AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Alert | साताऱ्यात काश्मीरसारख्या गारा; पुणे, सांगली, बीडमध्ये अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राज्यात सातारा, नंदुरबार, सांगली, पिंपरी चिंचवड, जळगाव, पुणे, धुळे या भागात अवकाळी पाऊस पडला आहे. (maharashtra rain update)

Maharashtra Weather Alert | साताऱ्यात काश्मीरसारख्या गारा; पुणे, सांगली, बीडमध्ये अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
प्रतिकात्मक छायाचित्र
| Updated on: Apr 14, 2021 | 7:53 PM
Share

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. उन्हाच्या झळा लागत असताना अचनक वातावरणातील हे बदल नागरिकांना सुखावह वाटत आहेत. सध्याच्या वातावरणाकडे पाहून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुंबई हवामान खात्याने तसा अंदाजसुद्धा वर्तवला होता. सातारा, नंदुरबार, सांगली, पिंपरी चिंचवड, जळगाव, पुणे, धुळे या भागात  वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. हा अंदाज आता खरा ठरला आहे. राज्याच्या अनेक भगात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारा पडल्या आहेत.  (Maharashtra rain update rain with thunder and lightning in Pune Satara Nandurbar Sangli Beed Washim Pune)

सांगलीमध्ये आटपाडी परिसरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस

सांगलीचा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीच्या झरे परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. या परिसरात सकाळपासूनच गर्मी जाणवत होती. उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे येथे अंगातून प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास येथे जोराचा वारा सुरू झाला. त्यानंतर विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारण अर्धा ते पाऊण तास हा पाऊस होता. या अवकाळी पावसामुळे येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बीडमध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस

बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, वडवणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर यामध्ये माजलगाव, गेवराई तालुक्यात काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. या गारपीटीमुळे आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मालेगाव रिसोड, तसेच ग्रामीण भागात जोरदार पावसासह मध्यम स्वरूपाची गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचंसुद्धा नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुणे, शिरूर येथे अवकाळी पाऊस

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. या पावसामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यामध्ये काही प्रमाणात गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला असून काढणीला आलेला कांदा, गहू यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

साताऱ्यात काठी ठिकाणी गारांचा पाऊस

सातारा जिल्ह्यातील काही भागात आज गारांचा तुफान पाऊस झाला. या पावसानंतर सातारा जिल्ह्याीतील काही ठिकाणचे रस्ते बर्फाने भरून गेले होते. वाठार रेल्वेस्टेशन परिसरात तर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर बर्फ साचला होता. गारांच्या तुफान पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः गारा जमा झाल्यामुळ टरबूज, खरबूज, आंबा तसेच इतर फळबागांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Lockdown update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?

(Maharashtra rain update rain with thunder and lightning in Pune Satara Nandurbar Sangli Beed Washim Pune)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....