजमीन कमी केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. जोपर्यंत रेकॉर्डवर जागा येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याने घेतली.

  • 19 May 2026 10:57 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी चेकनाके उभारणार

    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी कृषी विभाग व पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या प्रमुख मार्गांवर विशेष चेकनाके उभारून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

  • 19 May 2026 10:47 AM (IST)

    पंतप्रधान जनतेवर बोजा टाकून परदेशात – संजय राऊत

    देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘जय श्रीराम’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेवर महागाईचा मोठा आर्थिक बोजा टाकून स्वतः परदेश दौऱ्यावर गेले आहेत,” अशी टीका राऊतांनी केली. वाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये सध्या तीव्र संतापाचे वातावरण आहे. मोदींनी उद्योगपती गौतम अदानींवरील खटला काढून घेतला आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

  • 19 May 2026 10:37 AM (IST)

    खरीप हंगामासाठी जळगाव जिल्हा कृषी विभाग सज्ज, ११ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध

    आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा आणि योग्य नियोजन करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. कृषी विभागाकडून तालुकानिहाय गोदामांमध्ये ११ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यापैकी ५ हजार ९०४ मेट्रिक टन साठा आधीच गोदामांमध्ये दाखल झाला आहे. यंदा मुबलक खतसाठा उपलब्ध असल्याने ऐन मागणीच्या वेळी किंवा टंचाईच्या काळात शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खतांची मात्रा अभ्यासानुसार आणि गरजेनुसारच द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कृषी यंत्रणेमार्फत दिल्या आहेत.

  • 19 May 2026 10:27 AM (IST)

    वांगणीत सशस्त्र गुंडांच्या टोळीचा धुमाकूळ, ऑफिस आणि कारची तोडफोड

    वांगणी परिसरामध्ये १० ते १२ सशस्त्र गुंडांच्या एका टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. या गुंडांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या (बिल्डर) ऑफिसवर हल्ला चढवत तलवार आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने तिथे प्रचंड तोडफोड केली, तसेच कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या कारचेही मोठे नुकसान केले आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे वांगणीत तीव्र भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

     

  • 19 May 2026 10:17 AM (IST)

    पुण्यात पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई: ड्रग आणि गोळीबार प्रकरणातील मोक्काचे आरोपी जेरबंद

    पुण्यातील ड्रग आणि गोळीबार प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार असलेल्या ‘डबल मोक्का’तील आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांना यश आले आहे. खडकवासला भागात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि अजिंक्य चव्हाण या दोन कुख्यात आरोपींना बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखा ३ चे प्रशांत अन्नछत्रे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुणला आणि योगेश झेंडे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. अटक करताना पोलिसांना आरोपींच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत.

  • 19 May 2026 10:05 AM (IST)

    किरीट सोमय्यांचा वांद्रे येथील कारवाईवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा, आता बांगलादेशात घर मिळेल

    वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे विभागाकडून आज बेकायदेशीर अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बांगलादेशी रोहिंग्यांचा लँड जिहाद चालणार नाही, असा इशारा दिला. तसेच, “येथून मातोश्री जवळच आहे, त्यामुळे या बेकायदेशीर बांधकामांना कोणाचे संरक्षण होते हे स्पष्ट होते,” असा थेट टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. जे लोक येथे हक्काच्या घरांची मागणी करत आहेत, त्यांना आता थेट बांगलादेशातच घर मिळेल, असेही सोमैया यावेळी म्हणाले.

  • 19 May 2026 09:50 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढले पेट्रोल डिझेलचे दर

    दर वाढण्याच्या अगोदर: 108.56 पैसे. दर वाढल्याच्या नंतर: 109.47. वाढलेले पेट्रोल दर : 0.91 पैसे. डिझेल दर
    पहिले दर: 95.01 आताचे: 95.95. वाढलेले दर: 0.94 पैसे सरकारकडून मोठा दणका देत पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आलीत

  • 19 May 2026 09:40 AM (IST)

    भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एसटी बसने प्रवास

    महाडिक यांचा युवा शक्ती जागर हा महाराष्ट्रव्यापी दौरा सुरुय. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बार्शी ते सोलापूर असा एसटी बसने प्रवास करत नागरिक, युवकांशी संवादही साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर कृष्णराज महाडिक यांनी आपल्या दौऱ्यातील एक दिवस एसटी बसने प्रवास केलाय.

  • 19 May 2026 09:30 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर..

    गोंदिया जिल्ह्यात आज 44 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद घेण्यात आली आहे… काल गोंदिया जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस इतके होते तर आज तब्बल 2 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली… गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती मात्र आज अचानक तापमान वाढल्याने गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला… तर आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे…

  • 19 May 2026 09:20 AM (IST)

    काँग्रेसचे महासचिव तुषार गायकवाड यांचे निधन

    लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचे चिरंजीव आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे बंधू व मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव विक्रोळी येथील निवासस्थानी दुपारी १.०० ते २.०० वाजेपर्यंत ठेवण्यात येईल व त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, विक्रोळी कोर्टाच्या बाजूला, कन्नमवार नगर ०१, येथे ठेवले जाईल. त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार टागोर नगर येथील स्मशान भूमीत केले जातील.

  • 19 May 2026 09:05 AM (IST)

    देशातील औषध विक्रेत्याचा उद्या 20 मे ला देशव्यापी संप

    सोलापूर जिल्हातील ८४०० तर माढा तालुक्यातील ५७० हुन अधिक औषध दुकाने बंद ठेऊन विक्रेते संपात होणार सहभागी. मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार. केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट संघटनेने प्रशासनाला दिले निवेदन-

  • 19 May 2026 08:55 AM (IST)

    काँग्रेस आमदार राजेश राठोड यांचा सभागृहात शंभर टक्के उपस्थितीचा विक्रम

    जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. सरकारी एजन्सीच्या अधिकृत अहवालानुसार, विधानसभेच्या सभागृहामध्ये आमदार राजेश राठोड यांची शंभर टक्के उपस्थिती नोंदवली गेली आहे. 100 टक्के उपस्थित राहणाऱ्या आमदारांच्या यादीत राजेश राठोड यांनी अग्रस्थान मिळवलं आहे. दरम्यान सभागृहात १०० टक्के उपस्थित राहिल्यामुळेच मला जनतेचे अनेक प्रलंबित आणि महत्त्वाचे प्रश्न आक्रमकपणे मांडता आलं असल्याचं आमदार राठोड यांनी म्हटलंय.

  • 19 May 2026 08:45 AM (IST)

    नागपुरात गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

    नागपूर – गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये पेट्रोलच्या किमतीत 91 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत सुमारे 93 पैशांची वाढ झाली आहे. नागपूरमध्ये आजचे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 108.07 रुपये असून कालचे दर 107.16 रुपये होतं तर काल नागपूरमध्ये डिझेलचे दर 93.70 रुपये तर आज 94.63 रुपये इतके आहे.

  • 19 May 2026 08:35 AM (IST)

    नागपुरातील RSS मुख्यालय, हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्यासाठी दहशतवाद्याला मोठी फंडिंग

    नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्यासाठी कथित दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला मोठी फंडिग करण्यात आली होती. त्याला नागपुरात येण्यासाठी यूएस डॉलरमध्ये इंडिगो विमानाचं पेमेंट केलं गेलं. ज्यासाठी ‘वर्ल्ड पे’ कार्डचा उपयोग केला गेला. इंडिगो एयरलाइन्सचे तत्कालीन विमानतळ व्यवस्थापक चारू वर्मा यांनी विशेष सत्र न्यायालयात साक्ष दिली आहे. सरकारच्या दाव्यानुसार रईस शेख हा प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य असून तो या संघटनेच्या सूचनेवरून नागपुरात आला होता.

    13 जुलै 2021 रोजी श्रीनगर इथून तो मुंबईमार्गे नागपुरात आला आणि 15 जुलै 2021 रोजी नागपूर इथून दिल्लीमार्गे श्रीनगरला परत गेला. सुरक्षा यंत्रणेचं त्याच्या हालचालींवर लक्ष होतं. सप्टेंबर 2021 मध्ये काश्मीर पोलिसांनी रईसला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर रेकीचा कट लक्षात आला. दहशतवाद पथकाने रईसला काश्मीरमध्ये अटक करून नागपुरात आणलं.

     

  • 19 May 2026 08:27 AM (IST)

    दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येणार

    पुणे- दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका डिजिटल तपासल्या जाणार असून पुरवणी परीक्षेसाठी बोर्डाने निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येत आहे. एका विषयाच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने केंद्रावर दिल्या जाणार आहेत आणि उत्तर पत्रिका डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. या प्रयोगाच्या परिणाम पाहून येत्या वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षेत त्याचा वापर करण्यात येणार आहे.

  • 19 May 2026 08:20 AM (IST)

    अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सुधाकर भारसाकळे यांचा राजीनामा

    अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे स्थानिक नेते सुधाकर भारसाकळे यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सुधाकर भारसाकडे कुठल्या पक्षात प्रवेश करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. सुधाकर भारसाकडे हे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांचे बंधू आहेत.

  • 19 May 2026 08:12 AM (IST)

    नाशिक- भोंदू अशोक खरातचा ताबा आज ईडी घेणार

    नाशिक- भोंदू अशोक खरातचा ताबा आज ईडी घेणार आहे. ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरातचा ईडी ताबा घेणार आहे. आज मुंबईत ईडीकडून अशोक खरातला PMPLA न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

  • 19 May 2026 08:12 AM (IST)

    देशातील खासगी शिकवणी वर्गांचा व्यवसाय 20 हजार कोटींच्या पुढे

    देशातील खासगी शिकवणी वर्गांचा व्यवसाय 20 हजार कोटींच्या पुढे गेला आहे. जेईई-नीटसह स्पर्धा परीक्षांमुळे कोचिंग इंडस्ट्रीचा झपाट्याने विस्तार झाला आहे. दिल्ली, कोटा, पुणे, नागपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कोचिंगचं जाळं असून आता छोट्या शहरांमध्येही शाखा विस्तारावर भर देण्यात येत आहे. जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससीसाठी विशेष प्रशिक्षण देणाऱ्या संस्था वाढल्या असून लाखो विद्यार्थ्यांमुळे कोचिंग व्यवसाय तेजीत सुरू आहे.

    वैद्यकीय शिक्षणाच्या एक लाख जागांसाठी 20 ते 22 लाख विद्यार्थी स्पर्धेत असून यातील तब्बल 90 टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गांवर अवलंबून आहेत. आयआयटी-एनआयटीच्या मर्यादित जागांमुळे स्पर्धा तीव्र झाली असून पालक आणि विद्यार्थी मोठ्या फीच्या आमिषाला बळी पडत आहेत. नामांकित क्लासेसकडून आयआयटी-नीट प्रवेशाची ‘शंभर टक्के हमी’ देण्यात येत असून दोन वर्षांसाठी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत फी आकारली जात आहे.

  • 19 May 2026 08:09 AM (IST)

    नाशिकमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणाचा खुलासा; 27 एप्रिललाच पेपर शुभम खैरनारच्या हाती

    नाशिकमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनारच्या हातात आल्याची माहिती समोर येत आहे. शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर सर्वप्रथम उत्तर प्रदेश इथल्या व्यक्तींच्या तो संपर्कात आला. याचदरम्यान हरयाणाचा व्यक्ती संपर्कात आला आणि हरियाणातून पेपर राजस्थानच्या सिक्करमध्ये गेला. तिथून तो पुढे वेगवेगळ्या राज्यात पोहोचल्याची माहिती आहे. संशयित आरोपी शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच शुभम दोन दिवस नाशिकबाहेर होता. नाशिक–अहिल्यानगर–पुणे असा पेपरचा प्रवास झाला. टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे. 27 मे ते 30 मे या दरम्यान एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाख रुपयांना विकली गेल्याचा संशय आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडच्या कदम कुटुंबाची आज पुण्यात सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर भागात धाड टाकून कदम कुटुंबीयांची आठ तास चौकशी केली होती. कदम यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयांत नीटचा पेपर विकत घेतला होता, असं सीबीआयच्या तपासात माहिती पुढे आली आहे. कदम कुटुंबीय पुण्यातील एका एजंटच्या संपर्कात होते. एजंटमार्फत कदम कुटुंबीयांनी आर्थिक व्यवहार केल्याचं समजतंय. शनिवारी सीबीआयच्या पथकाने कदम कुटुंबीयांची विद्युतनगरातील फ्लॅटमध्ये प्रत्येक सदस्याची चौकशी केल्यानंतर आज पुन्हा त्यांना पुणे इथल्या सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आज सकाळी अकरा वाजता कदम कुटुंबीय पुणे इथल्या सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. सीबीआयने चौकशी केलेल्या कदम कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपले फोन स्विच ऑफ केल्याची माहिती आहे. नीट परीक्षेत यापूर्वी 120 गुण मिळालेल्या कदम यांच्या मुलीला सराव परीक्षेत मात्र 560 एवढा स्कोअर येत होता. पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर त्याच्या जबाबात नांदेडच्या कदम कुटुंबाचं नाव समोर आलं आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Follow Us