Malegaon bomb blast : साध्वी प्रज्ञा सिंगचं काय होणार? आज मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल, आतापर्यंत काय-काय घडलं? वाचा संपूर्ण प्रकरण
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉमस्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र जो हादरून गेला होता. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे हात होता अशी माहिती समोर आली होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर आहे.
मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला एटीएस आणि नंतर एनआयए कडे याचा तपास वर्ग करण्यात आला होता. 17 वर्षापासून मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वीच संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या सात जणांना एनआयएने मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केली होती. आता उद्या या खटल्याचा निकाल येण्याची शक्यता आहे. मालेगावसह संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.
मालेगाव शहराला हादरवणाऱ्या या बॉम्बस्फोटात लियाकत शेख यांनी आपली 10 वर्षीय मुलगी गमावली होती. ही मुलगी भिक्खू चौकात वडापाव आणण्यासाठी गेली होती, मात्र ती परतली नाही. बॉम्बस्फोट झाला हे कळलं पण आपली मुलगी घरी परत येईल अशी आशा लियाकत शेख यांना होती. मात्र थोड्याच वेळात दुसरा निरोप आला की, मुलगी फरहिन त्यात मृत्युमुखी पडली. वडील म्हणून पत्नीसह ते मुलीला पहायला गेले, मात्र त्यांना मुलीला पाहू दिले नाही. सध्या या चिमुरडीचा एक छोटासा गोंडस फोटो लियाकत शेख यांच्याकडे आहे. तिला न्याय मिळेल अशी आशा लियाकत यांना आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय आहे ?
- तारीख – 29 सप्टेंबर 2008
- वेळ – रात्री 9.35, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला, रमजान महिन्यात
- एकूण स्फोट – एक
- ठिकाण – भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ
- मृत्यू – 6 ठार, 101 जखमी
- तपास – एटीएस आणि त्यानंतर एनआयए तपासात सामील
या लोकांवर आरोप
- अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग
- साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
- मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) (पुणे रहिवासी, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आणि शिकवण्याचा आरोप)
- समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर (पुणे येथील रहिवासी, बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य मिळवण्यास मदत केली)
- अजय उर्फ राजा राहिरकर (अभिनव भारतचे पुणे येथील कोषाध्यक्ष)
- लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (मुख्य कट्टरपंथी, गटाचे प्रेरक, आरडीएक्स मिळवण्यास मदत केली)
- स्वामी अमृतानंद देवतीर्थ (स्वयंघोषित शंकराचार्य, जम्मू-काश्मीरचे रहिवासी, कट रचणारा)
- सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर (ठाण्याचे रहिवासी, त्याच्याकडे शस्त्रे सापडली असा दावा एटीएसने केला होता, तो कटात सहभागी होता)
सुटलेले आरोपी
- शिवनारायण कलसांगरा
- श्यामलाल साहू
- प्रवीण टाकळकी उर्फ मुतालिक
दोन वॉन्टेड आरोपी
- रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा (इंदूरचे रहिवासी, बॉम्ब पेरलेला)
- संदीप डांगे (इंदूरचे रहिवासी, बॉम्ब पेरलेला) (दोन्ही वॉन्टेड आरोपींचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्याच्या आधारे नोंदवले गेले आहे , मात्र तसा आरोप सिद्ध झालेला नाही )
आतापर्यंत काय घडलं?
- 29 सप्टेंबर 2008 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावातील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी.
- 4-5 नोव्हेंबर 2008 – लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित अटक
- 26-29 नोव्हेंबर 2008: 26/11 दहशतवादी हल्ले. मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपासनीस असलेले विशेष आयजीपी हेमंत करकरे यांनी आपले प्राण गमावले
- 20 जानेवारी 2009 : भारतीय दंड संहिता, मकोका आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटकांच्या पदार्थ कायदा ( substance act ) कलमांखाली 4,528 पानांचे आरोपपत्र दाखल
- 31 जुलै 2009 – मकोका आरोप 19 जुलै 2010 रोजी रद्द केले. मुंबई उच्च न्यायालयाने मकोका आरोप पुन्हा लावले
- डिसेंबर 2010 – या प्रकरणात एनआयएचा सहभाग
- 23 मे 2013 – एनआयएने मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
- 24 जुलै 2015 – तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी या प्रकरणात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला केला.
- 15 एप्रिल 2016 – एनआयएने म्हटले की ते बाजू घेत नाही किंवा विरोध करत नाही
- डिसेंबर 2016 – निलंबित पोलिस अधिकारी महिबूब मुजावर यांनी दावा केला की दोन फरार आरोपी रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे आहेत त्यांची हत्या केली. पोलिसांनी एनआयएने चौकशीचे आश्वासन दिले
- 25 एप्रिल 2017 – कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला , साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर
- 21 ऑगस्ट 2017 – सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
- 23 ऑगस्ट 2017 – कर्नल पुरोहित तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
- 27 डिसेंबर 2017 – कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द
- 30 ऑक्टोबर 2018 – सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
- 25 जुलै 2024 – एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू
- 19 एप्रिल 2025 – खटल्याच्या न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी पूर्वी 8 मे तारीख निश्चित केली होती. मात्र आता 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्ट निर्णय देणार आहे.
