AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या कार्यक्रमस्थळी मोठा राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येऊन… वातावरण तापलं!

अयोध्येतील राम मंदिर देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या 'रामरक्षा' आंदोलनांतर्गत खासदार संजय राऊत यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथे भेट देऊन आंदोलन व रामरक्षा पठण केले. यावेळी मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या कार्यक्रमस्थळी मोठा राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येऊन... वातावरण तापलं!
Sanjay Raut Event RadaImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 6:15 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. अयोध्येतील राम मंदिर देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनांतर्गत खासदार संजय राऊत यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथे भेट देऊन आंदोलन व रामरक्षा पठण केले. मात्र या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मोरगावमध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातल्याचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या कार्यक्रमात राडा घालणारे लोक हे भाजपचे पदाधिकारी होते. आपल्या पक्षाचे अपयश लपवण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांचे आरोप आम्हाला मान्य नाहीयेत. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. आम्हाला राडा घालणाऱ्यांची नावे माहित नाहीत. आम्ही त्यांची पूर्णपणे माहिती घेऊ आणि तुम्हाला देऊ अशी माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमचा कार्यक्रम यशस्वी झाला हे त्यांना पहावलं नाही. त्यामुळे त्यांनी राडा घातला. त्यांचा पक्ष कोणताही असो, ते युतीचे लोक आहेत. संजय राऊत हे इथे आले असताना त्यांना कुणीतरी जाणून बुजून इथे पाठवलं आहे असा आरोपही या ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

1400 कोटी रुपये लुटले – संजय राऊत

रामरक्षा पठण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, राम मंदिरासाठी हजारो कार सेवकांनी बलिदान दिलं. आम्ही त्या आंदोलनात होतो. 1400 कोटी रुपये लुटले, कॅमेरा असतांनाही पैसे लुटले गेले. ज्या रामाने सत्ता दिली त्याच्याच मंदिरात चोरी करतात आणि आम्हाला म्हणतात हिंदुत्व सोडले. आमच्या सोबत उभे राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हे ढोंगी आहेत, आधी म्हणायचे देवाला घाबरले पाहिजे, पण आता देव यांना घाबरायला लागला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, यांचे हे पाहून राम पुन्हा वनवासात जाईल. मोदींच्या खात्यात साडे दहा हजार कोटी रुपये आहेत. बारामतीकरांनो जागे व्हा. बाळासाहेबांनी खरा राम मंदिर उभे केले. बाबरी पाडली तेव्हा भाजपवाले तेव्हा पळून गेले होते. त्यामुळे खऱ्या शिवसेनेला रामरक्षेचा हक्क आहे.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग