IMD rain forecast : महाराष्ट्राला आयएमडीचा हाय अलर्ट, धडकणार मोठं संकट, धोका वाढला
पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून, या पार्श्वभूमीवर पाच दिवस हवामान विभागाकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत पावसाचा धोका कायम आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर 27 सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण होणार आहे, त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 27 सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे याच काळात विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
24 Sep, IMD model guidance for 27 to 30 Sept for possibility of heavy to very heavy rains over Maharashtra and adjoining areas, in view of LPA development on 25th Sept over BoB it’s likely inward movement & its further intensification. IMD has already alerted & updating daily. TC pic.twitter.com/lcNrgVDoeU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2025
पावसामुळे मोठं नुकसान
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्याला तर पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली असून, शेतकरी हवालदिल झाली आहेत, नद्यांना आलेल्या पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक जण गावातच अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन, नुकसानाचा आढावा घेतला.
