Maharashtra News LIVE : पुणे आंदोलन प्रकरणात उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
Maharashtra News Live : पुण्यात एमपीएससीचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आज आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसह एमपीएससी आयोगाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत केले आंदोलन तीव्र केले आहे. दुसरीकडे दिल्लीत निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांनी कित्येक तास ठिय्या आंदोलन केले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पुणे आंदोलन प्रकरणात उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनांच्या विरोधात “पुणेकर” नागरिकाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात आंदोलकांनी तात्काळ जागा सोडावी, आंदोलनकर्त्यांना निश्चित करून एक जागा द्यावी तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त यासह तिन्ही आंदोलनाच्या प्रमुख आयोजकांना नोटीस जारी केली आहे.
-
सरकारने लवकर तोडगा काढला नाही तर MPSC आंदोलन तीव्र – रोहित पवार यांचा इशारा
रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसह एमपीएससी आयोगाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत केले आंदोलन तीव्र केले आहे. सरकारला आंदोलन सोडवायचे आहे, मात्र त्यांचा इगो आडवा येतो आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. सरकारने लवकरात लवकर आंदोलन संदर्भात निर्णय घेतला तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
-
-
उद्या आणि परवा पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होईल
उद्या आणि परवा पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होईल, आजची पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपली आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपली
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होती, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपली आहे.
-
आधी फूट आणि नंतर अपात्रचेवर कारवाई असा क्रम लावता येणार नाही- काैल
आधी फूट आणि नंतर अपात्रचेवर कारवाई असा क्रम लावता येणार नाही, असा मोठा युक्तीवाद काैल यांनी केला.
-
-
राणा खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात आहे- काैल
राणा खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात आहे, असा मोटा युक्तीवाद कोर्टात काैल यांनी केला.
-
संघटनात्मक चाचणी एखाद्या पक्षाची अंतर्गत रचना- काैल
संघटनात्मक चाचणी (organisational test) घेताना एखाद्या पक्षाची अंतर्गत रचना मुळातच अलोकशाही स्वरूपाची असेल, तर त्या पक्षाच्या घटनेनुसार पदांवर असलेल्या व्यक्ती कायदेशीर असू शकतात, पण त्या रचनेतून पक्षाला प्रत्यक्ष तळागाळात किती जनसमर्थन आहे, हे स्पष्टपणे दिसते का?”
-
अपात्रतेचा प्रश्न समोर होता- काैल
विधानमंडळातील पक्ष हा त्या वेळी निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत चांगला निकष होता… मात्र आता अपात्रतेचा प्रश्न समोर आहे
-
शिंदेंच्या वकिलांचा मोठा दावा
ज्यांनी घटनात्मक पाप केले आहे, त्यांच्यासाठी पक्षचिन्हाचे महत्त्व लागू होईल की, ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रार केली आहे त्यांच्यासाठी?”
-
शिनसेना शिंदे गटाचे वकील काैल यांचा कोर्टात मोठा दावा..
ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली नाही, असा मोठा युक्तीवाद यावेळी कोर्टात शिवसेना शिंदे गटाचे वकील असलेल्या काैल यांनी केला.
-
शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा..
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यानच शिंदे गटाचे वकील काैल यांच्याकडून मोठा युक्तीवाद केला जात आहे.
-
आधी फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही- काैल
आधी फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही. ‘राणा’ खटल्याचा अर्थ चुकीचा लावला जात आहे
-
नीरज किशन कौल यांच्याकडून आज वेगवेगळ्या केसेसचे दाखले
कौल यांनी सुरुवातीला राणा केस, नंतर सुभाष देसाई केसचा दाखला दिला. नीरज किशन कौल ‘राणा’ खटल्याचा दाखला देत स्पष्ट केल की अपात्रतेचा निर्णय हा अपात्रता याचिका दाखल केलेल्या तारखेच्या परिस्थितीवर आधारित असावा
-
शिंदेंच्या शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद
नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद. ठाकरे त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायची तयारी दर्शवली नाही.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून बाजू मांडली जात आहे.
-
राज्याच्या दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात
राज्याच्या दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात. समितीचे अध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे याच्या उपस्थित बैठक सुरु. राज्यातील दुष्काळ बाबत दर आठ दिवसाला आढावा घेतला जातो
-
दिल्ली-आकशवाणी बाहेर NSUI च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
सकाळपासून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत विरोधकांकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मात्र, त्यानंतर दिल्ली-आकशवाणी बाहेर NSUI च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आहे.
-
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न- फडणवीस
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या नेत्यासाठी किंवा पक्षासाठी कोणी राजकारण करत असेल, तर त्या राजकारणाला राजकारणातूनच उत्तर दिलं जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
संविधानावरुन विश्वास उडावा यासाठी काँग्रेसचे प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
संविधानावरुन विश्वास उडावा यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसकडून संवैधानिक संस्थांची बदनामी करत आहेत. हातात संविधान घेऊन काँग्रेसची असंवैधानिक कृती सुरु आहे. लोकांच्या मनात असंवाधानिकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
इंडिया आघाडीच्या खासदारांच्या आंदोलनाला फळ मिळणार – यशोमती ठाकूर
देशामध्ये अरेरावी सुरू आहे काल टिळक भावनांमध्ये मध्ये पोलिसांनी घुसून विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.. आज खासदार गेले त्यांना पण थांबवण्यात आलं खासदारांचे हाल करत आहे मग आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही… आंदोलन करणे अधिकार आहे.. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या आंदोलनाला फळ मिळणार… जे काही होत आहे जे लोकशाहीच्या विरोधामध्ये होत आहे… असं वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
-
काँग्रेसने लोकशाहीची गळचेपी केलीय – भाजप
काँग्रेसने लोकशाहीची गळचेपी केलीय. विरोधकांना पराभव सहन होत नाहीये आणि विरोधक बोगस मतरारांविषयी बोलतात. काँग्रेस प्रत्येक संस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत आहे… असं वक्तव्य भाजपने पत्रकार परिषदेत केलं आहे.
-
ज्ञानेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात मताची चोरी करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला मदत केली – एकनाथ खडसे
ज्ञानेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात मताची चोरी करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला मदत केली असा आरोप आहे. आज अशी स्थिती आहे निवडणुकीच्या आधी मतदार वगळणं हे संशयास्पद आहे ज्ञानेश्वर कुमार यांनी राजीनामा द्यावा त्यामुळे देशभरात मोर्चे निघत आहे. असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
-
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी आकाशवाणी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी आकाशवाणी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे काढण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या मोर्चादरम्यान पोलीस त्यांना अडवत आहेत.
-
पुणे मतदार संघावर शिवसेनाचा दावा – उदय सामंत
पुणे मतदार संघावर शिवसेनाचा दावा आहे. याच जागा ज्याहोत्या त्यापैकी नागपूरची जागा ही 100 भाजपला चर्चेत सोडण्यात आलेली. अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आलेली, त्यानंतर संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आलेली आणि शरद लाड ज्याठिकाणी इच्छुक होते, ती जागा भाजपला सोडलेली… असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होतं.
-
दिल्ली पोलिसांचं DCP देखील आकाशवाणी भवनात पोहोचले
दिल्ली पोलिसांची एक बस आकाशवाणी भवनात दाखल झाली आहे. तर दिल्ली पोलिसांचं DCP देखील आकाशवाणी भवनात पोहोचले आहेत. गेल्या 45 मिनिटांरापासून राहुल, प्रियंका गांधी आकाशवाणी भवनात आहेत.
-
ठाणे महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांचं पेन डाउन आंदोलन
ठाणे महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांचं पेन डाउन आंदोलन सुरू आहे. नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्यासोबतच्या वादानंतर अधिकारी आक्रमक झाले आहेत . ठाणे मनपा अधिकारी काळ्या फिती लावून आंदोलन करत आहे. महापौर दालनासमोर ठाणे मनपा अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रभागसमिती कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्या सोबत टेंडर प्रक्रियेवरून नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी वाद निर्माण केल्याने सर्व अधिकारी नाराज झाले होते.
-
राहुल गांधी, प्रियंका गांधी आकाशवाणी भवनात पोलिसांच्या ताब्यात
राहुल गांधी यांना आकाशवाणी भवनात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलकांनी आकाशवाणी भवनाच्या गेटवरून चढून कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. या आकाशवाणी भवनातून निवडणूक आयोगाच्या मुख्यन्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना आकाशवाणी कार्यालयाच्या गेटवर रोखलं
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना आकाशवाणी कार्यालयाच्या गेटवर रोखलं आहे. राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षातील खासदार आहेत. राहुल गांधी मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने जात आहेत.
-
राहुल गांधी, प्रियंका गांधी आकाशवाणी भवनात पोहोचले
राहुल गांधी, प्रियंका गांधी आकाशवाणी भवनात पोहोचले आहेत . निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्यावर विरोधक ठाम आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
-
राहुल गांधी, प्रियंका गाांधी पोलिसांच्या ताब्यात
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत वातावरण तापलं आहे. इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमारांच्या विरोधात मोर्चा काढला. राहुल गांधी, प्रियंका गाांधी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे. तर काही खासदारांनी बसच्या टपावर बसून घोषणाबाजी केली. मोर्चातील आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम पोलीस करत आहेत.
-
सोलापुरात तापमानाचा पारा वाढला
सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतेय. ऑक्टोबर हिटमुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत. सोलापुरात 37.4 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झालीय. एरव्ही परतीच्या पावसाच्या धारेत भिजणारे सोलापूरकर आता घामांच्या धारात भिजताना पाहायला मिळत आहेत.
-
महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखी का वागतेय? अभिजीत दिपकेंचा सवाल
महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखी का वागतेय? असा सवाल अभिजीत दिपकेंनी केला आहे. आदिवसी विद्यार्थ्यांवर दडपशाही केली. आमचं गांधी, आंबेडकरांवर बोलणं हे पोलिसांना हिंसक वाटत आहे का, असे दिपके पुढे म्हणाले.
-
राहुल गांधींचे बॅरिकेड्सवर चढून आंदोलन
ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा असा घोषणा देत दिल्लीत इंडिया आघाडीने हल्लाबोल चढवला आहे. राहुल गांधींनी थेट बॅरिकेड्सवर चढून आंदोलन केले आहे.
-
19 पक्ष ज्ञानेश कुमारांविरोधात रस्त्यावर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीतील जवळपास 19 पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. ते निवडणूक आयोगाच्या कारभारावर संतप्त आहेत. ज्ञानेश कुमार यांनी भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
-
ज्ञानेश कुमार यांना जनता हटवणार- आखिलेश यादव
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘ज्ञानेश कुमार यांना जनता हटवणार’ असे स्पष्ट म्हटले आहे.
-
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या 100 मीटरवर ठिय्या आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा संसदभवन परिसरातून निघून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आसपास पोहोचला आहे. आयोगाच्या कार्यालयाच्या 100 मीटरवर ठिय्या आंदोलन सुरु आहे.
-
जया बच्चन, मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणाबाजी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या मोर्चात खासदार जया बच्चन, मल्लिकार्जुन खर्गे देखील सहभागी झाले आहेत. हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दाखल झाला आहे.
-
इंडिया आघाडीचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्ली संसदभवन येथून मोर्चा निघाला. इंडिया आघाडीचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दाखल झाल्याचे दिसत आहे.
-
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे ठिय्या आंदोलन
दिल्ली संसदभवन परिसरात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा आक्रमक मोर्चा पाहायला मिळत आहे. या मोर्चात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे ठिय्या आंदोलन.
-
ललिता तारखवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
आपली किंमत किती आहे तर दिड लाख रुपये…महाराष्ट्रातील समाज रस्त्यावर आला पाहिजे…ललिता तारख यांच्यावर मी बोलणार नाही….
अंतरवली सराटी या गावाने समाजासाठी खुप काही केले मी त्यांच्या वर काही बोलणार नाही…आपण संयमाने घ्यायचे…एक दिवस त्यांनाच कळेल आपलं चुकलं…त्या आपल्या भगिनी आहे…त्यांना सुद्धा थांबलं पाहिजे शेवटी आपल्या समाजाचा विषय आहे…. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. -
शरद पवार यांचे ८ खासदार तर TMC चे ही ८ खासदार या मोर्चात सहभागी
शरद पवार यांचे ८ खासदार तर TMC चे ही ८ खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत, मोर्चाला आता सुरुवात झाली आहे.
-
दिल्ली संसदभवन परिसरात मोठा फौजकाटा तैनात
ज्ञानेश कुमार हटाव असं म्हणत इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत. दिल्ली संसदबवन परिसरात मोठा फौजकाटा तैनात
-
मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी राहुल गांधी आणि खरगे यांच्यात बैठक
इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी राहुल गांधी आणि खरगे यांच्यात बैठक पार पडली, आता लवकरच मोर्चाला सुरुवात होणार आहे.
-
१५ दिवसांत सरकारने माझ्या जवळची माणसं फोडली-मनोज जरांगे पाटील
१५ दिवसांत सरकारने माझ्या जवळची माणसं फोडली….मी गरिबाचा गरिबांसाठी लढणार….माझ्या विरोधात बोलणारे त्यांना पश्चात्ताप…. समाज संकटात असताना बाजुने उभा रहा…..मी शांत आहे तोपर्यंत मी बोलणार नाही…. आलेल्या संकटाला तोंड द्या शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
इंडिया आघाडीच्या मोर्चामुळे कंडक बंदोबस्त तैनात
दिल्ली संसद भवन परिसरात इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. मोर्चामुळे कंडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाला विरोधक घेराव घालणार आहे.
-
इंडिया आघाडीच्या मोर्चाला आता सुरुवात
इंडिया आघाडीच्या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे, लोकशाही वाचवा असं म्हणत या आंदोलनला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीचे १५० पेक्षा जास्त खासदार आंदोलनात सामील झाले आहे.
-
रोहित पवारांच्या आंदोलनाचा भिंग हा काल राज ठाकरे यांनी फो़डला- नवनाथ बन
रोहित पवारांच्या आंदोलनाचा भिंग हा काल राज ठाकरे यांनी फो़डला, राज ठाकरे यांना धन्यवाद, त्यांनी रोहित पवार यांचे कानटोचणी केली आहे. असं भाजपा प्रवक्ता नवनाथ बने म्हणाले.
-
केळीला भाव मिळेना, भुजल पातळी ही खालावली,शेतकऱ्याने उभी बाग केली उद्ध्वस्त
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे दीड एकर उभ्या केळीच्या बागेवर शेतकऱ्याने रोटर फिरवलाय. मागील दोन महिन्यापासून पावसाने खंड दिला, संरक्षित पाण्याच्या भरोशावर त्यांनी आजपर्यंत केळीची बाग जतन केली. पण आता भूजल पातळी खालावली असून पाऊस होण्याची आशा मावळल्याने शेतकरी पंडित कल्याणकर यांनी हे टोकाचे पाऊल उचललय. लाखो रुपये खर्च करून ही केळीला म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात मेहनतीने उभ्या केलेल्या फळ बागेवर आता शेतकरी ट्रॅक्टर फ्रिरवू लागलीयेत. पिकांवर नांगर फिरवण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. पावसाआभावी शेतकरी अस्थिर झाले असल्याने प्रशासनाने या नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडुन केली जात आहे.
-
आमदार गोपीचंद पडळकर, खासदार विशाल पाटील उमेदवारीवरील हरकतीचा आज होणार फैसला
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारीची अर्ज प्रक्रिया सोमवारी पार पडली होती.छाननी दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, खासदार विशाल पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी,भाजपाचे आमदार सुरेश खाडेंच्या सूनबाई,भाजपा आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह ९ जणांच्या उमेदवारीवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.या सर्व हरकतींची सुनावणी पार पडली आहे.आज निवडणूक अधिकाऱ्यांकडून हरकतींचा निकाल देण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा अर्ज वैध ठरणार आणि कुणाचा अवैध ठरणार याबाबत उत्सुकता लागून राहिली असून विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
-
मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक; कसारा-आसनगाव दरम्यान लोकल सेवेवर परिणाम. तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा-आसनगाव दरम्यान विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक. 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी 3.35 ते रात्री 8.35 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉकच्या काळात N-24, N-26, N-28 आणि N-30 या लोकल रद्द राहणार. ब्लॉकपूर्वी कसारा येथून CSMTकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता सुटणार. ब्लॉकनंतर कसारा येथून CSMTकडे जाणारी पहिली लोकल रात्री 8.15 ऐवजी 8.35 वाजता सुटणार. आसनगाव ते CSMT लोकल सेवा मात्र सुरू राहणार असल्याची माहिती
-
तिरोड्यात दुष्काळानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर
तिरोड्यात दुष्काळानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर….नुकसानग्रस्त धान पिकांचे पंचनामे सुरू….कृषी अधीक्षक निलेश कानवडे शेताच्या बांधावर….नुकसानीची घेतली प्रत्यक्ष पाहणी. धान पिकांच्या पंचनाम्यांना वेग…..शासनाकडे तातडीने अहवाल पाठविण्याचे निर्देश.
-
भाजप खासदार अनिल बोंडेंच्या भगिनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत
भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे बोंडे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात… खासदार अनिल बोंडे यांच्या पत्नी डॉक्टर वसुधा बोंडे यांनी केलं संगीता शिंदे यांचे औक्षण आणि विजयासाठी दिल्या शुभेच्छा..अमरावती विभागातील भाजपचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे…मी भाजप पक्षासाठी काम केला आहे..माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे..अनिल बोंडे यांच्या संदर्भात बोलताना संगीता शिंदे बोंडे यांना अश्रु अनावर
-
डोंबिवलीत विवाहितेला ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार
डोंबिवलीत विवाहितेला ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार. मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध; नंतर 70 हून अधिक शारीरिक संबंधाचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल. विवाहितेने संबंध तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट पतीला पाठवला फोटो. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत 22 वर्षीय आरोपी कुणाल शिंगाडेला ठोकल्या बेड्या
-
मंगेश चिवटे आज उमेद्वारी अर्ज दाखल करणार
शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी १० वाजता जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने पदवीधरसह शिक्षक मतदारसंघावर दावा केलेला असतानाही नवीन घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
-
आदिवासी शेतकरी दुष्काळभरपाईसाठी आक्रमक
नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी दुष्काळ भरपाईसाठी आक्रमक झाले आहेत. फार्मर आयडी नसल्याने दुष्काळाची मदत मिळणार कशी? आदिवासी शेतकऱ्यांचा सवाल आहे. वनहक्क दावे प्रलंबित असल्याने फार्मर आयडी मिळण्यात अडचणी असल्याचा त्यांचा दावा आहे. वनहक्क दावे निकाली काढून तात्काळ फार्मर आयडी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांसाठी धडगाव शहरातून तहसील कार्यालयावर भव्य इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सातपुड्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग असेल.
-
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी लागलेला एल ई डी स्क्रीन पोलिसांनी काढला
रोहित पवार यांचा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी लागलेला एल ई डी स्क्रीन पोलिसांनी काढला. विना परवानगी लावण्यात आल्याने स्क्रीन काढण्यात आला आहे. पोलिसांनी एल ई डी स्क्रीन काढल्या
-
भीमनवारांनी राजीनामा पाठवला- रोहित पवार यांचा दावा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे जीवलग मित्र असल्याचा टोलाही पवार यांनी आताच माध्यमांशी बोलताना हाणला.
-
सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची संवाद बैठक
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज चार गावांमध्ये संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार यांच्या पॅनेलच्या प्रचारासाठी या बैठका होत असून, कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार हे सहा गावांचा दौरा करणार आहेत. तर दुसरीकडे युगेंद्र पवार सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने 17 गावांचा दौरा करणार आहेत.शरद पवार गटाचे श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पुरुषोत्तम जगताप यांचाही लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची लढत तिरंगी होणार असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
-
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीवरून पालिका विरुद्ध NHAI सामना
नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामावरून नगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. नंदुरबार पालिका हद्दीत महामार्गाची रुंदी ३० मीटरऐवजी केवळ १८ मीटरच केली जात असल्याचा आक्षेप पालिकेने घेतला आहे. त्यामुळे सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्याची सूचना पालिकेने संबंधित विभाग आणि ठेकेदाराला दिली आहे. सोनगीर ते धानोरा रोडच्या कामासाठी एमएसआरडीसी, तर विसरवाडी ते कोळदा आणि शेवाळी-नॅत्रंग महामार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयला पालिकेने पत्र दिले आहे. प्रस्तावित रुंदीपेक्षा कमी रुंदीचा रस्ता झाल्यास भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आणि नगर अभियंता गणेश गावित यांनी पालिकेच्या पथकासह सुरू असलेल्या रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्याचे मोजमापही करण्यात आले. त्यानंतर पालिकेने या प्रकरणात कडक भूमिका घेत संबंधित विभाग आणि ठेकेदाराला पालिका हद्दीतील काम थांबविण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे आता महामार्गाच्या रुंदीवरून नगरपालिका आणि संबंधित रस्ते विकास प्राधिकरणांमध्ये वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
-
कर्जमाफी योजनेतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करा- आमदार कैलास पाटील
धाराशिव जिल्ह्यात कर्जमाफी योजनेतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.कर्जमाफीच्या दोन याद्यांमध्ये ६७ हजार ६१९ शेतकऱ्यांची नावे असून, ११ हजार ७४७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. तर ४ हजार ५९८ शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याचे पोर्टलवर दाखवले जात आहे.ॲग्रीस्टॅक आणि कर्जमाफी पोर्टलमध्ये समन्वय नसल्याने ही अडचण निर्माण होत असल्याचा दावा कैलास पाटील यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पोर्टल तातडीने समक्रमित करण्याची मागणी त्यांनी सहकार आयुक्तांकडे केली.तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांची प्रक्रिया सुलभ करून, सर्व वारसांचे संमतीपत्र घेऊन एका प्रमुख वारसाच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करावी, अशी मागणीही आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
-
गडचिरोली शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे संकट
गडचिरोली शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील तीन ते चार पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने ‘नो डिझेल, नो पेट्रोल’चे फलक लावण्यात आले आहेत. विशेषतः मागील तीन दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत असून, एचपीच्या पेट्रोल पंपांवर याचा अधिक परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद
धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६२ टक्के पावसाची नोंद झाली असून, २२५ पैकी तब्बल ५० प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ११४ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या असून, २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच सहा गावांना आठ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ६.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
-
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर कंटेनर आणि खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर कंटेनर आणि खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातात बसमधील ५ ते ६ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गाने द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आले होते. अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
-
सोलापूर शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांविरोधात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची आक्रमक भूमिका
सोलापूर शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांविरोधात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार कोठे यांनी मध्यरात्री शहरातील विविध भागात फिरून रस्त्यांवर पडलेल्या कचऱ्याची पाहणी केली आणि यावेळी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. सोलापूर शहर कचरामुक्त आणि धुळमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहणीदरम्यान अनेक घंटागाडी चालक घरोघरी जाऊन कचरा संकलित करत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी घंटागाड्यांकडून केवळ रस्त्यावर साचलेला कचरा उचलला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या घंटागाडी चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दररोज एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
-
नाशिककरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट
नाशिककरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. राज्यातील मर्यादित जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान १० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. यासंदर्भात आज होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
-
नाशिक- नऊ महिन्यांपासून रखडलेल्या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात
नाशिक महापालिका निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय पक्षांना आता दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने नियुक्तीची प्रक्रिया गतिमान केली आहे. त्यानुसार येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांसाठी इच्छुक उमेदवारांची नावे महापालिकेकडे सादर करावी लागणार आहेत. पक्षांकडून उमेदवारांची नावे प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारून त्यांची छाननी करण्यात येईल.
-
यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर मध्यरात्रीपासून अपघातांची मालिका
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर मध्यरात्रीपासून अपघातांची मालिका पाहायला मिळाली. पहाटे सुमारे ३ वाजता केळी वाहतूक करणारा पिकअप टेम्पो अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पलटी झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केळी विखुरल्याने मिसिंग लिंकवर अक्षरशः केळ्यांचा ढीग साचला होता. अपघातग्रस्त टेम्पो आणि रस्त्यावर पडलेल्या केळी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, याच मार्गावर बस आणि ट्रकमध्येही भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ ते ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता आणि साफसफाईला वेग आला आहे. मंदिराचं शिखर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात येत आहे. नवरात्रौत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे.
संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचे धरणनिहाय आणि वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केलं आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं असून 16 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्राने उपलब्ध एकूण वापरापैकी किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..