Maharshtra News LIVE : राहुल गांधी यांनी भर सभेत दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ..
आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं, या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं, अखेर त्यानंत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी हे पुण्यात येण्यापूर्वीच एनएसयू आणि अभाविपमध्ये चांगलीच जुंपल्याची पहयला मिळत आहे. शुक्रवारी रात्री जोरदार राडा झाला, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच आज आपण इतरही अनेक घडामोडी जाणून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
राहुल गांधी यांनी भर सभेत दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ
राहुल गांधी यांनी भर सभेत दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ. नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत की, मुलींची शिव्या दिल्या, ज्यामुळे धक्का बसला.
-
सुरक्षेअभावी मुली शिक्षण आणि नोकरी सोडतात- राहुल गांधी
सुरक्षेअभावी मुली शिक्षण आण नोकरी सोडतात, असे मोठे विधान राहुल गांधी यांनी केले.
-
-
मी इथे तुम्हाला ऐकायला आलोय- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पुण्यातील कार्यक्रमात म्हटले की, मी इथे तुम्हाला ऐकायला आलोय..
-
राहुल गांधींनी मुलीची चिठ्ठी ठेवली खिशात
राहुल गांधी मुलींसोबत संवाद साधत आहेत. यादरम्यान मुलीने आपल्या प्रश्न राहुल गांधी यांच्यापुढे मांडले. राहुल गांधी यांनी मुलीची चिठ्ठी खिशात ठेवली.
-
राहुल गांधी यांच्यासमोर मुलींची वाचला तक्रारींचा पाडा
राहुल गांधी यांच्यासमोर मुलींची वाचला तक्रारींचा पाडा, राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेकडे सर्वांच्या नजरा.
-
80 टक्के महिलांचा छळ होतो- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी नुकताच मोठे विधान केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, 80 टक्के महिलांचा छळ होतो.
-
राहुल गांधी यांना विद्यार्थीनी आपल्या अनुभव सांगताना दिसत आहेत…
राहुल गांधी यांच्यासोबत मुली संवाद साधत आहेत. आपले वाईट अनुभव सांगताना दिसत आहेत.
-
राहुल गांधी यांनी केले मुलीचे काैतुक
राहुल गांधी यांनी नुकताच एका मुलगीचे काैतुक केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, तू खूप सुंदर आहे.
-
तरूणाई ही भारताची मोठी ताकद- राहुल गांधी
नुकताच पुण्यातील संवादात राहुल गांधी यांनी म्हटले की, तरूणाई ही भारताची मोठी ताकद आहे.
-
पुण्यातल्या सभेत राहुल गांधींची तुफान क्रेझ..
पुण्यातल्या सभेत राहुल गांधी यांची मोठी क्रेझ बघायला मिळतंय. तरूणाई राहुल गांधी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचली आहे.
-
मी राजकारणावर बोलणार नाही- राहुल गांधी
राहुल गांधी पुण्यात जेनझींसोबत संवाद साधत आहेत. यादरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, मी राजकारणाबद्दल बोलणार नाही.
-
राहुल गांधी सभास्थळी दाखल
पुण्यातील सभास्थळी राहुल गांधी दाखल झाले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी समजले आहेत.
-
राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद..
राहुल गांधी यांची पुण्यात सभा आहे. राहुल गांधी सभास्थळी पोहोचले आहेत. राहुल गांधी जेनझींसोबत संवाद साधणार आहेत.
-
राहुल गांधी यांची पुण्यात सभा
राहुल गांधी यांची पुण्यात सभा आहे. राहुल गांधी सभेच्या स्थळी पोहोचत आहेत. यावेळी मोठ्या पावसाला सुरूवात झाली.
-
काँग्रेसचा कार्यक्रम ‘छाञों की गुंज’ नसून ‘पैसो की गुंज’ आहे – भायुमोचे कृष्णराज महाडिक यांची टीका
काँग्रेसचा कार्यक्रम ‘छाञों की गुंज’ नसून ‘पैसो की गुंज’ आहे अशी टीका भाजपा युवक मोर्चाचेआ कृष्णराज महाडिक यांनी केली आहे. काँग्रेसनेच सीओपीमधील विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे, ही बाब निषेधार्ह आहे असा आरोप त्यांनी केला आहे. वंंदे मातरम् या कार्यक्रमाला तरुणांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे मी खूप आनंदी आहे असेही ते म्हणाले.
-
नांदेड जिल्ह्यात गावठी कट्टे – जीवंत काडतूस जप्त
नांदेडमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड शहरात ही कारवाई केली आहे. नवघाट परिसरातील व्यायाम शाळेजवळ दोघांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद फयाज अब्दुल रऊफ, मोहम्मद समीर मोहम्मद ताहेर अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. फयाजकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी परवेज बेग हाजी बेगकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.
-
नांदेडमध्ये विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त
नांदेडमध्ये विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड शहरात कारवाई केली. नवघाट परिसरातील व्यायाम शाळेजवळ दोघांना ताब्यात घेतलं .
-
मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीची महत्वाची बैठक
मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीची महत्वाची बैठक आहे. ‘स्कूल ठीक करो’ या भूमिकेअंतर्गत बैठक पार पडणार असून आजच्या बैठकीतून CJPची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.
-
बारामती – संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ, रामरक्षा आंदोलनादरम्यान राडा
बारामती येथील मोरगावमधील संजय राऊताच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. शिवसेनेकडून तिथे रामरक्षा पठण आयोजित करण्यात आलं होतं. गोंधळ घालणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने गोंधळ घातल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे.
-
चाकण औद्योगिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात
चाकण औद्योगिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात. रस्ते दुरुस्तीसाठी प्री- कास्ट आणि पॉलिमर टेक्नो पॅच पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आठवड्याभराच्या आतच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र टिम चाकणला पाठवली . -
जालना – अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निघाल्या किडे आणि अळ्या
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील जामखेड या गावात अंगणवाडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये सोनकिडे आणि अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गावकऱ्यांनी अचानक अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली असता त्यावेळी वाटाण्यांमध्ये सोनकिडे तर भातामध्ये अळ्या निघत असल्याचा हा सगळा प्रकार समोर आला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
-
पुणे विद्यापीठात भाजपाकडून वंदे मातरम् कार्यक्रमाचे आयोजन
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाकडून वंदे मातरम् सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन. कीकडे काँग्रेसकडून छात्रों की गुंज कार्यक्रमाचे आयोजन तर दुसरीकडे भाजपकडून वंदे मातरम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे भाजपचे नेते या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
कल्याणमध्ये पुन्हा कुत्र्याचा हल्ला; पाळीव श्वानाची चिमुकल्यावर झडप
कल्याण पश्चिमेतील वाडेकर परिसरात पाळीव कुत्र्याने चिमुकल्याला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साई शरण इमारतीच्या परिसरात घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. कुत्र्याच्या अचानक हल्ल्यामुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
-
खवड्या डोंगरावरील दुर्दैवी घटनेतील आई-मुलाचे व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर – खवड्या डोंगरावरील दुर्दैवी घटनेतील आई-मुलाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कुणाल चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेत. एका व्हिडीओत कुणाल आईसोबत चहा घेतानाचं दृश्य दिसत असून व्हिडिओतून आई-मुलातील जिव्हाळा आणि प्रेमाचा आविष्कार दिसतोय. कालच्या दुर्दैवी घटनेनंतर हे व्हिडिओ पाहून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
-
नाशिक – ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या दरात वाढ
नाशिकच्या इगतपुरीमध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या दरात वाढ झाली आहे. साखरेचा दर 76 ते 80 रुपये किलो, तर गुळाचा दर 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेशोत्सवाच्या काळात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
-
धीरज देशमुख यांनी केले राहुल गांधी यांचे स्वागत
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी छात्रो की गुंज या कार्यक्रमासाठी पुण्यात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हॉटेलमध्ये उपस्थित होते. धीरज यांनी राहुल गांधींचे स्वागत केले.
-
राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता
राहुल गांधी आज पुण्यामध्ये छात्रो की गुंज कार्यक्रमााला विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे अशा भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
छात्रों की गूंज या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद – माणिकराव ठाकरे
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. यावर बोलताना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटले की कार्यक्रमाला विद्यार्थीनींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात राहुल गांधी त्यांचे विचार आज पेरतील.
-
मुस्लीम युवक शिवाजी महाराजांची मूर्ती राहुल गांधी यांना भेट देणार
पुणे : मुस्लिम युवक थोड्याच वेळात राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. हे मुस्लीम युवक शिवाजी महाराजांची मूर्ती राहुल गांधी यांना भेट देणार आहेत. छात्रो की गुंज या नियोजित कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
-
राहुल गांधींची काँग्रेसचे नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
राहुल गांधी सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. ते छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधरणार आहेत. सध्या ते काँग्रेसचे नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.
-
राहुल गांधी हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये दाखल झाले आहेत, लवकरच कार्यक्रमात सहभागी होणार
खासदार राहुल गांधी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या ह़ॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये दाखल झाले आहे. लवकरच छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधरणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
राहुल गांधी पुणे एअरपोर्टवर दाखल
खासदार राहुल गांधी पुण्याच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. लवकरच ते विद्यार्थिनींना संबोधित करतील.
-
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर रशियाला भेट देणार
रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांच्या निमंत्रणावरून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर 23-24 ऑगस्ट 2026 रोजी रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, जयशंकर व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) 27व्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवतील. तसेच, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी ते रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतील.
-
भाजप ‘वंदे मातरम’ देशव्यापी मोहीम सुरू करणार
भाजप ‘वंदे मातरम’चा इतिहास, महत्त्व आणि वारसा अधोरेखित करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. यामध्ये तरुण पिढीला जागरूक करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
-
पुण्यातील राडा हा काँग्रेसचा इव्हेंट, फडणवीसांचा आरोप
पुण्यात राहुल गांधींच्या छात्रो की गुंज कार्यक्रमापूर्वी कॉलेज कॅम्पस परिसरात राडा झाला. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून केल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला. पुण्यातील राडा हा काँग्रेसचा इव्हेंट असल्याची घणाघाती टीका केली.
-
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्यात भीषण अपघात
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे लेनवर ट्रॅव्हल बसने टेम्पो आणि 3 कारला धडक दिली. या अपघातात दहा जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
-
सत्तेवर डोळा ठेवून कार्यक्रम घेण्याचं काम, रामदास कदम राहुल गांधींवर बरसले
सत्तेवर डोळा ठेवून कार्यक्रम घेण्याचं काम सुरू असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली. गरिबी हटाओ असा नारा दिला होता, किती गरिबी हटवली? असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
-
वारसा हक्काने फक्त मालमत्ता मिळते, कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका
बाळासाहेबांचे विचार आमच्यासोबत, जनाधारही आमच्यासोबत असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. वारसा हक्काने फक्त मालमत्ता मिळते, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
-
मुंबईत राष्ट्रवादी कोअर कमिटी बैठक पार पडली
मुंबईत राष्ट्रवादी कोअर कमिटीची सुमार 2 बैठक चालली. पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरेंसह प्रफुल पटेल, नवाब मलिक हजर होते. काल पार पडलेल्या बैठकीनंतर पुन्हा बैठक पार पडली.
-
खोट्या कागदपत्रांवर विशाखा राऊत यांनी जातीचा दाखला मिळवला- सदा सरवणकर
खोट्या कागदपत्रांवर विशाखा राऊत यांनी दाखला मिळवला, असा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे. तर जातीचा दाखला खोटा असल्याचं सहा महिन्यांपासून सांगत आहे, असं प्रिया सरवणकर म्हणाल्या.
-
एबीव्हीपी सदस्यांनी विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या, एनएसयूआयच्या राज्य अध्यक्षांचा आरोप
एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे एबीव्हीपीच्या आरोपांवर म्हणाले, “हे पूर्णपणे खोटे आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. आमच्या आधी एबीव्हीपीचे गुंड आले होते आणि लोकांना धमक्या देत होते, म्हणून कॅमेरे बंद करण्यात आले होते. मला वसतिगृहातून फोन आला होता की एबीव्हीपीचे सदस्य विद्यार्थ्यांना धमक्या देत आहेत.”
#WATCH | Pune, Maharashtra | On allegations leveled by ABVP, NSUI State President Sagar Salunke says, “It is an absolute lie… They should check the CCTV footage; the cameras had been turned off because ABVP goons had arrived there before us and threatened people. I received a… https://t.co/uNo5m1xz8W pic.twitter.com/ZH5Wv0s4T5
— ANI (@ANI) August 22, 2026
-
पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभावीप वाद आता शिगेला
पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभावीप वाद आता शिगेला. भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे रात्री उशिरपर्यंत पोलीस ठाण्यात. भाजपाकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. NSUI कार्यकर्त्यांवर भाजपकडून मारहाणीचा आरोप
-
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी- संजय राऊत
राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी, शाहांच्या दौऱ्यावेळी अशा अटी टाकतात का? भाजपच्या पायाखालची वाळू सरकलीय- संजय राऊत
-
विद्यार्थ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही- नाना पटोले
विद्यार्थ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही. COEP कॉलेजच्या विद्यार्थिनींना धमकी देण्याचा प्रयत्न. कार्यक्रमाला समर्थन दिल्याने विद्यार्थिनींना डांबलं जात असेल तर गंभीर बाब आहे, विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, ABVP आणि NSUIच्या राड्याबाबत नाना पटोलेंचं ट्विट
-
आज पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम
आज पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम, राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, आजच्या कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं ‘छात्रों की गूंज’ कॅम्पेन. कार्यक्रमाच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन बॉक्स उभारण्यात आलाय. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार
-
धाराशिव जिल्ह्यात काही भागात गेली 19 दिवसापासून पावसाचा खंड
धाराशिव जिल्ह्यात काही भागात गेली 19 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी तलाव ही कोरडे पडल्याने सोयाबीन पिकाला पाणी द्यायचे कसे शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. ऐन फुलवऱ्यात पावसाने खंड दिल्याने फुलांची गळती तर काही ठिकाणी सोयाबीन करपले आहेत,
-
सर्वांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलंय – अब्दुल सत्तार
वारंवार उपोषण जरांगेंच्या तब्येतीसाठी घातक आहे. मुख्यमंत्र, उपमुख्यमंत्री चर्चेतून मार्ग काढतील. सर्वांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलंय. असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
-
माजलगावात सदावर्तेंचा निषेध; शिंदेंवरील एकेरी भाषेप्रकरणी शिवसेनेची पोलिसांत धाव
बीडमधील पत्रकार परिषदेत ADV गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांकडून सदावर्तेंविरोधात कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे. अवमानकारक वक्तव्यामुळे शिवसैनिक आणि नागरिकांच्या भावना दुखावल्याची निवेदनात नमुद केले आहे. व्हिडिओ फुटेज तपासून सदावर्तेंवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
बीडच्या वडवणी शहरातील दगडफेक प्रकरणातील तीन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
वडवणी शहरात काल दुपारनंतर दुचाकी लावल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. या दरम्यान दोन्ही बाजूने मोठा जमाव एकत्र आला आणि दगडफेक झाली. यामध्ये अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी तिघांवर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींसह इतर कोणीही यामध्ये बोलायला तयार नाही. 11 लोकांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून वडवणीत तणावपूर्ण शांतता असुन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
-
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमावर राधाकृष्ण विखे पाटलांची टीका
‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमासाठी पैसे देऊन विद्यार्थी आणल्याच्या चर्चेवर विखेंनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी आंदोलनाचा राहुल गांधी राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप आहे. पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलावल्याची चर्चा गंभीर असल्याचे विखे म्हणाले. विद्यार्थ्यांना राहुल गांधी काय आहेत हे माहिती आहे, त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही. राज्य सरकारने परीक्षा घेतल्यास शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांची जबाबदारी वाढेल
कोचिंग क्लासेसच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबेल… असं वक्तव्य देखली राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. -
शिवसेनेचा महामंडळ वाटपाचा तीढा सुटला – सुत्र
शिवसेनेचा महामंडळ वाटपाचा तीढा सुटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लवकरच महायुतीत महामंडळ वाटप होणार. अध्यक्ष आणि ऊपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेत चढाओढ सुरु झाली आहे. लाॅबिंग करणाऱ्या नेत्यांवर ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाॅच ठेवत अंतिम निर्णय ते स्वतःच घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही , जिल्ह्यात काम चांगलं आणि दबदबा असलेल्या आमदारांना महामंडळ मिळणार. महायूतीत ५०-३०-२० असा एसइओ पदे वाटपाचा फाॅर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहीती आहे.
-
कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं NSUI नं बोलायला लावलं – विद्यार्थी
कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं NSUI नं बोलायला लावलं… मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावली… असा आरोप अभाविपचा आहे…
-
अब्दुल सत्तार अंतरवलीत मनोज जरांगे यांच्या भेटीला…
अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांची गेल्या तासाभरापासून चर्चा सुरु आहे. सरकारने समाजाचं वाटोळं केलं, आता उपोषण करणारा… अशी भूमिका जरांगे यांनी घेतली असून, सरकार मागण्यांबाबत सतारात्मक आहे… उपोषण टाळा.. अशी समज सत्तार यांनी काढली आहे… 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
-
छात्रों की गुंज कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद
“राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या संख्येने विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील. पुण्याच्या मुली घाबरणाऱ्या नाहीत त्या कार्यक्रमाला येतील. खोटे गुन्हे दाखल करणे ही भाजपाची खासियत आहे. आमच्याच मुलांना मारहाण करून आमच्याच मुलांवर गुन्हे दाखल केले. या कार्यक्रमाची धास्ती भाजपने घेतली आहे” असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या.
-
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटील पाटील यांच्या भेटीसाठी दाखल
आमदार अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटील पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल. मनोज जरांगे पाटील व आमदार अब्दुल सत्तार यांच्या चर्चा सुरू. 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील यांनी दिला आहे उपोषणाचा इशारा.
-
मिरा -भाईंदरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून नोकराने लांबवले ४ कोटींचे सोने
मिरारोड पूर्वेतील ‘शगुन गोल्ड’ दुकानातून ३५ वर्षीय नोकर दिनेश रावत याने ४ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले आहे, ज्या दागिन्यांची किमंत अंदाजे, 4 कोटी रुपये एवढी आहे, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
-
पावसामध्ये मोठा खंड, जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरीही जालना जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातले छोटे-मोठे पाझर तलाव नदी ओढे अद्यापही कोरडेच आहेत, जेमतेम झालेल्या पावसावर शेतकऱ्यांची पिके तग धरून होती, मात्र अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, पिके सुकू लागली आहेत.
-
कळंबमध्ये नगरसेवकांच्या पक्षांतरावरून ठाकरे गट आक्रमक
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून कळंब शहरात फलकबाजी करण्यात आली आहे. या पक्षप्रवेशाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
आज राहुल गांधी पुण्यात, दौऱ्यापूर्वीच एनएसयू अभाविपमध्ये जोरदार राडा
आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच एनएसयू आणि अभविपमध्ये जोरदार राडा झाला आहे, या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.