AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरूणींनो, आंतरधर्मीय लग्न करणार असाल तर खरबरदार… सरकार सगळ्यात आधी तुमच्या घरी कळवणार!

आंतरधर्मीय लग्नासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय...

तरूणींनो, आंतरधर्मीय लग्न करणार असाल तर खरबरदार... सरकार सगळ्यात आधी तुमच्या घरी कळवणार!
रिसेप्शनपूर्वीच नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
| Updated on: Dec 15, 2022 | 10:51 AM
Share

मुंबई : जसाजसा काळ बदलत गेला तसंतसं आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण वाढीस लागलं. आता आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्न सर्रास होत आहेत. त्यामुळे जाती-जातींमधील, धर्मा-धर्मातील लोक जवळ यायला मदत होतेय. अनेकदा पळून जाऊन लग्न केली जातात. पण आता जर तुम्ही आंतरधर्मीय लग्न (Inter Religious Marriage) करण्याच्या तयारीत असाल तर सावधान… राज्य सरकारचा हा नवा निर्णय आधी वाचा…

एखाद्या मुलीने आंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. त्या तरूणीच्या घरी चौकशी करेन. त्या तरूणीची फसवणूक तर होत नाहीये ना? ती तिच्या मर्जीने लग्न करतेय ना… याची शहानिशा केली जाईल. पण अनेकदा या आंतरधर्मीय विवाहांना घरातून विरोध होतो, हेही तितकंच खरंय…

विशेष म्हणजे यात मुलाच्या घरी चौकशी केली जाणार नाहीये. त्यामुळे एकीकडे महिला सबलीकरणासाठी पावलं उचलली जात असताना राज्य सरकारचा हा निर्णय कितपत योग्य असा सवाल विरोधक विचारत आहेत.

आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर जर त्या तरूणीला काही त्रास झाला तर तिची मदत करण्याचं कामही सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.

राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती तयार केली जाणार आहे. ज्यात या आंतरधर्मीय लग्नांबाबत काम करेन.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर अशा घटना घडू नयेत म्हणून हा निर्णय घेतल्याचं राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.

सरकारच्या या निर्णयाला विरोध होतोय. सरकारचा हा निर्णय लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. लग्न ही वैयक्तिक बाब आहे. त्यात कुणीही हस्तक्षेप करता कामा नये. सरकार असा निर्णय घेत असेल तर हे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.