AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचे 99 जागांवर ‘वेट अँड वॉच’, वाद की एकमेकांच्या उमेदवारांची प्रतिक्षा काय आहे कारण?

maharashtra assembly election 2024: राज्यातील ३६ मतदार संघात 'पहले आप'साठी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाही. एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतिक्षा महाविकास आघाडी आणि महायुती करणार आहे. या ३६ पैकी १३ जागा विदर्भातील आहेत.

महायुतीचे 99 जागांवर 'वेट अँड वॉच', वाद की एकमेकांच्या उमेदवारांची प्रतिक्षा काय आहे कारण?
mahayuti
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 26, 2024 | 10:36 AM
Share

maharashtra assembly election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवस शिल्लक आहे. त्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झालेले नाही. महायुतीने उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली. लोकसभेतील अनुभवापासून धडा घेऊन महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर अजून महायुतीचे 99 जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाही. त्यातील काही जागांवर अजूनही तिन्ही पक्षांत चर्चा सुरु आहे. तसेच काही ठिकाणी महाविकास आघाडी कोणाला उमेदवार देणार? हे ठरल्यावर जागा वाटप करणार आहे.

मुंबईतील या जागांवर उमेदवार नाही

मुंबईतील अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार अजूनही जाहीर झाले नाही. त्यात वरळी, शिवडी, चेंबूर, बोरिवली, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, अंधेरी पूर्व, वर्सोवा, मुंबादेवी, कलिना, धारावी या मतदार संघाचा समावेश आहे. राज्यातील ३६ मतदार संघात ‘पहले आप’साठी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाही. एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतिक्षा महाविकास आघाडी आणि महायुती करणार आहे. या ३६ पैकी १३ जागा विदर्भातील आहेत. मेळघाटचे विद्यामान आमदार बच्चू कडूंचा प्रहार पक्ष शिंदेसेनेसोबत आहे. परंतु त्यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाली नाही. ही जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

मविआमध्ये घोळ सुरुच

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ संपत नाही. आधी ८५ जागांचा फॉर्म्युला आल्यानंतर आता ९० जागांचे सूत्र समोर आले आहे. तिन्ही पक्ष मिळून २७० जागा लढवणार आहे. तसेच उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देण्यात येणार आहे.

मविआमध्ये वर्सोवा, भायखळा, रामटेक, परांडा, श्रीगोंदा, सांगोला या जागेवर वाद आहे. वर्सोवा आणि भायखळाची जागा काँग्रेसला हवी आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. रामटेकच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह काय आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा