Maharashtra News LIVE : वादळी वाऱ्यामुळे संभाजीनगरातील विमानतळाचे छप्पर कोसळले
Maharashtra News LIVE: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 25 मे रोजी दुपारी 3 नंतर छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे मिळणार आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारातील सर्व मुद्द्यांवर तडजोड करण्यात आली आहे. लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात येईल, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. दोन्ही देशांमधील तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेला संघर्ष त्यामुळे संपुष्टात येणार आहे. इराणने स्वत:कडील युरेनियमचा साठा नष्ट करण्याची हमी दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र इराणकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे रविवारी ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान राज्यात तीन मोठे अपघात घडले. मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाट, सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट आणि अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर तीन अपघात झाले. या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अंबरनाथमध्ये पोलिसांसमोरच एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला
अंबरनाथमध्ये पोलिसांसमोरच दगडाने जीवघेणा हल्ला
वायरच्या वादातून 54 वर्षीय अजय चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला
आरोपी पसार कुटुंबीयांचा गंभीर आरोप
अंबरनाथमधील दगडाने हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
-
वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
-
-
गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे भीषण आग
गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे अचानक अज्ञात कारणामुळे भीषण आग लागून शेतकऱ्यांची गायी, वासरे, घोडे आणि शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर कडबा देखील जळून खाक झाला आहे. नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने देखील घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे, मात्र या आगीत मोठं नुकसान झालं आहे.
-
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 26 उमेदवारी अर्जाची विक्री
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 26 उमेदवारी अर्जाची विक्री
पहिल्या दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह 16 व्यक्तींकडून एकूण 26 उमेदवारी अर्जांची खरेदी
विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज विक्री तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
-
वादळी वाऱ्यामुळे संभाजीनगरातील विमानतळाचे छप्पर कोसळले
जोरदार वादळीवाल्यामुळे छत्रपती संभाजी नगर विमानतळाला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे विमानतळावरचे छप्पर कोसळले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
-
चार लहान मुलांसह एका व्यक्तीची विहिरीत उडी घेत आत्महत्या
बुलढाणा : चार लहान मुलांसह एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात ही घटना घडली आहे. विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. -
साताऱ्यात पालिकेकडून अनाधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई
सातारा शहरातील कास रोड परिसरातील समर्थ मंदिर चौक येथे पालिकेकडून अनाधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या, अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. -
परभणी – इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी
परभणीच्या अनेक पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने पेट्रोल पंप चालकांना नागरिकांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने नागरिक गोंधळ घालत असल्याने, याचा पेट्रोल पंप चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज पंप चालक आशोशियनच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत पंपांवर इंधन वाटपासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
-
परिवहन विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यासाठी मिळणार 250 ई बसेस
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आता ई बसेस सुरू करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यासाठी 250 बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 80 बसेस दिल्या जाणार आहेत. त्यातील 10 बसेस या धुळे आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. धुळे आगारातील बसेस चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बस स्थानकातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर जनतेसाठी उपलब्ध होणार आहेत.
-
चाकण-तळेगाव महामार्गावर मोठा अपघात, चालक थोडक्यात बचावला
चाकण-तळेगाव महामार्गावरील खराबवाडी येथे दुचाकीस्वार चारचाकी गाडीच्या खाली आल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दुचाकी चारचाकीच्या पुढील चाकाखाली अडकल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही वाहतूक कोंडी होऊन काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
अंबरनाथच्या एमटीपीएफ कारखान्यात कामगाराचा मृत्यू
अंबरनाथच्या युद्धसामुग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स एमटीपीएफ कारखान्यात आज एका कामगाराचा मृत्यू झाला. लिफ्टरद्वारे जाळी बांधत असताना लिफ्टर उलटल्याने ही दुर्घटना घडली. यानंतर लिफ्टर ऑपरेटर प्रशिक्षित नसल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप इतर कामगारांनी केला आहे.
-
दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल
दोन दिवस दिल्लीमध्ये गेल्यानंतर अखेरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. ठाण्यामध्ये आज पदाधिकाऱ्यांची घेणार भेट. सलग तीन दिवस एकनाथ शिंदे हे शासकीय कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
-
गडचिरोलीत उन्हाच्या तडाख्यामुळेच वटवाघुळ पक्षांच्या मृत्यू
गडचिरोलीत उन्हाच्या तडाख्यामुळेच वटवाघुळ पक्षांच्या मृत्यू झाला आहे. गेल्या 20 ते 22 वर्षापासून चिंचाच्या झाडावर वास्तव्य करीत असलेले पक्षी 46 डिग्री तापमान झाल्यामुळे मरण पावले आहेत. पाचशेच्या वर पक्षी मरण पावल्यामुळे दुर्गंध पसरली होती त्यामुळे जेसीपीने खड्डा करून मरण पावलेल्या पक्षांना दफन करण्यात आले.
-
MIM नगरसेवक मतीन पटेलची गेल्या तीन तासांपासून कसून चौकशी
नाशिकमध्ये MIM नगरसेवक मतीन पटेलची गेल्या तीन तासांपासून कसून चौकशी सुरु आहे. मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेखची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येत आहे. मतीन पटेलचा मोबाईल देखील sit कडून ताब्यात घेतला जाणार आहे.
-
पस्तीस तास कामगाराच्या मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात
बीड शहरातील बालेबीर परिसरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण आहेत. हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक संतप्त. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवला
-
तापमान वाढल्याने 500 वटवाघुळांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ. पाचशेपेक्षा पण जास्त वटवाघुळांचा मृत्यू. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमानात आठ दिवसापासून वाढ झाली असून सध्या 46 डिग्री तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात होत आहे. जंगलात असलेले वन्य प्राणी असो की पक्षी असो यांना तापमानाच्या तडाखा सहन न करता आल्यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली.
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांना सूचना
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवश्यक उपाययोजना करा. गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा. मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर जिल्ह्यात उल्लंघनाची शक्यता अधिक. गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये. आवश्यक उपाययोजना करण्याच्या राहुल नार्वेकरांच्या सदानंद दाते यांना सूचना.
-
पंतप्रधान विदेशात जात असतील तर चुकीचं उदाहरण लोकांसमोर निर्माण होणार – काँग्रेस खासदार गोवाल पाडवी
केंद्र सरकारकडून इंधनावर लावण्यात येणारा कर कमी करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिल्यानंतर लोक घाबरलेले दिसत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर मोठ मोठ्या लाईनी दिसून येत आहेत. देशाचे पंतप्रधान इंधन बचत आव्हान करत आहेत. त्यामुळे स्वतः पंतप्रधानांनी देखील स्वतः केलेल्या आव्हानाचं पालन करावं. पंतप्रधान विदेशात जात असतील तर चुकीचं उदाहरण लोकांसमोर निर्माण होणार अशी टीका काँग्रेस खासदार गोवाल पाडवी यांनी केली.
-
मध्यवर्ती कारागृहच्या अधिकाऱ्यांना आरोपी सोबत पार्टी करणे भोवले
नाशिक मध्यवर्ती कारागृहच्या अधिकाऱ्यांना आरोपी सोबत पार्टी करणे भोवले. 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसाच्या आत खुलासा करण्याच्या सूचना. व्हिडीओ कधीचा आहे याबाबतीत आद्यप खुलासा नाही. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने वरिष्ठांना सादर केला अहवाल.
-
आरे कॉलनीमध्ये झाडावर चढून आरोपीचा हाय-व्होल्टेज ड्रामा
मुंबईतील आरे कॉलनीमध्ये झाडावर चढून आरोपीने केले हाय-व्होल्टेज ड्रामा. या आरोपीचे नाव अफझल अस्लम खान उर्फ अजगर आहे. आरोपीने सांगितले की, कोणाकडे तरी अमली पदार्थ सापडले असून पोलीस त्याला त्या प्रकरणात अटक करणार होते. पोलिसांनी त्याला अटक करू नये म्हणून, तो आरेच्या जंगलात आला, एका मोठ्या झाडावर चढला आणि आत्महत्या करण्याचे नाटक करू लागला.
-
युवकांनी मोठ्या ब्रिज खाली ट्री प्लांटेशन करा – मुंबई महापौर
5 जून पर्यावरण दिवस आहे. त्याची सुरुवात झाली आहे. प्लांटेशनमध्ये जास्त लक्ष दिले पाहिजे. वन मंत्र्यांसोबत मीटिंग घेऊन वेगवेगळी झाडे लावण्याचे माझे विचार आहेत ते 5 तारखेला करणार आहे. युवकांनी मोठे ब्रिज आहेत त्याच्या खाली ट्री प्लांटेशन करा. यासाठी तुम्हाला काहीही लागत असेल माती, रोपटे सर्व काही देण्यासाठी महापालिका सज्ज आहे. नुसती झाडं लावू नका तर त्याला जोपासण्याचे पण काम करा. ते पुढे जाऊन तुम्हाला सावली देईल आणि आराम देईल असं मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या.
-
रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात कार कोसळली
रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात कार कोसळली…. गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू .. 1000 फूट खोलदरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु.. महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून आंबेनळी घाटात दरीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू…
-
‘कॉक्रोच जनता पार्टी’ विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
‘कॉक्रोच जनता पार्टी’ विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल…. ‘कॉक्रोच जनता पार्टी’शी संबंधित व्यक्तींविरोधात CBI चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी…. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता…
-
NTAतील रसायनशास्त्र तज्ञ CBIच्या रडारवर
नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारची कबुली… चौकशीनंतर NTAतील आणखी एक रसायनशास्त्र तज्ञ CBIच्या रडारवर….
-
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये जवानाचा आईला न्याय मिळवून देण्यासाठी लढा
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये जवानाचा आईला न्याय मिळवून देण्यासाठी लढा. रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जवानाच्या आईचा हात कापला गेल्याचा आरोप. सहकाऱ्याच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी ITBP जवान आक्रमक. ITBPचे 50 हून अधिक जवान पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचत कारवाईची मागणी
-
पेट्रोल – डिझेल दरवाढीमुळे जळगावकर त्रस्त
जळगावमध्ये दहा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगाव शहरात पेट्रोलच्या दरात 2 रुपये 73 पैसे आणि डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैसे एवढी वाढ झाली. पेट्रोलचे दर आता 113 रुपये 17 पैसे आणि डिझेलचे दर 99 रुपये 82 पैशांवर पोहोचले. 10 दिवसात पेट्रोलचे दर एकूण 7 रुपये 67 पैसे तर डिझेलचे दर एकूण 7 रुपये 8 पैशांनी वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल डिझेलचा तुटवडा आणि त्यात 7 रूपयांपर्यंत झालेली वाढ यामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.
-
एमआय एम नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल
टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खानला आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झालेत. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवण्यात आली होती. टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमधून फरार होती . नाशिक मधून फरार असताना संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मधील पटेल यांनी तिला आश्रय दिला होता. – निदा खानला स्वतःच्या घरात लपवल्यानंतर नाशिक पोलिसांकडून मतीन पटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला .
-
मालेगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात
मालेगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
एका बाजूला बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला साठवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूकही धोक्यात आली आहे.
-
भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात – विजय वडेट्टीवार
5 लाख देऊन नगरसेवकांना नेण्याचं काम सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.
-
उमरग्यात विजेचा शॉक लागून इंजिनीयर युवकाचा मृत्यू
धाराशिवच्या उमरगा शहरात विजेचा शॉक लागून इंजिनीयर युवकाचा मृत्यू झाला. अजित नारायण शिंदे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पावसामध्ये छत्री तारेला लागल्याने शॉक बसून ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग गावालगत तिहेरी अपघातात 6 ठार, 28 जखमी
मुंबई आग्रा महामार्गावरील गावालगत झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले आहेत. तर 28 जण जखमी झाले आहे. वाळू घेऊन जाणारा ट्रॉला विरुद्ध दिशेने घुसल्याने मालेगाव कडून धुळ्याकडे येत असलेल्या ट्रकला त्याने धडक दिली. त्यानंतर काही काळातच मालेगाव होऊन इंदूरकडे जाणाऱ्या खाजगी बसन या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅव्हल्स मधील चार तर ट्रक आणि वाळूच्या ट्रॉल्याला मदत करणारा टोल नाक्यावरील एक कर्मचारी हा ठार झाला आहे. तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.
-
TSC प्रकरणात मोठा ट्विस्ट; निदा खानच्या समर्थनासाठी माजी आमदार आसिफ शेख मैदानात
मालेगावमधील बहुचर्चित TSC (टीएससी) प्रकरणात आता एक नवा आणि मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानसह इतर ७ आरोपींच्या बाजूने आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याची घोषणा माजी आमदार आणि इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख यांनी केली आहे. आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आसिफ शेख यांनी दावा केला की, या संपूर्ण प्रकरणात कोणतेही तथ्य नसून निदा खान यांच्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. मूळ ‘खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच जाणीवपूर्वक हे नवे प्रकरण पुढे आणण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी स्वतः न्यायालयात हजर राहणार असल्याचे सांगत आसिफ शेख यांनी आता या न्यायालयीन लढाईत थेट उडी घेतली आहे.
-
आळंदीत खळबळ; माऊलींच्या दानपेटीवर सेवेकऱ्याचाच डल्ला
देवाच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या एका सेवेकऱ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशाल वारुळे नावाच्या या सेवेकऱ्याच्या घरातून पोलिसांनी तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दानपेटीतील रक्कम जमा करताना आणि मोजताना हा सेवेकरी अत्यंत हुशारीने हातचलाखी करायचा आणि नोटा एका वेगळ्या पिशवीत भरायचा. चोरीची रोकड घरी नेताना कोणाला संशय येऊ नये म्हणून तो पिशवीत वरच्या बाजूला देवाचे हार ठेवायचा आणि खाली १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा लपवायचा. गेल्या तीन महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचा संशय असून, घरात चोरलेली रक्कम तो थेट बेडमध्ये लपवून ठेवायचा. माऊलींच्या दरबारातच झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे वारकरी संप्रदायात आणि आळंदी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
-
डिझेलसाठी तासनतास रांगेत, टेंभूर्णीत २०० शेतकऱ्यांना पंप चालकाने दिले थेट पंपावरच जेवण
राज्यभरात सध्या निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसत असून, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक प्रचंड अडचणीत आले आहेत. अशा कठीण परिस्थितीत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील पेट्रोल पंप चालक संजय सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडवत एक स्तुत्य उपक्रम राबवला. डिझेल मिळवण्यासाठी सकाळपासून तासनतास उपाशीपोटी रांगेत उभ्या असलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकरी आणि वाहन चालकांसाठी त्यांनी थेट पेट्रोल पंपावरच पंगत बसवून जेवणाची उत्तम व्यवस्था केली. डिझेलच्या प्रतीक्षेत असलेल्या या कष्टकऱ्यांची भूक ओळखून राबवलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे सर्व शेतकरी आणि वाहनधारकांमधून सावंत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तीव्र समाधान व्यक्त केले जात आहे.
-
पुण्याच्या राजगडमध्ये हॉटेलवर टोळक्याचा थरारक हल्ला; हवेत गोळीबार करत मालक अन् कामगारावर जीवघेणा हल्ला
पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोदावडी फाटा येथील ‘श्रीनाथ हॉटेल’मध्ये पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हवेत गोळीबार करत भीषण दहशत माजवली आणि हॉटेल मालकासह कामगारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादानंतर या टोळक्याने हॉटेलमधील खुर्च्या आणि मालकाच्या दुचाकीची प्रचंड तोडफोड केली. या हिंसक हल्ल्यात हॉटेल मालक मयूर दसवडकर आणि कामगार दशरथ शिळीमकर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी राजगडच्या वेल्हा पोलिसांनी तात्काळ पथके रवाना केली आहेत.
-
वादळी वाऱ्यासह पावसामुळे सादोळा येथे रेशनचे मोठे नुकसान; केळीच्या बागाही उद्ध्वस्त
बीड जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्यामुळे केज तालुक्यातील सादोळा येथे मोठे नुकसान झाले आहे. येथील रेशन दुकानाचे पत्रे हवेत उडून गेल्याने दुकानात साठवून ठेवलेला गहू आणि तांदळाचा साठा पूर्णपणे भिजला असून, गरिबांचे धान्य वाया गेले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ रेशन दुकानालाच बसला नसून, परिसरातील केळीच्या बागांसह इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी आणि ग्रामस्थांमधून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
-
त्र्यंबकेश्वरजवळील डोंगरी गावात भीषण पाणीटंचाई
गावातील विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर; गावकरी त्रस्त. दूषित पाण्यामुळे लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 2027 कुंभमेळ्याच्या तयारीवरच उपस्थित झाले गंभीर प्रश्नचिन्ह. त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांबाबत प्रशासनावर वाढला दबाव. स्वच्छ पाणीपुरवठा आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी
-
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी पीक जमीनदोस्त
बीड जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने केज तालुक्यातील युसुफ वडगाव, सादोळा या परिसरातील केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले होते तर मोठ-मोठे झाडे देखील उन्मळून पडले आहेत. या परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. एकरी एक लाख रुपयांचा खर्च केला, मात्र बाजारात नेऊन पैसे हातात येण्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने सगळं काही उध्वस्त झालं, गेल्या अनेक दशकांपासून एवढे प्रचंड वेगाने कधीच वारे वाहिले नाहीत, शेतातून केळी बाहेर काढण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे उरले नाहीत शंभर टक्के नुकसान आहे पंचनामे करा किंवा नका करु मात्र किमान आम्हाला केळी बाहेर काढण्यासाठी तरी आता पैसे द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
गोंदियात पाणीटंचाईचा धोका वाढला, नागरिकांचे हाल..
धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट…शिरपूर धरण केवळ 6 टक्क्यांवर…प्रशासनाची वाढली चिंता. वाढत्या उष्णतेमुळे धरणे कोरडी. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन. मान्सून लांबल्यास गोंदिया जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट इटियाडो आणि कालीसरार धरणात फक्त 24 टक्के पाणीसाठा शिल्लक
-
सोलापुरात पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिकांना पुन्हा एकदा फटका
सोलापुरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2.73 पैशांनी वाढल्या. सोलापुरात पेट्रोलचे 111.82 रू तरी डिझेलचे दर 98.50 रू इतके आहेत. सरकारने पेट्रोल दर वाढवले त्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतोय. आम्ही बिगारी काम करणारे लोकं आहोत, आम्हाला दिवसाला 600 ते 700 रुपये हजेरी मिळते. त्यात 112 रू पेट्रोलला दिले तर मग आम्हाला काय राहणार. मात्र असं असलं तरी मोदी सरकारलाच आम्ही पसंती देतो. कारण आम्ही जिथे राहतो तिथला भाग त्यांनी चांगला केला.
-
मुंबईच्या वडाळा इथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलच नसल्यानं मुंबईकर हैराण
वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा ताण. मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये प्रति लिटरवर. डिझेलचा दर ९७.७८ रुपये प्रति लिटर. वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण. रोजच्या प्रवासाचा खर्च वाढला. मालवाहतूक आणि बाजारभावांवर परिणाम होण्याची शक्यता. ग्राहकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर. काहींनी सरकारकडून दरकपातीची मागणी केली
-
छत्रपती संभाजी नगरच्या क्रांतीचौकातील एचपी पंपावर डिझेल पुन्हा नो स्टॉक
तर दहा दिवसात चौथ्यांदा वाढले पेट्रोलचे डीजलचे दर. पेट्रोल प्रति लिटर 2.72 पैशाने तर डिझेल 2.81 पैशाने महागले. पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची वाहनधारकांची मागणी. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसत आहे.
-
सांगली – आटपाडी तालुक्यात गारांचा पाऊस
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. तर झाड पडून एका म्हशीचा मृत्यू देखील झालेला आहे. सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. या पावसामुळे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-
मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९७.७८ रुपये प्रति लिटरवर
मुंबईतल्या वडाळा इथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलच नसल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा ताण आला आहे. मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये प्रति लिटरवर आणि डिझेलचा दर ९७.७८ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
-
नाशिक- ढगाळ हवामानासह आज पावसाचा अंदाज
नाशिक- ढगाळ हवामानासह आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून हलका-मध्यम पावसाचा अंदाज आहे. शहरातील ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. तर कमाल तापमानात घट झाली असून पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
-
अमरावती- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा नागरिकांना फटका
अमरावती- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा नागरिकांना फटका बसला आहे. अमरावतीत पेट्रोलचे दर ११२.७८ प्रति लिटर तर डिझेल ९९ रुपये ४३ पैसे प्रति लिटर आहे. दहा दिवसांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. मध्यरात्री पेट्रोलच्या दरात २.६१ रुपयांनी दरवाढ झाली तर डिझेलमध्ये २.१७ रुपयांनी दरवाढ झाली.
-
नाशिक – खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदारांना मे पर्यंतची डेडलाईन
नाशिक – खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदारांना मे पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. २८ रस्त्यांच्या कामासंदर्भात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व चर आणि खड्डे २७ मे पर्यंत डांबरीकरण करून दुरुस्त कराव्यात आणि केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल रोजच्या रोज सादर करावा लागेल.
-
धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई, 16 गावांना झळा; टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून जिल्ह्यातील 16 गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. प्रशासनाच्या वतीने सध्या टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसंच 29 पाणी स्रोतांचे अधिग्रहण करून पर्यायी पाणी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, धाराशिव तालुक्यातील येडशी गावामध्येही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतीकडून टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
-
नाशिकच्या TCS प्रकरणी नगरसेवक मतीन खान आज हजर होणार का याकडे लक्ष
नाशिकच्या TCS प्रकरणी नगरसेवक मतीन खान आज हजर होणार का याकडे लक्ष लागून आहे. नाशिक पोलिसांनी मतीन खान याला नोटीस बजावली आहे. बजावलेल्या नोटिसीप्रमाणे नगरसेवक मतीन पटेल आज हजर राहणार का याकडे लक्ष लागून आहे. संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज नाशिकरोड न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि धर्मांतर प्रकरणातील व्हॉट्सॲप ‘चॅटिंग’मधून मोठे खुलासे झाले. संशयित निदा एजाज खान हिने तिच्या नातेवाईकासोबत केलेल्या चॅटिंगमधून तपासात अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले.
-
अवघ्या 10 दिवसांत चौथ्यांदा महागले पेट्रोल-डिझेल, खिशाला पुन्हा कात्री
अवघ्या दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांतली ही चौथी वाढ आहे.