VIDEO : महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींचा दांडगा उत्साह, एकमेकांच्या उरावर चढून थिएटरमध्ये घुसले

मालेगावात भयानक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. चित्रपट बघण्यासाठी शेकडो लोकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली (major crowd at outside of Mohan Movie theater in Malegaon).

VIDEO : महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींचा दांडगा उत्साह, एकमेकांच्या उरावर चढून थिएटरमध्ये घुसले
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 3:52 PM

मालेगाव : राज्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तब्बल 25 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. मात्र, तरीदेखील ही बाब नागरिक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. मालेगावात तर भयानक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. चित्रपट बघण्यासाठी शेकडो लोकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली. या चित्रपटगृहाचे दरवाजे बंद होते. जेव्हा या चित्रपटगृहाचे दरवाजे उघडले तेव्हा शेकडो लोक युद्ध जिंकल्यासारखे चित्रपटगृहात शिरताना दिसले. काही तरुण तर एकमेकांच्या उरावर चढून थिएटरमध्ये जाताना दिसले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय (major crowd at outside of Mohan Movie theater in Malegaon).

व्हिडीओत नेमकं काय?

मालेगावात मोहन नावाच्या चित्रपटगृहाबाहेर लोकांनी आज मोठी गर्दी केली. या चित्रपटगृहात शिरण्यासाठी लोक प्रचंड उतावीळ झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता. याशिवाय लोकांमध्ये डिस्टन्स तर अजिबात नव्हते. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये मोहन टॉकीजच्या गेटजवळ तुफान गर्दी असते. असं असताना दोन तरुण चित्रपटगृहाचे दरवाजे उघडावीत म्हणून थेट लोखंडी दरवाजावर जाऊन चढतात. ते दरवाज्यावर इकडून तिकडे फिरत असतात. यावेळी लोकं जोरजोरात कोलाकल करतात.

थोड्या वेळाने चित्रपटगृहाचा दरवाजा उघडतो. त्यानंतर प्रचंड गदारोळ बघायला मिळतो. काही तरुण तर लोकांच्या खांद्यावर चढून आतमध्ये शिरायला जातात. त्या दृश्याकडे बघून ते लोक चित्रपटगृहात शिरत आहेत की लोकल ट्रेनमध्ये शिरत आहे? हेच नेमकं कळत नाही. या सर्व विचित्र प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (major crowd at outside of Mohan Movie theater in Malegaon).

व्हिडीओ बघा :

मालेगावात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

मालेगावात पुन्हा कोरोनाबाधितांचा संख्या दररोज वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिक तरीही निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. मालेगाव शहरात काल 184 कोरोनाबाधित आढळले होते. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात तब्बल 603 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना चित्रपटगृहाबाहेर अशा प्रकारची गर्दी होणे चिंतेची बाब आहे.

हेही वाचा :

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या

Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट?” अभिनेत्री जुई गडकरीचा संताप

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.