AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाचासह उष्णतेचा मोठा अलर्ट

| Edited By: | Updated on: Apr 26, 2026 | 10:15 AM
Share

विदर्भात उन्हाचा तडाखा असून पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे; सोबतच जिल्हा बँक निवडणूक नियम, नाशिकमधील भोंदू बाबावर कारवाई आणि मुंबई मेगाब्लॉकच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाचासह उष्णतेचा मोठा अलर्ट
breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Apr 2026 10:50 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट…

    सोलापूर शहर व जिल्ह्यात ऊष्णतेची धग कायम आहे. त्यामुळे शनिवारी सोलापुरातील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता, तर दुसरीकडे हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

  • 26 Apr 2026 10:40 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी येथील धक्कादायक घटना

    छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीतील वादातून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी परिसरात ही घटना घडली असून पवन ज्ञानेश्वर भुते असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन याचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते. या वादातून वाढलेल्या मानसिक तणावामुळे पवनने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 26 Apr 2026 10:30 AM (IST)

    बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री यांच्या निषेधार्थ आंदोलन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खोटं वक्तव्य करत महाराजांचा बागेश्वर बाबा ने अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड करून केलं जातं आहे निषेध आंदोलन. नागपुरातील छत्रपती चौकात केलं जातं आहे आंदोलन

  • 26 Apr 2026 10:20 AM (IST)

    अमरावतीमध्ये आठ लाखाचे एचटीबीटी प्रतिबंधित कपाशीचे बियाणे जप्त

    कृषी विभाग व पोलिसांनी केली कारवाई… हे प्रतिबंधित बियाणे तस्करीसाठी रेल्वे पार्सल व्यवस्थेचा उपयोग. महाराष्ट्रात कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध असतानाही खरीप हंगामाच्या तोंडावर ही प्रतिबंधित कपाशीची बियाणे तस्करी वाढली आहे. मात्र या प्रतिबंधित बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली असून काल अमरावतीमध्ये आठ लाख रुपये किमतीचे यशस्वी बियाणे अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जप्त केले. यावेळी बियाण्याच्या तस्करांनी आपला तस्करीचा मार्ग बदलत चक्क रेल्वेच्या पार्सल व्यवस्थेचा उपयोग करून हे बियाणे अमरावतीमध्ये आणले होते.

  • 26 Apr 2026 10:05 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत KDMT बसचा ‘रस्सी’ जुगाड उघड

    बसच्या आपत्कालीन दरवाजाचा लॉक तुटल्यानंतर चक्क रस्सीने दरवाजा बांधून बस धावली रस्त्यावर. प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या बसचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्गच बंद अपघाताची भीती अधिकच तीव्र. सोशल मीडियावर नागरिकांचा संताप; केडीएमटीवर टीकेची झोड. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी; प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

  • 26 Apr 2026 09:57 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले, १० वर्षांचा नियम ठरणार अडथळा

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगवान झाली असून, उद्या सोमवार, २७ एप्रिल रोजी मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमानुसार सलग दहा वर्षे संचालक पद भूषवलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नसल्याने आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे, अंबादास दानवे आणि नितीन पाटील यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरता येणार नाही. यामुळे ही मंडळी आपल्या वारसांना निवडणुकीत उतरवण्याची दाट शक्यता आहे. आता प्रसिद्ध होणाऱ्या यादीवर १० दिवसांत हरकती मागवण्यात येतील, त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल. पुढील ४० ते ५० दिवसांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्वात येईल.

  • 26 Apr 2026 09:51 AM (IST)

    भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार; SIT पुन्हा कोठडीची मागणी करण्याची शक्यता

    नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात याच्या सहाव्या गुन्ह्यातील तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यात तपासासाठी पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. खरातवर एकापाठोपाठ एक सहा गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणातील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 26 Apr 2026 09:47 AM (IST)

    मिरा-भाईंदर महापालिकेचा संतापजनक कारभार; रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांना मृतदेह रिक्षेतून न्यावा लागला

    मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा अत्यंत उदासीन आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. मिरा-भाईंदर पश्चिम येथील मेट्रो स्टेशनजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी १०८ हेल्पलाईन आणि पालिकेच्या रुग्णवाहिकेला वारंवार फोन केला. मात्र, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर प्रशासनाच्या मदतीची आशा सोडून पोलिसांनी तो मृतदेह रिक्षामध्ये टाकून शवविच्छेदनासाठी भीमसेन जोशी रुग्णालयात नेला. या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका होत असून, एका मृतदेहासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न होणे ही शरमेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  • 26 Apr 2026 09:37 AM (IST)

    नागपूर रेल्वे स्थानकावरील जन औषधी केंद्रावर मोठी कारवाई

    नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या केंद्रात सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेली शुगर, बीपी आणि थायरॉईडची जेनेरिक औषधे उपलब्ध नसून, त्याऐवजी ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने, परफ्युम आणि शाम्पू यांसारख्या जनरल वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. झेडआरयूसीसी (ZRUCC) सदस्य नितीन सोळंके यांनी यासंदर्भात विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रेल्वेच्या पथकाने तपासणी केली आणि केंद्रातील अनधिकृत साहित्य जप्त करत कायदेशीर कारवाई केली आहे.

  • 26 Apr 2026 09:27 AM (IST)

    पुण्याचा पारा ४० अंशांच्या पार; पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

    पुणे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला असून काल कमाल तापमानाची नोंद ४०.९ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचल्याने पुणेकर उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या सरासरी तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र गेल्या चार दिवसांपासून पारा ३९ ते ४१ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, प्रतिकूल हवामानामुळे पुढील दोन दिवस दुपारनंतर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • 26 Apr 2026 09:19 AM (IST)

    पुण्यात आता होर्डिंग साठी क्यूआर कोड बंधनकारक

    पुणे शहरातील अनधिकृत फोर्डिंगला लगाम घालण्यासाठी पुणे महापालिकेने सर्व अधिकृत होर्डिंग वर किंवा आर कोड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी 27 एप्रिल पासून सुरू होणार असून यामुळे अनधिकृत फलकांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शहरात सध्या तीन हजार 35 अधिकृत तर सुमारे दीड हजार अनधिकृत होर्डिंग आहेत.

  • 26 Apr 2026 09:14 AM (IST)

    मुंबईत कालिना परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथील कालिना, जांभळीपाडा परिसरातील चाळींमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नळाला येत असलेल्या घाण पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात महानगरपालिकेकडे वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने तातडीने जलवाहिन्यांची तपासणी करून रहिवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

  • 26 Apr 2026 09:09 AM (IST)

    नागपुरात पारा ४४ अंशांच्या पार, नागरिकांना महावितरणचा शॉक

    नागपुरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून शहराचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशा भीषण उष्णतेत महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात विजेचा मोठा लपंडाव सुरू असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वाढत्या उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने विजेची मागणी थेट ८२३ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात असलेला मागणीचा उच्चांक यंदा एप्रिलमध्येच मोडीत निघाला आहे. दरवर्षी साधारणपणे ५५० मेगावॅट विजेची गरज भासते, मात्र यंदाच्या वाढीव मागणीमुळे अनेक भागांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागपूरकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहायला मिळत आहे.

  • 26 Apr 2026 09:04 AM (IST)

    हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक; सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान लोकल सेवा विस्कळीत

    मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर आज, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० या कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल सेवा बंद राहतील. यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी आणि गोरेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी-कल्याण) कोणताही ब्लॉक नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, हार्बरच्या प्रवाशांना आज पश्चिम व मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

विदर्भात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे, तर नागपूरसह इतर शहरांत ४२ ते ४४ अंशांची नोंद झाल्याने नागरिक उन्हाने हैराण झाले आहे. यामुळे प्रशासनाने दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याच्या नवीन नियमामुळे आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांसारख्या दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामुळे ते आपल्या वारसांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महिला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार  आहे. यावेळी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. तर मुंबईत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना लोकलच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचू शकता.

Published On - Apr 26,2026 8:58 AM

Follow Us
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....