AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसोबत टाळी… महाविकास आघाडीशी युती होईल?; उद्धव ठाकरे यांचा नवा दावा काय?

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल आणि त्याचा महाविकास आघाडीवर होणारा परिणाम यावर भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, महाविकास आघाडी एकत्र राहण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत.

राज ठाकरेंसोबत टाळी... महाविकास आघाडीशी युती होईल?; उद्धव ठाकरे यांचा नवा दावा काय?
uddhav thackeray raj thackeray MVA (1)
| Updated on: Jul 20, 2025 | 8:01 AM
Share

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार राज ठाकरे आणि आम्ही एकत्र आल्याचं सांगत आहेत. त्यामुळे मनसे आणि उबाठा महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही नेते एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. कारण राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येतील याची काहीच गॅरंटी नाहीये, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती झाली तर या युतीत महाविकास आघाडी असेल काय? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आतली गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.

मध्यंतरी काँग्रेस नेत्यांशी बोलणं…

महापालिका निवडणुकीत एकत्र लढावं की स्वबळावर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्यांशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले की, कदाचित ते हा विषय़ स्थानिक पातळीवर सोडतील. ठिक आहे. तसं असेल तर तसं करू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत असून राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यताही बळावली आहे.

तसं वाटलं तर तसं करू

मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्या वेगळी समजणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं युनिट आहे. त्यांना जे योग्य वाटतं राजकीय दृष्ट्या, तसं वाटलं तर तसं करू. लढायचं तर नक्कीच आहे, असं सांगतानाच ओरबाडली गेलीय मुंबई. प्रचंड लूट सुरू आहे. कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढायची असते. तशी आम्ही लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महापालिकेवर भगवा फडकणारच

महापालिकेवर भगवा झेंडा तसाच फडकवणार. मध्ये मध्ये ज्यांना किंमत नाही, अशा लोकांकडून मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा केली जाते. याचा काही काडीचा फरक पडत नाही, असं सांगतानाच राज्यात मराठी अमराठी भाषिक गुण्या गोविंदाने राहतात. रक्तदान शिबीर करतो तेव्हा ते रक्त कुठल्या भाषिकाला जात नाही. आपण रुग्णासाठी रक्त देतो. इकडे गुण्यागोविंदाने नांदतात हे पाहवत नाही. म्हणून मराठी- अमराठी वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. कोणत्याही राज्याच्या भाषेचा द्वेष नाही. मुख्यमंत्री असताना कोरोनात मी काही कुणाला भाषेच्या किंवा धर्माच्या आधारावर वेगळं वागवलं नव्हतं. मी हिंदुत्ववादी आहे. पण मुसलमानांना काही वेगळं वागवलं होतं? नाही, असं त्यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.