AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर गंभीर संकट! हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज काय? दुष्काळ…

IMD Weather Update : हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रावर गंभीर संकट! हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज काय? दुष्काळ...
IMD Drought Prediction newsImage Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 4:08 PM
Share

राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांशी भागात पावसाचा तुटवडा पहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 50 टक्क्यांपेक्षाही अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये परिस्थिती पुन्हा बदलली असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत निर्माण झाली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतीला फटका बसणार

ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती गंभीर असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागातील शेतीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. यामुळे थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट

काही भागांत पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याचे शेतीची अवस्था वाईट आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल, अशी अनुकूल हवामान परिस्थिती दिसत नसल्याचेही एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...