
गोंदिया जिल्हा परिषदेत सध्या क्रीडा सत्र सुरू आहे. काल शेवटच्या दिवशी रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्त खानावडीसाठी काम करणाऱ्या कामगारांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मधमाशांनी चावा घेतलेल्यांमध्येमध्ये केटरिंगसाठी काम करणाऱ्या महिला तसेच डेकोरेशन आणि फुल श्रृंगार सजावटीचे काम करणाऱ्या अनेक पुरुषांचा समावेश होता. या बाबीची दखल घेत प्रशासनाने तातडीने लक्ष देत जिल्हा परिषदेतील स्थानिक डॉक्टरांनी जखमींना वेळीच गोंदिया येथील के.टी. एस जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचार करून त्यांच्या बचाव केला. त्यांच्यावर गोंदिया येथील केटीएस शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे…..
नांदेड येथील किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे बारावी परीक्षेदरम्यान भोंग्यावरून उत्तर सांगितल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रप्रमुख सुबोध थोरात यांची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नांदेडच्या सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरू. काही संतप्त शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
यावलच्या भालशिव फाटा येथे बस आणि चार चाकीचा अपघात झाला आहे. अपघातात तीन ते चार विद्यार्थी किरकोळ जखमी झालेल आहेत. यावल वरून भालशिव फाटा दरम्यान बस आणि इको चार चाकी गाडीची धडक झाली. यात तीन ते चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील मुळशी तालुक्यातील मुलखेड-घोटावडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्गम डोंगरावर वसलेल्या खंडोबा मंदिरातील पांडवकालीन शिवलिंगाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून चोरी केल्याचा प्रकार उघड झाला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने हे शिवलिंग मंदिर परिसरातच सापडले आहे. नेमकं काय घडलं? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट…
ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांचा गोंधळ..गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून घेतल्याचा प्रकार. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 920 कोटी चे उद्दिष्ट देण्यात आले होते.. जानेवारी अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत 565 कोटी जमा झाले होते.. त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत 630 कोटी कर संकलन झाले त्यामुळे आता मार्च अखेर 290 कोटी तर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान विभागासमोर आहे..
विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक मिळवून वारंवार फोन करून छळ केल्याचा आरोप. प्रकरण उघड होताच संतप्त नातेवाईकांनी संस्थेत धाव घेत शिक्षकाला दिला चोप. शिक्षकाला चोप देतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नरेंद्र मोदी आणि शहा यांनी अरविंद केजरीवाल यांची माफी मागावी, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.
बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे यांनी मद्यपान करून राजकीय भाषण केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्हिडिओ पुराव्यांसह केली आहे. तर शिस्तभंग आणि निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.
सुप्रिया सुळे ब्रीच कँडी रुग्णालयात आल्या आहेत. शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामावेळी लोखंडी रॉड कोसळून 1 जण जखमी झाला आहे. केईएम हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातात 1 व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असून त्याच्या डोक्याला बराच मार लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर – गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी झाडांची कत्तल होणार आहे. गरवारे स्टेडियम येथील 75 झाडे तोडण्यासाठी महानगरपालिकेने प्राधिकरण समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र या वृक्षतोडीस पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध दर्शवला आहे. महानगरपालिकेच्या विरोधात वृक्ष प्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
–
डोक्यात झाडाची कुंडी मारून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळच्या आनंदनगर नेपा कॉलनीत घडली. किरकोळ शाब्दिक कारणातून अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकार ( वय 25) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळ हादरलं.
पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीशी संबंधित आणि मकोका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात यश ालं आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी अमोल दत्तात्रय लाखे (वय 27 ) याला अटक करत बेड्या ठोकल्या.
डोंबिवली PNT कॉलनीत भीषण पाणीटंचाई आहे. ‘टँकर नको, हक्काचं पाणी द्या’ म्हणत संतप्त नागरिकांनी KDMC मुख्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत धोधो पाणी, आता कोरडे नळ; टँकरच्या पाण्यावर जीव, कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ठाम मागणी करण्यात आली. उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन आज 1 महीना पूर्ण झाला आहे. या अपघातासंबधी करण्यात आलेल्या तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता असून अपघाताच नेमकं कारण समोर येऊ शकतं. तर 2 मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, रोहित पवार हे याप्रकरणी नवीन खुलासे करणार आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या माजी वैद्यकीय अधीक्षका डॉ. तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अपघातास जबाबदार असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कथितपणे बदलल्याच्या आरोपाखाली तावडे याला अटक झाली होती. निलेश घायवळ टोळीशी संबंधित आणि मकोका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आलं. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.