Maharashtra News LIVE : इचलकरंजी : खड्ड्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करत युवा महाराष्ट्र सेनेचे अनोखे आंदोलन

Maharashtra News LIVE : राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. महायुतीत जागावाटपावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. कांद्या प्रश्नात शेतकरी आक्रमक झाली आहेत.

Maharashtra News LIVE : इचलकरंजी : खड्ड्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करत युवा महाराष्ट्र सेनेचे अनोखे आंदोलन
Maharashtra News
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 10:29 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक आहेत, काल त्याबाबत अत्यंत मोठे आंदोलन झाले. दिल्लीत बैठकी झाली. हवामानात बदल होत असून विदर्भातील तीन शहरांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. IMD कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला. महायुतीत जागावाटपावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जुना तिढा सोडवण्यासाठी फॉर्म्युला तयार केल्याची माहिती. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची शक्यता. खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 May 2026 10:28 PM (IST)

    परभणी-पाथरी मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    परभणी-पाथरी मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    कारची दुचाकीला समोरासमोर धडक

    धडकेत एक जण जागीच ठार तर दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करतांना मृत्यू

    अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

     

     

  • 27 May 2026 05:30 PM (IST)

    नाफेडच्या कांदा खरेदी केंद्र वाटपावरून नवा वाद ?

    नाफेडच्या कांदा खरेदी केंद्र वाटपावरून नवा वाद ?

    कांदा खरेदी केंद्र जाहीर करतांना केलेली रचना संशयास्पद?

    प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांना डावलल्याची बाब समोर

    नाफेडने मालेगाव, कळवण, येवला, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यांना वगळले

    निफाड ८, देवळा ५, चांदवड ३, बागलाण २, नांदगाव १ असे दिले केंद्र

    कांदा खरेदी प्रक्रियेत मर्जीतील केंद्रांना महत्व दिल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा


  • 27 May 2026 05:10 PM (IST)

    चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना धमकी

    चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना धमकी

    दिपाली सय्यद यांना एका महिला नेत्याकडून धमकी

    भोंदू खरातवर बनत असलेल्या चित्रपटात काम न करण्यासाठी दिपाली सय्यद यांना धमकी

    चित्रपटात काम केल्यास तुमची राजकीय कारकीर्द संपवली जाईल,  अशी धमकी दिल्याच समोर

     

     

  • 27 May 2026 04:55 PM (IST)

    डाळिंबाला समाधानकारक दर, शेतकरी आनंदात

    एकीकडे कांद्याचे दर कोसळत असताना डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळतंय… राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींबाची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत असल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे… एक नंबरच्या डाळींबाला तब्बल २५० रुपये दर मिळत असून वर्गवारीनुसार दर सध्या स्थिर आहेत. दररोज सुमारे १५०० कॅरेट डाळींबाची आवक बाजार समितीत होत आहे…राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या डाळींबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे…गेल्या काही दिवसांपासून डाळींबाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे…
  • 27 May 2026 04:45 PM (IST)

    यवतमाळमध्ये 28 हजार शेतकऱ्यांना खरिपाचे पीककर्जवाटप केले जाणार

    यवतमाळ : निधीअभावी कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचे कर्ज वितरण थांबवले होते. या कर्ज वितरणासाठी जिल्हा बँकेने राज्य बँकेकडे ५४३ कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्ज वितरणाची मागणी केली होती. प्रत्यक्षात राज्य बँकेने जिल्ह्याला कर्ज वितरणासाठी २८० कोटी रुपयांचीच कर्ज मर्यादा मंजूर केली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 28 हजार शेतकऱ्यांना हे खरिपाचे पीककर्जवाटप केले जाणार आहे.
  • 27 May 2026 04:25 PM (IST)

    पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

    वाशिम जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवस  शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र अतिरिक्त डिझलसाठा करून ठेवल्यानं डिझलची टंचाई निर्माण झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून आमच्याकडे खत, बियाणं घेण्यासाठीच पैसे नसून अतिरिक्त साठा कसा करणार असा संतप्त सवाल केला जातोय.
  • 27 May 2026 04:06 PM (IST)

    बुलढाण्यात अवैध जाहिरातीचे फ्लेक्स धोकादायक, अपघात होण्याची शक्यता

    बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवैध जाहिरातीचे लागलेले फ्लेक्स बोर्ड हे धोकादायक ठरत आहेत. मुख्य म्हणजे सध्या अवकाळी पाऊस वारं सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.. पडलेले हे फ्लेक्स अनेक तास वाहतुकीकरता देखील अडथळा ठरतात.चिखली, बुलढाणा, खामगाव सह इतर शहरात ही अवैधपणे फ्लेक्स बोर्ड लावलेले आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे..
  • 27 May 2026 03:54 PM (IST)

    परभणीत उष्माघाताने 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    परभणीत उष्माघाताने 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उन्हातून फिरून घरी आल्यानंतर झोपलेल्या अवस्थेत नामदेव मगर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरात ही घटना घडली आहे.

  • 27 May 2026 03:40 PM (IST)

    लासलगाव : शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा नाही

    शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. विंचूर येथील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावर कांदा नाकारल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विंचूर येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दराने 240 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला, मात्र मात्र हा कांदा निकृष्ट ठरवत साठवणुकीसाठी नाकारला आहे. त्यामुळे आता शासकीय खरेदी प्रक्रियेवर आणि साठवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

  • 27 May 2026 03:26 PM (IST)

    वाशिम : मे महिन्यामध्ये 31 टक्के अतिरिक्त डिझेल विक्री

    वाशिम जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करत काही लोकांनी अतिरिक्त साठा केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यामध्ये 31 टक्के अतिरिक्त डिझेल विक्री झाल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितलं आहे.

  • 27 May 2026 03:15 PM (IST)

    इचलकरंजी : खड्ड्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करत युवा महाराष्ट्र सेनेचे अनोखे आंदोलन

    इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. इचलकरंजी-सांगली रोडवरील यड्राव फाटा येथे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी “खड्ड्यांचा वाढदिवस” साजरा केला. यावेळी खड्ड्याजवळ केक कापून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 27 May 2026 02:45 PM (IST)

    धुळ्यातील चार पैकी तीन पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत

    धुळे महानगरातील चार पैकी तीन पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्याचे समोर आले आहे. काल धुळे महानगरातील सर्वच प्रमुख चार पेट्रोल पंपावरचा साठा कमी झाला होता. पेट्रोल डिझेल नसल्याने वाहनधारकांना झाला होता मोठा त्रास..

  • 27 May 2026 02:30 PM (IST)

    उल्हासनगरात नालेसफाईचा फज्जा काढलेली घाण पुन्हा नाल्यात

    उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालेसफाईचा फज्जा काढलेली घाण पुन्हा नाल्यात टाकण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईतील भोंगळ कारभार समोर आला आहे. जेसीबीने काढलेला गाळ पुन्हा नाल्यात टाकल्याचा प्रकार समोर. कोट्यवधींच्या नालेसफाई कामावर प्रश्न उपस्थित गेले जात आहेत.

  • 27 May 2026 02:15 PM (IST)

    काँग्रेसच्या टिळक भवनात मविआची बैठक सुरू

    काँग्रेसच्या टिळक भवनात मविआची बैठक सुरू झाली आहे. बैठकीला अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ , अनिल परब हजर असल्याचे दिसत आहे. आता या बैठकीत काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • 27 May 2026 01:55 PM (IST)

    पुण्यातील विविध रस्त्यांवर पुणे पोलिसांकडून नाकाबंदी

    पुण्यातील विविध रस्त्यांवर पुणे पोलिसांकडून नाकाबंदी. रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदी सुरु. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर. पोलिसांकडून वाहनधारकांची कसून चौकशी

  • 27 May 2026 01:45 PM (IST)

    सांगलीमध्ये मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

    सांगलीमध्ये मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ. सासरच्या छळामुळे माझ्या मुलीचा मृत्यू, वडिलांचा आरोप. वडिलांच्या तक्रारीनंतर पलूस पोलिसांत पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुढील तपासासाठी प्रकरण नागपट्टीनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती

  • 27 May 2026 01:30 PM (IST)

    सांगलीच्या टाकळीत महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा…

    सांगलीच्या टाकळीत महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा… 10 ते 20 दिवसांनंतर पिण्याचे पाणी येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक… संतप्त महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव, परिसरात पाणी प्रश्न बनला गंभीर…

  • 27 May 2026 01:15 PM (IST)

    पंढरपुरात VIP दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार…

    पंढरपुरात VIP दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार… मंदिर समितीच्या विश्वस्तांनी जवळच्या लोकांना VIP दर्शन दिलं… पुरुषोत्तम अधिकमासानिमित्त VIP दर्शन बंद… विश्वस्तांनी VIP दर्शन दिल्यानं बापू पठारे यांच्याकडून नाराजी व्यक्त…

  • 27 May 2026 01:00 PM (IST)

    राज्यातील वारकऱ्यांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव? हर्षवर्धन सपकाळांचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

    राज्यातील वारकऱ्यांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव, असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असल्याने अनेक नागरिक गावाबाहेर असतील, त्यामुळे मतदारांची नावं वगळली जाण्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, अशी काँग्रेसची मागणी आहे.

  • 27 May 2026 12:50 PM (IST)

    पुणे- नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शाहाच्या कॅबिनची झाडाझडती

    पुणे- नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शाहाच्या कॅबिनची झाडाझडती घेण्यात आली. तेजस शाहने मनिषाकडून नीटचा पेपर घेतला होता. मनिषाच्या मोबाइलमध्ये तेजसचा नंबर ‘गॉड’ म्हणून सेव्ह आहे. फिजिक्सचा प्राध्यापक असलेल्या तेजस शाहला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील प्रभू अभंग मेडिकल अकॅडमीमध्ये तेजस शिकवत होता.

  • 27 May 2026 12:40 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांकडून स्वबळाचा नारा?

    2029 साठी भाजपची भूमिका माहीत नाही, 288 साठी तयारी करायला हवी. आपण 288 जागांची तयारी करायला हवी, अशी भूमिका छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडली. मतदारसंघ वाढत असतील तर आगामी प्लॅनिंग करायला हवी, असंही ते म्हणाले.

  • 27 May 2026 12:30 PM (IST)

    जळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागात पेट्रोल पंपांवरील परिस्थिती पूर्वपदावर

    जळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागात पेट्रोल पंपांवरील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. जळगाव ते धरणगावदरम्यान सात पेट्रोल पंपांवर रिअॅलिटी चेक करण्यात आला. बांभोरी, पाळधी , मुसळी, एकलग्न, पिंपरी आणि धरणगाव अशा गावांमधील ७ पेट्रोल पंपांवरील परिस्थितीची पाहणी केली. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांबरोबरच वाहनधारकांची देखील गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 27 May 2026 12:20 PM (IST)

    घाटकोपर सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध

    घाटकोपर सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध करण्यात येत आहे. महापालिकेकडून अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. सागर पार्क सोसायटीत 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते. सोसायटीत बकरा कुर्बानी करणार नाही, पालिकेनं जागा द्यावी तिथं आम्ही बकरा कुर्बानी करू, अशी नागरिकांची भूमिका आहे.

  • 27 May 2026 12:15 PM (IST)

    प्रतिनिधींना, स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सिद्धिविनायक कॉरिडॉरचं काम पुढे होऊ देणार नाही- महेश शिंदे

    “आमचा विरोध हा सिद्धिविनायक कॉरिडोरला नाहीये, आमच्या विरोध मैदान घेऊन करण्यात त्यांचा प्रयत्न आहे त्याला आहे. मात्र शिवसेना असताना त्यांचा हा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही. सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिरामध्ये मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी 500 कोटींचा निधी घ्यावा आणि त्यासोबत आणखी पाचशे कोटीचा जादा निधी सरकारकडून मागवा आणि आसपासचा परिसरसुद्धा विकसित करावा. स्थानिक प्रतिनिधींना आणि स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय या ठिकाणी आम्ही सिद्धिविनायक कॉरिडोरचं काम पुढे होऊ देणार नाही,” अशी भूमिका महेश शिंदेंनी मांडली.

  • 27 May 2026 12:00 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील एचपी पेट्रोल पंपावर आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तर पेट्रोल पंपावर ठिय्या मांडून आंदोलक घोषणाबाजी करत आहेत.

  • 27 May 2026 11:52 AM (IST)

    खाद्य पदार्थांचे भाव वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे

    खाद्य पदार्थांचे भाव वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर लागू राहणार.  1 जुनपासून मध्य रेल्वेच्या स्टॉलवरील वडापाव आणि समोस्याचे भाव वाढवण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.

  • 27 May 2026 11:48 AM (IST)

    अमरावतीत स्कूलबस- व्हॅनच्या मासिक शुल्कात 25 टक्क्यांनी वाढ

    पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अमरावती जिल्ह्यात स्कूल बस/व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल 25 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय शालेय वाहतूक चालक-मालक संघटनेने घेतला आहे . इंधनावरील वाढता खर्च, वाहनांची देखभाल आणि चालकांच्या वेतनात झालेली वाढ यामुळे संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

  • 27 May 2026 11:40 AM (IST)

    नाशिक – भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचे मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

    नाशिक – रिंग रोडभूसंपादन बाधित शेतकऱ्यांचे मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू आहे. मनमानी पद्धतीने प्रशासन भूसंपादन करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भुजबळांच्या निवासस्थानाकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग लावण्यात आलं आहे.

  • 27 May 2026 11:29 AM (IST)

    SIR प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

    SIR प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने SIR प्रक्रियेला घटनात्मक मान्यता दिली आहे. अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे.

  • 27 May 2026 11:21 AM (IST)

    सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रतिकिलोने वाढले

    सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रतिकिलोने वाढले.  आज कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.  मात्र कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करू असे सांगितले,  मात्र सोलापुरात त्याची खरेदी होत नाही.  केवळ नाशिक, अहिल्यानगर आणि लासलगावला नाफेडमार्फत खरेदी सुरु आहे. आम्हाला कांदा पिकवायला 15 ते 16 रुपये प्रतिकिलो खर्च येतो, मात्र बाजारात 8 ते 10 रुपये मिळाल्यावर शेतकऱ्याने काय करायचे ? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

  • 27 May 2026 11:10 AM (IST)

    मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

    महिला सुरक्षेच्या मुद्यावरून तसेच नीट पेपरफुटीप्रकरणावरून मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

  • 27 May 2026 10:57 AM (IST)

    पूर्णा शहरात भीषण अपघात; भरधाव टिप्परच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी

    परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील ताडकळस टी-पॉइंटवर एका भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मोहम्मद सिद्दीकी जिलानी असे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या वडिलांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पूर्णा शहर आणि ताडकळस टी-पॉइंट परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

  • 27 May 2026 10:47 AM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात इंधन टंचाई कायम; रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसकडून अनोखा निषेध

    जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई जाणवत असून, नागरिक आणि शेतकरी यामुळे पुरते हैराण झाले आहेत. या इंधन टंचाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर एकत्र येत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना ‘मेलडी चॉकलेट’ वाटून प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा अनोखा निषेध नोंदवला. “केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या स्वतःच्या पेट्रोल पंपावरच जर पेट्रोल-डिझेलची एवढी मोठी टंचाई असेल, तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल या वेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. या इंधन टंचाईमुळे शेतीची कामे रखडली असून प्रशासनाने तातडीने पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

  • 27 May 2026 10:37 AM (IST)

    वर्ध्यात तीव्र पाणीटंचाई, दीड-दोन किमी भटकंती करत नागरिकांना आणावे लागतेय पाणी

    वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बांबर्डा येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थ पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. माळेगाव येथील तलावातील पाणीसाठा कमालीचा घटल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सध्या ४ ते ५ दिवसांनी नळाला येणारे पाणी नागरिकांसाठी अपुरे पडत आहे. यामुळे ग्रामस्थांना बैलगाडी किंवा दुचाकीवरून तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. गावात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने नागरिकांना सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ज्याचा फटका शेतीच्या कामांनाही बसत आहे. सध्या प्रशासनाकडून पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत टँकरने पाणी टाकले जात असले, तरी ग्रामपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही ही समस्या सुटू शकलेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा पाण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी आर्त मागणी आता बांबर्डा येथील नागरिकांकडून केली जात आहे.

  • 27 May 2026 10:27 AM (IST)

    महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अमान्य; एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शाह यांच्याकडे मांडणार भूमिका

    विधान परिषद निवडणुकीच्या ११-४-२ या जागावाटप फॉर्म्युलावर शिवसेना (शिंदे गट) नाराज असून, एकनाथ शिंदे याविषयी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी थेट चर्चा करणार आहेत. ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपसोबत आल्यानंतरही पक्षातर्फे सापत्न वागणूक मिळत असल्याची आणि सत्तेत सर्वात कमी वाटा दिल्या जात असल्याची खंत एकनाथ शिंदे या बैठकीत व्यक्त करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या जागावाटपात भाजपला नागपूर, पुणे, सोलापूरसह तब्बल ११ जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला (अजित पवार गट) २ आणि शिवसेनेच्या वाट्याला केवळ ठाणे, नाशिक, यवतमाळ व परभणी या ४ जागा आल्या असल्याने शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी आहे.

  • 27 May 2026 10:17 AM (IST)

    सोलापूर विधान परिषदेसाठी दोन दिवसात १८ अर्जांची खरेदी, पण एकही दाखल नाही; कोणाला मिळणार संधी?

    सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिल्या दोन दिवसांत तब्बल १८ उमेदवारी अर्जांची खरेदी झाली असली, तरी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामध्ये शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), बसप आणि रासप या पक्षांच्या वतीने अर्जांची खरेदी करण्यात आली आहे; मात्र भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून अद्याप एकही अर्ज खरेदी करण्यात आलेला नाही. काँग्रेसकडून राजन कामत, आदित्य फत्तेपूरकर आणि अशपाक बळोरगी यांनी अर्ज घेतले. तर शिंदे गटाकडून मोहोळचे रमेश बारसकर तर ठाकरे गटाकडून बार्शीच्या नागेश अक्कलकोटे यांनी अर्ज खरेदी केले आहेत. आगामी १ जूनपर्यंत अर्ज खरेदी आणि दाखल करण्याची मुदत असल्याने महायुतीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे संख्याबळ पाहता विधान परिषदेसाठी भाजपकडे ३०७, शिवसेना (शिंदे गट) ७६, राष्ट्रवादी (AP गट) ५१, तर काँग्रेस १८, राष्ट्रवादी (SP गट) २९ आणि शिवसेना (ठाकरे गट) ३१ अशी स्थिती आहे. त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत जागा वाटपाच्या अंतिम निर्णयावरच सोलापूर विधान परिषदेचे संपूर्ण गणित अवलंबून असणार आहे.

  • 27 May 2026 10:07 AM (IST)

    लोखंडवाला मार्केटमध्ये भीषण अपघात टळला; भरधाव कार थेट चढली डिव्हायडरवर

    मंगळवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोखंडवाला मार्केट परिसरात एका भरधाव चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अति वेगाने आलेली ही कार थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन चढली. या अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अपघातामुळे या मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली; तसेच स्थानिक तरुण आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरळीत केली असली, तरीही शहरातील वाढत्या भरधाव वेगामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • 27 May 2026 09:57 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार.

    राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार. कार्यकारणीमध्ये तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख न केल्याने होता नाराजीचा सूर. नवख्या लोकांना कार्यकारणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल यांची नाराजी होती. त्यावर नवीन कार्यकारणी मध्ये काही बदल करून निवडणूक आयोगाला यादी दिली जाणार. सूत्रांच्या माहितीनुसार, सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान देण्याची शक्यता. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता

  • 27 May 2026 09:53 AM (IST)

    रुटीन चेकअपसाठी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात

    शरद पवार ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल. रुटीन चेकअपसाठी शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात. वैद्यकीय तपासण्यांसाठी शरद पवार रुग्णालयात आले आहेत.

  • 27 May 2026 09:40 AM (IST)

    उमरग्यात मान्सून पूर्व पावसाची तुफान बॅटिंग, उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

    उमरगा शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक वातावरणामध्ये बदल झाल्याने मान्सूनपूर्व पाऊस. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून गेल्या काही दिवसांच्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे ऊस पिकाला संजीवनी.

  • 27 May 2026 09:26 AM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपीची घुसखोरी

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपीची घुसखोरी. मंदिरांच्या विश्वस्तांकडूनच काही व्यक्तींना व्हीआयपी म्हणून मंदिरात एंट्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी आपल्या जवळच्यांना दिली व्हीआयपी म्हणून मंदिरात एंट्री. पुरुषोत्तम अधिकमासानिमित्त व्हीआयपी दर्शन बंद असतानाही व्हीआयपी कल्चर चालूच. मंदिरात व्हीआयपी म्हणून घुस्करी केली तर कारवाई करू असा जिल्हाधिकाऱ्यांनी कालच दिला होता इशारा.

  • 27 May 2026 09:16 AM (IST)

    पिस्तुलाने धमकावत पोलीस उपनिरीक्षकाचा लग्नाला नकार

    बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर याने विवाहाला 11 दिवस राहिलेले असताना तुमची मुलगी मला शोभत नाही म्हणत, पिस्तुलने धमकावले आणि लग्नाला नकार दिला. या प्रकरणात चकलांबा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपनिरीक्षकाच्या बाजूने देखील तक्रार देण्यात आली आहे.

     

  • 27 May 2026 08:50 AM (IST)

    कुंभकामांचा दर्जा तपासणार मुंबईची आयआयटी

    कुंभमेळ्यातील कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी बाह्ययंत्रणेद्वारे विषय तज्ज्ञ, सल्लागार यांची नेमणूक करण्याचा निर्णय. प्रामुख्याने गुणवत्ता नियंत्रण सल्लागार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, विधी सल्लागार यांची नेमणूक केली जाणार. त्याचप्रमाणे ‘आयआयटी मुंबई’ ही त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्था म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय. कुंभमेळा प्राधिकरण ही सेवा दोन वर्षासाठी घेणार असून त्यासाठी ४ कोटी ७४ लाखांच्या खर्चाला मान्यता

  • 27 May 2026 08:40 AM (IST)

    बेकायदा बांधकामामुळे ठाण्यातील 14 ठिकाणी पाणी तुंबणार!

    ठाणे शहरातील नौपाडा प्रभाग समिती मध्ये सर्वाधिक फटका.महापालिकेच्या सर्वेक्षणात बाब उघड. नौपाडा, उथळ सर माजीवाडा मानपाडा कळवा दिवा आणि लोकमान्य नगर प्रभाग समिती या भागात पाणी तुंबण्याची शक्यता….

  • 27 May 2026 08:30 AM (IST)

    विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू

    शिवसेनेला पाच जागा मिळाव्यात आणि सहावी जागा छत्रपती संभाजी नगर किंवा रायगड ही मेरिटच्या आधारे जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता मिळावी अशी मागणी. ठाणे-पालघर – रविंद्र पाठव नाव जवळपास निश्चित
    हिंगोली परभणी – अभिमन्यु खोतकर किंवा बिप्लव बजोरीया, छत्रपती संभाजी नगर – राजेंद्र जंजाळ किंवा बाजीराव चव्हाण, नाशिक – हेमंत गोडसे, सईद खान, भाऊसाहेब चौधरी, रायगड – विकास गोगावले , भरत गोगावले यांचे सुपुत्र
    जळगाव – प्रतापराव पाटील , गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र

  • 27 May 2026 08:25 AM (IST)

    नाशिक विधानपरिषद जागेवर आता राष्ट्रवादीचाही दावा

    नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच तीव्र. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा ठोकला. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक जागेचा फैसला होण्याची शक्यता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अॅड. शिवाजी सहाणे चर्चेत. जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

     

  • 27 May 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहरातील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय निकडीच्या पार्श्वभूमीवर तीन पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या व नियुक्तीचे आदेश. आडगाव मुंबई नाका देवळाली आणि सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या अंतर्गत बदल्या
    बदल्या व नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्तालयाकडून जारी

  • 27 May 2026 08:15 AM (IST)

    नाशिकमधील NH-60 वरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक मार्गाच्या 6-पदरीकरणाला मंजुरी

    द्वारका ते नाशिक रोड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार. केंद्राकडून २२१.५२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी. द्वारका सर्कल – उपनगर नाका – दत्त मंदिर चौक मार्गाचा होणार विस्तार. मुख्य मार्गासह दोन्ही बाजूंना २-पदरी सर्विस रोडची उभारणी. वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ घटवण्यावर भर. रस्ते सुरक्षेसह वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्याचे उद्दिष्ट. २०२७ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता महत्वाचा. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत दिली माहिती

  • 27 May 2026 08:14 AM (IST)

    नाफेडकडून आठ दिवसांत केवळ 50 टन कांदा खरेदी, शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांकडे पाठ

    सरकारने 1580 रुपये दर जाहीर केला तरी बाजार समित्यांमध्ये 1800 रुपयांपर्यंत भाव. जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद, अनेक केंद्रांवर शुकशुकाट. कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रांवरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज. नाफेड आणि NCCFच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Follow Us