Maharashtra News LIVE : नाशिक : सिन्नर परिसरात गारपीटीसह पाऊस
Maharashtra News LIVE Updates : ऐन सनासुदीच्या काळात राज्यात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका देशात दिसत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच काल अनेक भागात मोठी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आला. यासोबतच काही भागात उष्णता वाढत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाल्याने अनेक हॉटेल बंद आहेत. यासोबतच खानावळी चालकांवरही खानावळ बंद ठेवण्याची वेळ आली. मुंबईतील 40 टक्के हॉटेल आज बंद आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे रोजगार जाण्याची वेळ आली. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक : जल संधारण अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अटक
नाशिक जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या वैशाली ठाकरे(जल संधारण अधिकारी) आणि येथील कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराचे पेंडिंग बिल काढून देण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
-
धुळे शहरात उद्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन
दर वर्षीप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त उद्या, गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरात भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांची परंपरा लाभलेली ही शोभायात्रा सर्व जाती-पाती आणि पक्षभेद बाजूला सारून हिंदू ऐक्य, संस्कृती आणि धर्माचे दर्शन घडवणारी ठरणार आहे.
-
-
बीड : चौसाळा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट, पिकांचे नुकसान
बीडच्या चौसाळा परिसरात आज सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चौसाळा परिसरात शेती पिकांसह फळबाग देखील मोठ्या प्रमाणात आहे. गारपिटीचा फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे.
-
नाशिक : सिन्नर परिसरात गारपीटीसह पाऊस
राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नर परिसरात गारपीटीसह पावसाला सुरुवात झाली आहे. सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी परिसरात गारपीट झाली. यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
-
कोपरगावमध्ये महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघ आक्रमक, कारण काय?
कवडीमोल दराने मंदिर देवस्थानच्या जमिनी बळकावल्या जात असल्याने कोपरगावमध्ये राज्य मंदिर महासंघ आक्रमक झाला आहे. चालू अधिवेशनात या विरोधात कठोर कायदा करावा , अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा या महासंघाकडून देण्यात आला आहे. महसूल विभागाचे अधिकारी , बिल्डर तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच कर्नाटक, गुजरात आणि ओडीसाप्रमाणे कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी केली जात आहे.
-
यवतमाळमधून 13 घरगुती सिलेंडर जप्त
यवतमाळच्या महागाव तालुक्यात विविध हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये धाडी टाकण्यात आल्या. त्यातून 13 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. भरारी पथकाने ही कारवाई केली. सध्या जिल्ह्यात पुरवठा विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आहेत.
-
आंबेगाव तालुक्यात आवकाळी पावसाला सुरुवात
आंबेगाव तालुक्यातील डिभे धरण क्षेत्राच्या परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात ढाली आहे. वातावरणात गेल्या 2 दिवसांपासुन उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन पाऊसाला सुरुवात झालीय. सध्या पावसाच्या हलक्या सरी होत असल्या तरी मोठ्या पाऊसाची धोका असल्याने आदिवासी भागातील शेतकरी चिंत्तेत आहे.
-
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य, उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची निवड
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची निवड केली गेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. दीपक वैद्य यांनी या संधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, त्यांनी शेतकरी कामगाराच्या मुलाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला”, अशी प्रतिक्रिया यावेळेस वैद्य यांनी दिली.
-
मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या भारत औद्योगिक विकास योजनेला मंजुरी देण्यात आली. एफसीआरए दुरुस्ती विधेयकालाही मंजुरी देण्यात आली.
-
अंबालामध्ये आरडीएक्ससह 3 जणांना अटक
हरियाणातील अंबाला येथे सुरक्षा यंत्रणांनी एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. पोलिसांनी अजमेरचा रहिवासी असलेल्या अली अकबर उर्फ बाबू याच्यासह तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून अंदाजे २ किलो आरडीएक्स, आयईडी आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले आहे.
-
अभिनेता राजपाल यादवचा अंतरिम जामीन 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादव यांच्याशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणाची सुनावणी सूचीबद्ध केली आहे. न्यायालयाने त्यांच्या वकिलांना पुढील तारखेला मुख्य याचिकेवर युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांचा अंतरिम जामीन 1 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. राजपाल यादव यांनी सांगितले की, 1 तारखेला पुन्हा सुनावणी होईल आणि त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
-
एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव (तेल, रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, एलपीजीची परिस्थिती चिंताजनक आहे. कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रिफायनरींमधून होणारे देशांतर्गत एलपीजी उत्पादन अंदाजे 40 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रावर किंवा एलपीजी वितरकाकडे तुटवडा (शुष्कता) नाही. देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी वाहतूक ग्राहकांना 100% पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.
-
युद्धाचा मोठा फटका, गॅस टंचाईमुळे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल बंद
अमेरिका, इस्त्रायल इराण युद्धाचा मोठा फटका, गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ
गॅस टंचाईमुळे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल व्यवसाय ठप्प
कल्याण-डोंबिवलीतील २५ टक्के हॉटेल्स बंद; उर्वरितही बंद होण्याच्या मार्गावर
प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, व्यावसायिकांची शासनाकडे मागणी
-
दहावी भूगोल प्रश्नपत्रिका चोरी प्रकरण, सांगोला पोलिसांकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी?
दहावी भूगोल प्रश्नपत्रिका चोरी प्रकरण
सांगोला पोलिसांकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी – सूत्र
भूगोलाचा पेपर झाल्यावर पोलिसांकडून विद्यार्थ्यांची चौकशी सुरू
विद्यार्थ्यांच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित
प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी पोलिसांचा कसून तपास
-
जिल्हा परिषद शाळेतून तीन सिलिंडर चोरीला, हिंगोलीमधील धक्कादायक प्रकार
जिल्हा परिषद शाळेतून तीन सिलिंडर चोरीला
हिंगोलीमधील धक्कादायक प्रकार
शाळेच्या किचनचे लॉक तोडून तीन सिलिंडर चोरले
कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर येथील घटना
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
-
जालना शहरातल्या बस स्थानक परिसरात चोरी करणारे चार सराईत आरोपी जेरबंद
जालना शहरातल्या बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 92 हजार 470 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच चोरी आणि घरफोडीचे दहा गुन्हे देखील उघकीस आले आहेत.
-
राष्ट्रवादीच्या सदस्यांवर महाविकास आघाडीकडुन दडपण- संजय पाटलांचा आरोप
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांवर दडपण आणून त्यांचे फोन काढून घेणे असे प्रकार घडले आहेत,असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.मात्र यावर आज जास्त बोलणार नाही,निवडणूक संपल्यावर बोलू,पण निवडणुकीमध्ये चमत्कार घडण्याची आशा असून लढणे, हा आपला धर्म आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे, राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांसह संजयकाका पाटील यांनी महायुतीला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर केले आहे.
-
सिलेंडर टंचाईच्या काळात लोकांना गुरुद्वारामध्ये मोफत जेवण
बोरिवली पश्चिम गुरुद्वारात, जोपर्यंत गॅस सिलेंडरची समस्या कायम आहे, तोपर्यंत लोकांना दिवसातून दोन वेळचे जेवण मोफत दिले जाईल. आज बोरिवलीच्या या गुरुद्वारात लंगर सुरू होत आहे, ज्यामध्ये लोकांना दिवसातून दोन वेळचे जेवण मोफत दिले जाईल. एवढेच नाही तर, जोपर्यंत लोकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत दररोज मोफत जेवण दिले जाईल, असाही निर्णय या गुरुद्वारात घेण्यात आला आहे.
-
सांगली जिल्हा परिषदेत आकड्यांचा खेळ आहे- गोपीचंद पडळकर
भारतीय जनता पार्टी जय पराजयाचा विचार करत नाही निवडणुका लढवते आणि जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेत आकड्यांचा खेळ आहे, 31 सदस्य संख्या ज्यांची होईल त्यांचा सत्ता येईल असं मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
-
सिलेंडरसाठी वणवण करावी लागतेय पण सरकारला काही पडलं नाही-भास्कर जाधव
गॅस सिलेंडर साठी वणवण करावी लागत आहे पण सरकारला काही पडलं नाही. जनता पुछती हैं की नहीं हैं सिलेंडर कहां हैं नरेंदर ? त्यामुळे विकट अवस्था करून ठेवलीये, केंद्रीय मंत्र्यांना काही पडलं नाहीये. राज्यात गॅसचा तुटवडा आहे, जनतेला जेवण करायला गॅस नाही… विरोधक म्हनून सभागृहात आमची परिस्थिती विकट आहे… संख्याबळ नसल्याने ऐकून घ्यायला कुणी तयार नाही अशी परिस्थिती आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
-
धाराशिवमध्ये काढणीला आलेल्या द्राक्षबागेला गारपिटीने झोडपले
धाराशिवमध्ये काढणीला आलेल्या द्राक्षबागेला गारपिटीने झोडपले….गारांच्या तडाख्याने जमीनीवहर द्राक्षांचा खच….लोहारातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका…
-
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ सद नगर परिसरात भीषण आग
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळ सद नगर परिसरात भीषण आग. आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी.
-
लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सलग तीन दिवस बंद
आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सणांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे लिलाव पुन्हा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत…त्यामुळे बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असून बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळणार आहे
-
चंद्रपूरमध्ये बॅडमिंटन खेळताना 16 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
चंद्रपूरमध्ये बॅडमिंटन खेळताना 16 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माण वसाहतीतील धक्कादायक घटना. बॅडमिंटन खेळताना तोल जाऊन पडल्याने विद्यार्थिनीच्या डोक्याला दुखापत. डोक्याला दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
-
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार. पत्रकार परिषदेतून सर्व महत्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार, रोहित पवारांची माहिती. विमान अपघातासंदर्भात FIR दाखल व्हायला पाहिजे- रोहित पवार
-
सांगलीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
सांगलीच्या मिरज पूर्व भागामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेडग मालगाव रस्त्यावरील द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला एक्सपोर्टचा द्राक्ष हा अक्षरश: तुटून जमिनीवर पडलेला आहे.
-
मुंबईतील गोरेगाव पूर्व रहेजा हाईट्स आणि आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर
मुंबईतील गोरेगाव पूर्व रहेजा हाईट्स आणि आयटी पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा रहेजा हाइट्समध्ये एक बिबट्या आला होता. काल संध्याकाळीसुद्धा लोकांनी त्याला याच सोसायटीत पाहिलं. तो जवळच्या बागेतही येतो, असं लोकांचं म्हणणं आहे. वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असले तरी, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या, सोसायटीच्या बाजूने सीमा भिंतीवर उंच जाळी लावण्याचं काम सुरू झालं आहे.
-
शिंदेसेना पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत
शिंदेसेना पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. लोकसभा खासदारांची संख्या वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष मिशन राबवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. ४ खासदार शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असून नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
ठाकरे सेनेकडून शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या खासदारांची माहिती देण्यात आली. या खासदारांना शिंदे शिवसेनेत प्रवेश घेण्यासंदर्भात सर्व कायदेशीर अडथळे आणि तरतुदीबीबतही चर्चा केली. योग्य वेळ ठरवून उद्धव सेनेला धक्का दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, तिघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल होऊन कंटेनरने तीन वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त कंटेनर शेजारून जाणाऱ्या कारवर उलटल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा इथल्या आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे यांची निवड होणार
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी भाजपचे जितेंद्र जैस्वाल यांची निवड होणार आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे उबाठाच्या जिल्हापरिषद सदस्यांनी अध्यक्ष – उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाग घेऊ नये यासाठी उबाठाने व्हीप काढला आहे. भाजपाचे 23, अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपात प्रवेश केला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव सदस्य भाजपच्या संपर्कात आहे.
चार अपक्षही भाजपच्या बाजूने मतदान करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे 21, उबाठाचे 9 तर निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपाचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे.
-
सोलापूर – अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यवसायिकांनी पेटवल्या चुली
सोलापूर – अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यवसायिकांनी चुली पेटवल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जिल्ह्यातील बहुतांश हॉटेलमधील गॅस संपल्यामुळे हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी हॉटेल चालकांकडून मेनूत कपात करून चुलीवर खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे. चुलीवर खाद्यपदार्थ बनवले जात असले तरी अद्यापपर्यंत किंमतीत कोणतीही वाढ केली नाही.
-
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी लता विजय वाकळे यांची वर्णी लागणार
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी लता विजय वाकळे यांची वर्णी लागणार. सावंगी म्हाळसा जिल्हा परिषद गटातून लता वाकळे भाजपच्या तिकीटावर आल्या होत्या निवडून. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लता वाकळे यांच्या नावाचे काढलेली शिफारस पत्र टीव्ही 9 च्या हाती. लता वाकळे यांच्या नावाचं पत्र आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची टीव्ही 9 मराठीला माहिती. 54 पैकी भाजप 24,राष्ट्रवादी 15 तर शिवसेना शिंदे गटाचे 5 सदस्य एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार
-
पाच मजली बिल्डिंगमध्ये भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
दिल्लीत पालम भागात एक पाच मजली बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली. यात 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याशिवाय अनेक जण गंभीररित्या होरपळले आहेत. आगीच्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मृतांमध्ये तीन लहान मुलं आहेत.
-
नरेंद्र मोदींकडून खरगे आणि शरद पवार यांचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खरगे आणि शरद पवार यांचं कौतुक. हे सभागृह मोठं मुक्त विद्यापीठ आहे. राज्यसभेतल्या 37 खासदारांचा आज कार्यकाळ संपत आहे. सर्व नवीन सदस्यांनी शिकलं पाहिजे असं पीएम मोदी म्हणाले.
-
राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो – नरेंद्र मोदी
“संसदेत प्रत्येक खासदाराचं योगदान असतं. कार्यकाळ संपलेल्या खासदारांचं सुद्धा चांगलं योगदान. राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. कार्यकाळ संपलेल्या खासदारांचही चांगलं योगदान आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
राज्य ट्रिलियन मध्ये पण लाईटच नाही, उत्तम जानकर यांची टीका
“सध्या गाव खेड्यामध्ये लोड शेडिंग केलं जात आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. मुलांची, लोकांची विविध प्रकारची काम असतील. एका बाजूला सांगतात राज्य हे प्रगतीपथावर गेलं आहे. राज्य ट्रिलियन मध्ये गेलेलं आहे आणि दुसरीकडे या राज्यांमध्ये लाईटच नाही आहे” अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली.
-
आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही – रोहित पवार
“आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही, एवढा मोठा नेता आपल्यातून कायमचा हरपून जातो , पण ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला याबाबत तपास योग्य पद्धतीने व्हावा असं वाटतं. त्यामुळे राजकारण आम्ही करतोय का ते करतात याचा विचार त्यांनी करावा.हे बोलणं हास्यास्पद आहे” असं रोहीत पवार म्हणाले.
-
उन्हाचा तडाखा वाढताच जालना शहरासह ग्रामीण भागातील बाजारात टरबूजाची आवक वाढली
जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढू लागला आहे.तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक थंडावा देणाऱ्या फळांकडे वळताना दिसत आहेत. विशेषतःटरबूजाची मागणी बाजारात वाढू लागली आहे. त्यातच रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर टरबूजाची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या टरबूजाच्या गाड्यांमुळे बाजारात सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. परिणामी ग्राहकांना ताजे आणि गोड टरबूज सहज मिळत असल्याने वाढत्या उष्णतेत टरबूज खाण्याला नागरिकांकडून पसंती मिळत असल्याने फळविक्रेत्यांचाही व्यवसाय तेजीत आला आहे.
-
धाराशिव चा उमरगा लोहाऱ्यात गारपिटीमुळे शेतीचे नुकसान
धाराशिवच्या उमरगा लोहारा भागाला गारपिटीचा तडाखा बसला. विजेच्या कडकडाटसह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, कांदा व कलिंगड, पपई याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले आहेत. शेती नुकसानीचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडणार असून कोरडवाहू हेक्टरी 25 हजार व बागायतीसाठी 50 हजार मदतीची मागणी शिवसेना ठाकर गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे.
-
गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची एजन्सीसमोर गर्दी…
युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवा पसरत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. अफवेमुळे नागरिक गॅस एजन्सीसमोर गर्दी करताना दिसत आहेत…. मात्र, सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व नागरिकांना नियमित पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे….
-
युद्ध थांबावे आणि विश्वात शांती नांदावी यासाठी केज येथील भगवान श्रीकृष्ण आश्रमात 108 कुंडातून महाविष्णू याग यज्ञ
आखाती देशात सुरू असलेले युद्ध थांबावे आणि विश्वशांती नांदावी यासाठी बीडच्या केज येथील भगवान श्रीकृष्ण आश्रमात 108 कुंड तयार करून महाविष्णू याग करण्यात आला आहे. या महाविष्णू यागासाठी जिल्ह्यातील संत महंतांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यागातून प्रत्येकाच्या जीवनात शांती नांदावी आणि युद्ध थांबून विश्वात देखील शांती नांदावी यासाठी यज्ञ करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण आश्रमातील शास्त्री महाराजांकडून देण्यात आली.
-
ठाण्यात नवीन इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाला आग
ठाण्यातील वागळे इस्टेट येथे महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाला आग लागल्याने गाडी जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महिंद्रा XUV -400EV या इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाला लागली आग लागली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दलाच्या आणि शोरूमच्या कामगाराच्या मदतीने आग विझवण्यात आली.
-
सोलापुरात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; दरात २० ते २५ रुपयांची वाढ
सोलापूर शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा कायम असल्याने रिक्षाचालक आणि सामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गॅस पंपांवर पुरवठा अपुरा असल्याने अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून, उपलब्ध असलेल्या गॅसच्या किमतीत २० ते २५ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. युद्धापूर्वी ५० रुपये लिटर असलेला गॅस आता ७५ ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. कंपन्यांकडून मिळणारा अत्यल्प पुरवठा काही तासांतच संपत असल्याने पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅसचे दर गगनाला भिडले असले तरी प्रवासी वाढीव भाडे देण्यास तयार नसल्याने, रिक्षा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. या दुहेरी संकटामुळे अखेर रिक्षा बंद ठेवण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नसल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
-
नागपूरच्या आमदार निवास कॅन्टीनमधील गॅस पुरवठा अंशतः सुरळीत
नागपूर येथील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निर्माण झालेला गॅसचा गंभीर तुटवडा आता काहीसा कमी झाला आहे. काही प्रमाणात सिलेंडर उपलब्ध झाल्याने दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा जमा झाला असून, आज सकाळचा नाश्ता वेळेवर तयार झाला आहे. महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या १०० ते १५० पाहुण्यांची जेवण आणि नाश्त्याची सोय यामुळे काहीशी सुखकर झाली असली, तरी अद्याप आवश्यक तेवढा पुरवठा मिळालेला नाही. काल मिळालेल्या सिलेंडरवर सध्याचे काम रेटले जात असून, पूर्ण गरजेनुसार गॅस उपलब्ध नसल्याने प्रशासनाला अजूनही इतर पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
-
गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोठा निर्णय
नाशिक शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा आणि वितरणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष आता २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. या कक्षात कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करत असून, अनेक कर्मचारी रात्रपाळी करून गॅस वितरणाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवत आहेत. गॅस पुरवठ्याशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी नियंत्रण कक्षात सतत फोन येत असून, प्रशासन अत्यंत सक्रियतेने या समस्यांचे निराकरण करत आहे.
-
संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरण, घटनेच्या निषेधार्थ आज रास्तारोको आंदोलन
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे..जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल आहे. आज मुलीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती देखील रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.
-
अजित पवारांच्या अपघाती निधनाचा मुद्द्यावर आज चर्चा? विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज १७ वा दिवस असून, विधानसभेत आज २९३ च्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा पार पडणार आहे. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित असल्याने, आज या संवेदनशील विषयावर सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरही आजच चर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या कामकाजाकडे लागले आहे.
-
गोंदियात भीषण अपघात, ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. आपल्या पुतणीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे दुचाकीने जात असलेल्या काकाचा भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण भीषण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
-
मेळघाटच्या हत्ती घाट बुरड घाट परिसरात भीषण वनवा
महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर गेल्या 3 दिवसापासून आगीचा वणवा. प्रचंड धुराची लोट पसरल्याने वनविभागाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी सतर्कता दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले.. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या परिसरात आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाची धडपड
-
जळगावात राष्ट्रीय महामार्गावर आयशरची गव्हाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक
धरणगाव तालुक्यातील मुसळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेमध्ये ट्रॅक्टर मधील संपूर्ण गहू रस्त्यावर पडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान. ट्रॅक्टर ट्रॉली बरोबर गहू रस्त्यावर सांडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धडक एवढी जोरदार होती की ट्रॅक्टरला लागलेली ट्रॉली थेट रस्त्यावर उलटली होती.. -
व्यवसायिक सिलेंडर अभावी महामार्गावरील हॉटेल पडतायेत बंद
आठ दिवसांपासून एकही व्यवसाय सिलेंडर भेटले नाही. आम्हाला कल्पना नव्हती की अचानक अशा टाक्या बंद होतील अन्यथा आम्ही भरून ठेवल्या असत्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कामगारांना सुट्टी दिली आहे. मात्र इतर कामगारांना अर्धा पगार देऊन त्यांच्या जेवायची व राहण्याची सोय करत आहे. त्यांच्या जेवणासाठी अर्धी टाकी शिल्लक ठेवली आहे. लवकर जर सिलेंडर भेटले नाही तर हेही कामगार निघून जातील -
तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज सुनावणी
मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी यासंदर्भात न्यायालयात दाखल केली आहे याचिका. यापूर्वी नाशिक पालिकेने व राज्य सरकार यांना याचिकाकर्ते यांच्या अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर नाही. त्यामुळे आज मनपा प्रतिज्ञापत्र सादर करणार का? याकडे पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचे लक्ष
-
धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका
गारपिटीमुळे कलिंगडची शेती जमीन दोस्त. लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या शेतकऱ्याची माहिती. काढणीला आलेले कलिंगड गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आत मध्येही कलिंगड डॅमेज जाग्यावरच सडतील
-
अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पिकांच्या काढणीला वेग
:हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येत्या 20 तारखेपर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आता रब्बी हंगामातील गहू हरभरा आणि इतर पिकांच्या काढणीला वेग आला असून तशी लगबग पाहायला मिळत आहे.