AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा सोडा, विधानसभेला महायुती किती जागा जिंकणार?; काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांचं भाकीत काय?

mla shahaji bapu patil | जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटत असते. परंतु तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभा सोडा, विधानसभेला महायुती किती जागा जिंकणार?; काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांचं भाकीत काय?
shahaji bapu patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 06, 2024 | 12:06 PM
Share

रवी लव्हेकर, पुणे | दि. 6 मार्च 2024 : निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे असतात. मध्यप्रदेश, राजस्थान त्याचबरोबर तेलंगणातील बीआरएसचा सर्वे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक मतदानाला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन होत असते. आम्ही आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या त्रिमूर्तीच्या जोरावर जिंकणार आहे. आम्हाला या निवडणुकीत 225 च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा काय झाडी, काय डोंगर फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास

आमदार शहाजी बापू पाटील यांची विधाने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. ते पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना अनेक घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

संजय राऊत महाराष्ट्राचा खलनायक दुर्योधन

शाहजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्राचा खलनायक आहे. त्यांच्याकडे दुर्योधन म्हणून लोक पाहतात. त्यांच्या वक्तव्याकडे कोणी लक्ष देत नाही. जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटत असते. परंतु तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्या जागेवर संदीपान भुमरे उमेदवार असतील. त्यांचा त्या ठिकाणी विजय निश्चित असल्याचा दावा शहाजी बापू यांनी व्यक्त केला. निवडणूक सर्व्हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल