Maharashtra News LIVE : इराणच्या क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला

Maharashtra News LIVE Updates: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचे फोटो , व्हिडीओ समोर आल्यावर रुपाली चाकणकरांवर चहूबाजूंनी टीका झाली. त्यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Maharashtra News LIVE : इराणच्या क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला
| Edited By: | Updated on: Mar 21, 2026 | 7:02 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Mar 2026 06:55 PM (IST)

    इराणच्या क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला

    इस्रायलने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्याला लक्ष्य करून मोठा हल्ला चढवला आहे. या बॉम्बस्फोटामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.

  • 21 Mar 2026 06:42 PM (IST)

    हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला चढवला

    हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठे हल्ले केले आहेत. मेटुलामधील अनेक इमारतींना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्यात आले आहे.

  • 21 Mar 2026 06:25 PM (IST)

    इराण विनाशकारी क्षेपणास्त्रे विकसित करत असल्याचा दावा

    युद्धाच्या काळात इराण विनाशकारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. क्षेपणास्त्र उत्पादनाबाबत आयआरजीसीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यात कोणतीही कमतरता नाही. इराणने अमेरिका आणि इस्रायलसाठी अजूनही अनेक आश्चर्ये राखून ठेवली आहेत.

  • 21 Mar 2026 06:06 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला

    पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. या संभाषणाविषयीच्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले, आम्ही आशा व्यक्त केली की हा सणासुदीचा काळ पश्चिम आशियामध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल. या प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केला, जे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण करतात आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करतात. नौवहन स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे आणि सागरी मार्ग खुले व सुरक्षित राहतील याची खात्री करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराणने दिलेल्या सततच्या पाठिंब्याचे कौतुक केले.

  • 21 Mar 2026 05:54 PM (IST)

    चिपळूण : नागावे येथे प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग

    चिपळूण मधील नागावे येथे प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट पहायला मिळत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात असलेला साठा आगीच्या भक्ष स्थानी पडला आहे.

  • 21 Mar 2026 05:40 PM (IST)

    23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार – राजू शेट्टी

    23 मार्च रोजी मुंबई गोवा महामार्ग रोखणार ठरलेलं आंदोलन होणार म्हणजे होणार असं म्हणत राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलनाचा निर्धार केला आहे. 12 मार्च रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तळ कोकणातील बागायतदारांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर आता शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 21 Mar 2026 05:26 PM (IST)

    हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

    हिंगोली जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. टरबूज वेलावर भुरी रोग आल्याने उत्पादनात घट होणार आहे, त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

  • 21 Mar 2026 05:15 PM (IST)

    इचलकरंजी महानगरपालिकेचा अभ्यास दौरा; इंदूरच्या स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा

    इचलकरंजी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, महापौर उदय दहातोंडे, उपमहापौर तसेच अधिकारी यांचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात स्वच्छतेच्या बाबतीत देशात सलग अव्वल स्थान पटकावणाऱ्या इंदूर शहराच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला. इंदूर शहराने ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये सलग अनेक वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवत स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. घराघरातून कचरा संकलन, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प, प्लास्टिकविरोधी मोहिमा, तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग या गोष्टी इंदूरच्या यशामागील प्रमुख कारणे आहेत.

  • 21 Mar 2026 03:58 PM (IST)

    मुंबईतील डोसा विक्रेत्यांना सिलिंडर टंचाईचा मोठा फटका, व्यावसाय बंद ठेवण्याची वेळ

    युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा

    गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या मुंबईतील डोसा विक्रेत्यांना मोठा फटका

    सिलिंडर मिळत नसल्यानं व्यावसाय बंद ठेवण्याची वेळ

    सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, व्यावसायिकांची मागणी

     

     

  • 21 Mar 2026 03:45 PM (IST)

    जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

    गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली

    जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

    ऑर्डर देऊनही आठ दिवस उलटले तरीही इंडक्शन तसेच इलेक्ट्रिक शेगडी मिळत नाही, विक्रेत्यांची माहिती

  • 21 Mar 2026 03:30 PM (IST)

    अभिनेत्री खुशी मुखर्जी यांना धमकी

    अभिनेत्री खुशी मुखर्जी यांना मिळाली धमकी

    धमकी प्रकरणात  एफआयआर दाखल करण्यासाठी खुशी मुखर्जी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये

    जीवे मारण्याच्या आणि खंडणीच्या धमक्या मिळात असल्याचा आरोप

    प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

     

  • 21 Mar 2026 03:15 PM (IST)

    अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

    अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

    फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी माढा तालुक्यातील सुरली, अकोले, आढेगावात केली फळबागांची पाहणी

    युद्धामुळे अनेक जहाजं बंदरावर अडकून पडली

    निर्यात बंद झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात

     

     

     

  • 21 Mar 2026 02:55 PM (IST)

    सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

    मुलुंडच्या सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचा आरोप आहे. मनविसेचे विभाग अध्यक्ष प्रवीण राऊत आक्रमक, खळखट्याक आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिनेमागृहाच्या कारभावरून मनसे आक्रमक, पोलिसांचाबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 21 Mar 2026 02:45 PM (IST)

    दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी हसील कार्यालयासमोर आंदोलन

    गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरापासून जवळच असलेल्या किडंगीपार गावात 3 देशी दारूचे दुकान असून या देशी दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन किडंगीपार येथील शेकडो महिला पुरुषांनी आमगाव येथील तहसील कार्यालयावर 24 तासांपासून ठिय्या मांडला आहे. 20 मार्च रोजी दुपारपासून सुरू झालेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशी देखील सुरू असून काल सायंकाळी आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासनामध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे.. आणि मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या 10 एप्रिल ला रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक.

  • 21 Mar 2026 02:30 PM (IST)

    संजय निरुपम कुरार पोलीस ठाण्यात दाखल, हिंदू मुलींवर हल्ल्याप्रकरणी केली चौकशी

    काल रात्री मालाड पूर्वेकडील कुरार परिसरात हिंदू मुलींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते संजय निरुपम कुरार पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

  • 21 Mar 2026 02:15 PM (IST)

    त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे; अशोक खरात प्रकरणावर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया

    कॅप्टन अशोक खरात यांचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाने तातडीने यामध्ये खोलवर जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. यामध्ये एवढे व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यांचे ज्यांच्या सोबत त्याचे फोटोज आहे त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे केवळ राजकीय नेत्यांवर कारवाई होते हे ठीक आहे पण यासोबतच जे पोलीस अधिकारी इथले स्थानिक आहेत त्यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती होती ते झोपले होते का ? त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी

  • 21 Mar 2026 01:54 PM (IST)

    भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे- उद्धव ठाकरे

    भोंदूबाबासह त्यांच्या भोंदू भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे. नाशिकमधील अशोक खरात यांच्या व्हिडीओनंतर शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर यामधील गुन्हेगारांना शिक्षा करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

  • 21 Mar 2026 01:44 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त नवीन उपक्रम

    बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म शताब्दी वर्ष साजरा करताना नवीन उपक्रम सुरु केला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना रोजगार आणि नोकरीची संधी दिली. जमाना आता पुढे जात आहेत. लॉजिस्टिकमध्ये अनेक रोजगार आहे. नवी मुंबई एअरपोर्ट आणि बाकी सर्वच ठिकाणी काम उपलब्ध आहेत. या क्षेत्रात बराच वाव आहे. मागणी प्रमाणे माल उपलब्ध करणे हे ह्या लोकांचे काम आहेत. उत्कृठ मूळ आम्ही देणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 21 Mar 2026 01:32 PM (IST)

    मुंबईत हिंदू मुलींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 2 मुली, 1 मुलगा ताब्यात

    मुंबईत काल रात्री मालाड पूर्वेकडील कुरार परिसरात हिंदू मुलींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते संजय निरुपम कुरार पोलीस ठाण्यात पोहोचले. सध्या, कुरार पोलिसांनी या प्रकरणात दोन मुली आणि एका मुलाला अटक केली आहे.

  • 21 Mar 2026 01:25 PM (IST)

    भोंदूबाबा खरातचा रामरहिम झाल्याशिवाय राहणार नाही-संजय शिरसाट

    भोंदूबाबा खरातचा रामरहिम झाल्याशिवाय राहणार नाही. खरातला अनेक वर्ष तुरुंगात काढावे लागतील. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर खरात शिक्षेपासून वाचू शकत नाही-संजय शिरसाट

  • 21 Mar 2026 01:13 PM (IST)

    अमेरिकेने एका महिन्यासाठी इराणी तेलावरील निर्बंध हटवले

    अमेरिकेने एका महिन्यासाठी इराणी तेलावरील निर्बंध हटवले. वाढत्या जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, अमेरिकेने समुद्रात अडकलेल्या इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध तात्पुरते हटवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसांट यांनी सांगितले की, या तात्पुरत्या निर्णयामुळे 140 दशलक्ष बॅरल इराणी तेल जागतिक बाजारात उपलब्ध होईल.

  • 21 Mar 2026 01:00 PM (IST)

    बदनापूर आणि अंबड तालुक्यातल्या विविध वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका

    जालना जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी तडाखा देत चांगलंच झोडपून काढलं,बदनापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचं चित्र पहायला मिळत असून यामध्ये प्रामुख्याने काढणीस आलेल्या गहू पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले,शिवाय उन्हाळी मक्का आणि ज्वारीचं पीक देखील शेतातच आडवं झाल्याने उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 21 Mar 2026 12:50 PM (IST)

    डिझेलवर चालणारा चुल्हा

    सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल्स बंद होत असताना दहिसरचे दिलीप सुर्वे यांनी कमाल केली आहे. त्यांनी घरातील साहित्याचा वापर करून ‘डिझेलवर चालणारा चुल्हा’ विकसित केला आहे. व्यावसायिकांसाठी संकटमोचक ठरणाऱ्या या स्वदेशी कल्पनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दिलीप सुर्वे यांचे स्वतःचे हॉटेल आहे आणि सध्या त्यांनी हा डिझेलवर चालणारा चुल्हा फक्त स्वतःसाठी बनवला आहे.

  • 21 Mar 2026 12:40 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील पीडितेच्या भेटीला

    पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲसिड हल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट घेतली.ॲसिड हल्ल्यानंतर उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार आहे. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांशी देखील चर्चा केली.

  • 21 Mar 2026 12:30 PM (IST)

    चिकनचे दर गगनाला भिडले, चिकन तीनशे रुपये किलोवर

    सांगली आणि मिरज मध्ये चिकनच्या दराने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी उत्पादनात घट होत आहे. उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे याचा परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि चिकन दुकानात जाणवत आहे. साधारणता 45 दिवसांमध्ये होणाऱ्या पक्षी आता 60 दिवसाचा कालावधी घेत आहे. त्यात उन्हाच्या तीर्वता मुळे पक्ष्यांचे प्रमाण हे कमी झाले आहे. त्यामुळे चिकन मार्केटमध्ये पक्षी हे दिशेने असे झाले आहेत. पक्षांचे जाळे हे मोकळे दिसू लागले आहेत. चिकन मार्केटमध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. पक्षी नसल्यामुळे ग्राहकांना चिकन देणेही अवघड झाले आहे. चिकन हे 280 ते 300 रुपयांनी विकले जात आहे.

  • 21 Mar 2026 12:20 PM (IST)

    मुंबईत पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा, नागरिक हैराण

    इराण अमेरीकेतीमध्ये युद्ध सुरू आहे त्याचा फटका मुंबईत पेट्रोल पंपांना बसायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय. मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा नसल्याचं निदर्शनास येत आहे.

  • 21 Mar 2026 12:09 PM (IST)

    अटकेच्या तीन दिवस आधी 3 IAS अधिकारी आणि कॅप्टन खरात यांच्यात बैठक

    अटकेच्या तीन दिवस आधी राज्यातील 3 IAS अधिकारी आणि कॅप्टन खरात यांच्यात बैठक झाली होती. शिर्डीत तीन IAS अधिकारी कॅप्टन खरातला भेटल्याची माहिती समोर येत आहे. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. “विनोद” नामक व्यक्तीने तीन IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे.

     

  • 21 Mar 2026 12:00 PM (IST)

    फोटोत सोबत असणं हे काही पाप नाही – अंबादास दानवे

    भोंदूबाबांना संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. रुपाली ताई त्यात सहभागी असल्याचं दिसतय. सभागृहात आता हाच विषय असेल. फोटोत सोबत असणं हे काही पाप नाही असही दानवे म्हणाले.

  • 21 Mar 2026 12:00 PM (IST)

    सांगलीत रमजान ईद उत्साहात साजरी, मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण

    सांगली आणि मिरजे मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहाचा साजरी झाली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. सांगली व मिरज शहरातल्या ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत, सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

  • 21 Mar 2026 11:57 AM (IST)

    युद्धाचा मुंबईत पेट्रोल पंपांना फटका बसायला सुरुवात

    इराण-अमेरिका युद्ध सुरू आहे. त्याचा फटका मुंबईत पेट्रोल पंपांना बसायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसतय. मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा नसल्याचं निदर्शनास आलय. नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. बांद्रा पश्चिमेकडील इंडीयन ऑईलच्या पेट्रोल पंपावर कालपासून पेट्रोल नसल्याने अनेक दुचाकी चारचाकी स्वारांना परतावं लागतं आहे. पेट्रोल टँकर आलं नसल्याचं कारण दिलं जातंय.

  • 21 Mar 2026 11:48 AM (IST)

    प्रताप सरनाईक यांच्याकडून काशिगाव मेट्रो स्टेशनची पाहणी

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली. जिथे त्यांनी स्वतः तिकीट काढून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी MMRDA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी मेट्रो स्थानक नियंत्रण कक्षाची सुद्धा पाहणी केली.

     

  • 21 Mar 2026 11:31 AM (IST)

    अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझ मत आहे – छगन भुजबळ

    “अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझ मत आहे. मंदिरं आहेत, ध्यानधारणा करा, योगा करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे गुरुजी आहेत. जे समाजाची सेवा करतात. पण अशा काही लोकांमुळे सगळेच एकजात बदनाम होतात” असं छगन भुजबळ भोंदूबाब अशोक खरात प्रकरणावर म्हणाले.

  • 21 Mar 2026 11:21 AM (IST)

    नमाजानंतर जागतिक शांततेसाठी विशेष दुआ

    चाळीसगावमध्ये ईदच्या नमाजानंतर जागतिक शांततेसाठी विशेष दुआ करण्यात आली आहे. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध तात्काळ थांबावं, अशी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. युद्धाचे भारतावर होणारे दुष्परिणाम टळावेत, यासाठीही मुस्लिम बांधवांकडून मनोभावे दुआ करण्यात आली.

     

  • 21 Mar 2026 11:11 AM (IST)

    मिरगावात भोंदुबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर संतापाची लाट उसळली

    नाशिक जिल्ह्यातील मिरगावात भोंदुबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर संतापाची लाट उसळलीय. ज्या गावात कॅप्टन अशोक खरातने कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं, त्याच मिरगावात आता त्याच्याविरोधात ग्रामस्थ उघडपणे आक्रमक झालेत. वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबून गेलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. भीतीमुळे माध्यमांसमोर बोलायलाही तयार नसलेले ग्रामस्थ आता त्याचे कथित काळे कारनामे उघड करू लागले आहेत.

  • 21 Mar 2026 10:57 AM (IST)

    अशोक खरात या विकृत माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी – रोहिणी खडसे

    यात अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले आहेत त्यामुळे यांचा काही संबंध आहे का हेही तपासायला हवं…  अशोक खरात प्रकरणात सगळे धागेदोरे जोडून सखोल चौकशी करणे गरजेची आहे. या प्रकरणात ज्यांचे ज्यांचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत त्यांच्या संपत्तीची देखील चौकशी होणे गरजेचे आहे… असं वक्तव्यरोहिणी खडसे यांनी केलं आहे.

  • 21 Mar 2026 10:50 AM (IST)

    मुंबई नाशिक महामार्गावर कसारा बायपास जवळ मध्यरात्रीच्या सुमारास अपघात

    बायपास जवळ उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. उभी असलेली गाडी पायी चालणाऱ्या साई भक्तांवर पाठीमागून जाऊन धडकली आहे. अपघातात एक साई भक्ताचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 3 जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तर एक जखमींस एसएमबीटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे,  रात्रीच्या सुमारास साईभक्तानी महामार्गावरून मार्गक्रमण न करण्याचे प्रशासनाचे आवाहन केले आहे.

  • 21 Mar 2026 10:37 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्र रमजान ईद ची नमाज मुस्लिम बांधवांकडून साजरी

    गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ईद-उल-फित्र रमजान ईद ची नमाज मुस्लिम बांधवांनी साजरी केली. मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते. या ईद निमित्त मुस्लिम बांधव जवळपास 30 दिवस उवपास ठेवतात नंतर ही ईद उत्साहात साजरी करतात. नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकींना शुभेच्छा देतात.

  • 21 Mar 2026 10:25 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा गंभीर आरोप

    धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिवच्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी एक मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. धाराशिव तालुक्यातील वडगाव येथील गट क्रमांक 395 बाबत 2024 मध्ये बेकायदेशीर अकृषक आदेश काढण्यात आला असून त्यासाठी 2017 च्या जुन्या नगर रचना अहवालाचा आधार घेतला असल्याचही बबनराव लोणीकर यांनी म्हटले. 2020 नंतर लागू झालेल्या सुधारित नियमानुसार दहा टक्के खोली जागा आणि दहा टक्के सोयी सुविधा क्षेत्र राखणे बंधनकारक असताना संबंधित तहसीलदारांनी सोई सुविधा क्षेत्र पूर्णपणे न सोडता त्यावरही प्लॉट्स तयार करून खाजगी बांधकाम व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयाचा फायदा करून दिल्याचे म्हटलं त्यामुळे हा प्रकार नियम भंग नसून स्पष्टपणे संगणमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार आहे असे देखील ते म्हणतात. दरम्यान तहसीलदारांनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या सर्व मालमत्तेची सखोल चौकशी करून संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करून फौजदारी कारवाई सुरू करावी अशी मोठी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली…

  • 21 Mar 2026 10:14 AM (IST)

    बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार आणि आसपासच्या परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका

    बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरासह आसपासच्या गावांना अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील उभी पिके मोठ्या प्रमाणात आडवी झाली आहेत. प्रामुख्याने रब्बी हंगामातील गहू,ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमिनीवर कोसळल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

  • 21 Mar 2026 09:50 AM (IST)

    जीवन वाहिनी गोदावरी नदी बनलीय विषारी

    शहरातील ड्रेनेजचे पाणी नदी सोडलं जात असल्याने लाखो माशांचा मृत्यू. सहा ते सात चेंबर मधून गोदावरीच्या नदीपात्रात सोडलं जातं शहरातील घाण पाणी. केमिकल युक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. गोवर्धन घाट परिसरात पसरला दुर्गंध. कोट्यावधी रुपये खर्चूनही गोदावरी विषारीच. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आदेश देऊन ही कारवाई होईना. कोट्यवधी रुपये खर्चून ही नदी स्वच्छ होत नसल्याचा आरोप

  • 21 Mar 2026 09:46 AM (IST)

    रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता – यशोमती ठाकूर

    रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता.  ज्या ज्या मंत्र्यांचे लोकांचे तो भोंदू बाबा अशोक खरात सोबत फोटो आहेत त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्याची अंबलबजावणी झाली पाहिजे – यशोमती ठाकूर

  • 21 Mar 2026 09:40 AM (IST)

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा पहिला टप्पा – अंजली दमानिया

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा पहिला टप्पा आहे, यापुढे अनेक गोष्टी झाल्या पाहिजेत. खरात प्रकरणात अनेक नावं पुढे आली पाहिजेत. रुपाली चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे – अंजली दमानिया

  • 21 Mar 2026 09:40 AM (IST)

    पुणे-नागपूर-हडपसर व मुंबई-नागपूर-मुंबई विशेष गाड्या

    उन्हाळी सट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर-हडपसर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक गाडीचा विस्तार करण्यात आले. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 21 Mar 2026 09:37 AM (IST)

    अंजली दमानिया यांचा मोठा आरोप..

    राजीनामा देताना चाकणकर या पोझ देऊन उभ्या होत्या, असा मोठा आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे.

  • 21 Mar 2026 09:36 AM (IST)

    नाशिक – भोंदू खरातच्या PA नीरज जाधवला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता

    नाशिक –  भोंदू कॅप्टन खरातच्या PA नीरज जाधवला पोलिस आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.   नीरज जाधवला काल संध्याकाळी क्राइम ब्रँचने ताब्यात घेतलं.  कॅप्टन खरातचे सगळे CCTV नीरज जाधवकडे असून  खरातचे राजकीय आणि VIP लागेबांधे याची नीरज जाधवला संपूर्ण माहिती आहे.   नीरज जाधवकडून आणखीही काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

  • 21 Mar 2026 09:32 AM (IST)

    सोलापूर – मंत्री आशिष शेलार यांना नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्याला अश्रू अनावर

    उत्तर सोलापूर तालुक्यातील वडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट झाली. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे शेतकऱ्याच्या बांधावर आले होते. मात्र माहिती देताना पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाठ यांना अश्रू अनावर झाले होते.

  • 21 Mar 2026 09:30 AM (IST)

    मंत्री आशिष शेलार यांना नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्याला अश्रू अनावर

    उत्तर सोलापूर तालुक्यातील वडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट झालीय. याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे शेतकऱ्याच्या बांधावर आले होते. पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाठ यांना अश्रू अनावर झाले.

  • 21 Mar 2026 09:20 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आशिष शेलार

    सोलापुरात मंत्री आशिष शेलार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येतेय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात द्राक्षबाग भुईसपाट झालीय. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री आशिष शेलार दाखल

  • 21 Mar 2026 09:09 AM (IST)

    बुलढाण्यात पोलिस बंदोबस्तात सिलेंडर वाटप, सकाळपासून एजन्सीवर नागरिकांची गर्दी

    आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने बुलढाण्यात नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गोडाऊनमध्ये सकाळपासून मोठी गर्दी केली आहे .  गर्दीमुळे एजन्सी वर गोंधळ होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गॅस वितरकांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली असून पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडर वाटप सुरू आहे.

  • 21 Mar 2026 09:05 AM (IST)

    मराठवाड्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

    राठवाड्यात ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ८ हजार ४५५ हेक्टरवरील शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १५ हजार ३०२ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. मात्र, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांचे नुकसान झाले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

  • 21 Mar 2026 08:58 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू ?

    धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कला केंद्राच्या अडून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 9 जणांवरती धाराशिवच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कला केंद्राच्या आड चालणाऱ्या या रॅकेटचा पीडित महिलेनेच पर्दाफाश केल्यामुळे प्रकरण उघडकीस आलंय.  जिल्ह्यातील कला केंद्रावर बंदी असताना कलाकेंद्रात वेश्या व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने सुरू? असा सवाल उपस्थित होत आहे.

  • 21 Mar 2026 08:55 AM (IST)

    अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा – सुषमा अंधारेंची मागणी

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा. चाकणकरांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा – सुषमा अंधारेंची मागणी

स्वयंघोषित कॅप्टन, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मंत्री दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी झाली. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला असून त्याची कसून चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात 11 हजार 572 हेक्टरवरील शेतीपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 हजार 455 हेक्टरवरील शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.

Follow Us