Maharashtra News LIVE : उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा.. नाशिक विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट.

Maharashtra News LIVE : मान्सूनने हुलकावणी दिली आहे. मान्सून उद्या राज्यात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर आज नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे.

Maharashtra News LIVE : उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा.. नाशिक विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट.
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 9:14 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Jun 2026 09:40 AM (IST)

    शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू

    गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलना दुसऱ्या दिवशीही सुरू_ मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी या आंदोलनाला मुक्कामी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत. विमानतळ जमीन अधिग्रहणाच्या विरोधात 14 गावातील शेतकरी विरोध करीत आहेत. एमआयडीसी विमानतळ नको आमची सुपीक जमीन आम्हालाच राहू द्या_ अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सुरू असलेला अधिग्रहण प्रक्रिया रद्द करण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी

  • 05 Jun 2026 09:30 AM (IST)

    मतीन पटेलची आयटी कंपनी लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात तिसऱ्यांदा चौकशी

    तब्बल सहा तास विशेष पथकाकडून करण्यात आली चौकशी. संशयित आरोपी निदा खान हिला हनीफ खान याच्या घराची चावी मतीन पटेल यानेच उपलब्ध दिली होती करून. नंतर निदाने हनीफच्या घरात आश्रय घेतल्याचे तपासात उघड. निदाला आश्रय देण्यात माझा संबंध नाही, मी निदाला ओळखत नाही मतीन पटेल ने दिली होती अशी माहिती. मात्र, निदा खान आणि मतीन पटेल यांचा संपर्क नेमका कधी, कुठे आणि कोणाच्या माध्यमातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही

  • 05 Jun 2026 09:05 AM (IST)

    उमेदवारी कायमच ठेऊन पाठिंबा द्या.. नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी..

    नाशिक विधान परिषदेमध्ये मोठी ट्वविस्ट आलाय. उमेदवारी कायम ठेऊन दराडेंना पाठिंबा द्या, असे शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. गीते यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. त्यामध्येच आता ही मागणी करण्यात आली.

  • 05 Jun 2026 09:00 AM (IST)

    आज मुंबईत संमिश्र वातावरण कुठे ढगाळ तर कुठे कडक ऊन

    आज मुंबईत संमिश्र वातावरण कुठे ढगाळ तर कुठे कडक ऊन असेल. वातावरणातील आद्रता वाढली आहे. उद्या आणि परवा पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनने केरळ किनारपट्टीवर दाखल, गाठली, येत्या 48 तासांत गोवा, कर्नाटक आणि तळ कोकणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. 5 आणि 6 जून रोजी कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि डहाणू परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारे दमदार पश्चिमेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे वातावरणात मोठे बदल होणार आहेत.

  • 05 Jun 2026 08:50 AM (IST)

    नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध

    नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध आले आहेत. नाबार्डच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांत पुनरुज्जीवन आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 05 Jun 2026 08:40 AM (IST)

    नाशिक मधील नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार- मंत्री गिरीश महाजन

    नंदिनी नदी स्वच्छ करण्यासाठी आपण आलो आहोत. नाशिक चे नावलौकिक जगभरात आहे. दहा बारा पंधरा हजार स्वयंसेवक आहे. आपली नदी स्वच्छ असावी प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक येतील त्यांनी कौतुक केले पाहिजे. कायम स्वरुपी आपल्याला नाशिक स्वच्छ सुंदर ठेवायचे आहे. आपल्या हे काम करायचे आहे. पर्यावन दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

  • 05 Jun 2026 08:30 AM (IST)

    मी भाजपमध्ये आजही आहे आणि उद्याही राहील-प्रसाद हिरे

    मी भाजपमध्ये आजही आहे आणि उद्याही राहील, असे वक्तव्य MLC नाशिक उमेदवार प्रसाद हिरे यांनी केले आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा व बळीराम हिरे यांचा मला वारसा आहे. मला दृढनिष्ठ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीशजी महाजन यांची आहे. विधान परिषदेचे निवडणुकीत मी यशस्वी होईल. माझ्यामागे अनेक ताकदी उभ्या आहेत. ही निवडणूक मी फार मताधिक्याने निवडणार आहे. शिंदे सेनेने दिलेला उमेदवार, नाराजी मला जाणवली. नाराजीला तोंड फोडण्यासाठी मी उमेदवारी करण्याचा निर्णय केल्याचे ते म्हणाले.

  • 05 Jun 2026 08:20 AM (IST)

    फुगेवाडी मधील विषारी दारु अड्ड्यावरील कारवाई आज ही सुरूच राहणार

    विषारी दारुकांडाचा अड्डा असलेला पिंपरी चिंचवडमधील केंद्रबिंदू आज ही तोडण्याची कारवाई सुरूच राहणार आहे. फुगेवाडीत निमुळते रस्ते असल्यानं जेसीबी आणि पोकलेन सारखी मशनरी इथं पोहचू शकत नाही. परिणामी हॅन्ड ब्रेकर आणि हतोड्याच्या साह्याने हे पाडकाम हाताने केलं जातंय. हे आव्हान यंत्रणेसमोर असल्यानं कर्नेलसिंगचं घर आणि त्या घरातील दारुअड्डा जमीनदोस्त करायला उशीर होतोय. काल काही प्रमाणात हा दारू अड्डा तोडण्यात प्रशासनाला यश आलं होतं,आज पूर्ण घर तोडण्याची शक्यता

     

  • 05 Jun 2026 08:10 AM (IST)

    भाजयुमोकडून ‘पेडल फॉर प्लॅनेट’चे आयोजन

    बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजयुमो मुंबईतर्फे ‘पेडल फॉर प्लॅनेट (ग्रँड सायक्लोथॉन)’चे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन,आरोग्य जागरूकता आणि हरित भविष्याचा संकल्प यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे ‘पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन’ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम विविध लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, कलाकार उपस्थित राहून युवकांना प्रोत्साहन देणार आहेत.

  • 05 Jun 2026 08:06 AM (IST)

    रांजणगाव गणपती येथे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

    रांजणगाव गणपती येथे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. धावत्या एसटी बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी तातडीने बसमधून उड्या मारल्याची घटना घडली. अहिल्यानगरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस रांजणगाव गणपती येथील अमर इन हॉटेलसमोर पोहोचली असताना बसमधून अचानक धूर निघू लागला. धूर दिसताच बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.बस चालकाने बस थांबविली आणि काही प्रवाशांनी तातडीने बसमधून खाली उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला.

Maharashtra News LIVE : मान्सूनने हुलकावणी दिल्याने आणि तो वेळेत दाखल न झाल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. मान्सून उद्यापासून राज्यात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी येत्या 10 जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून थेट दिल्ली विमानतळावर दाखल होतील आणि तिथून ते मैदानावर जाणार असल्याचे समजते. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 6 जागा बिनविरोध निवडून आणण्यात महायुतीला मोठे यश आले आहे. तर उर्वरीत 11 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने असेल. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय होत असले तरी शासन निर्णयाचा कागद हाती आला नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी
आणि अपडेट इथं वाचा.

 

Follow Us