AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSMTवर मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला मोठा आदेश!

Manoj Jarange Patil Protest : जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. एकीकडे मुंबईत पाऊस चालू झाला आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. दरम्यान एकीकडे मुंबईत मराठा आंदोलन चालू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यस्था कायम राखली जावी म्हणून जरांगे यांनी मोठा आदेश दिला आहे. त्यांनी सीएसटीवरील मराठा आंदोलकांचा उल्लेख करून हा आदेश दिला आहे.

CSMTवर मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला मोठा आदेश!
manoj jarange patil and maratha reservation protest
| Updated on: Aug 29, 2025 | 2:56 PM
Share

Manoj Jarange Patil Mumbai Protest : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे आता मुंबईत पोहोचले असून त्यांनी आझाद मैदानात आपले आमरण उपोषणाचे आंदोलन चालू केले आहे. काहीही झालं तरी आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. एकीकडे मुंबईत पाऊस चालू झाला आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. दरम्यान एकीकडे मुंबईत मराठा आंदोलन चालू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यस्था कायम राखली जावी म्हणून जरांगे यांनी मोठा आदेश दिला आहे. त्यांनी सीएसटीवरील मराठा आंदोलकांचा उल्लेख करून हा आदेश दिला आहे.

फक्त 25 ते 30 माकडं आहेत, पण…

सीएसटीवर तसे पंचवीस ते तीस जण माकडं आहेत. त्यांच्यामुळे आपले लोक तिकडं अठरा किलोमीटरवर लोकं थांबले आहेत. इथं आंदोलनला दोन टक्केसुद्धा लोकं आलेले नाहीत. 98 टक्के लोक अजूनही मुंबईच्या बाहेर थांबलेले आहेत. त्या भंगार पोरांना शांता राहा असे सांगायला सरपंच सीएसटीवर गेले होते. मात्र ते पोरं सरंपंचांनाच उलटे बोलायला लागले आहेत. म्हणजेच ते मुलं आपल्यातले नाहीत. कारण सरपंच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आंदोलकांना ओळखतात. आपल्याला फिरून बोलत आहेत म्हणजे ते आंदोलनातले नाहीत, असे जरांगे संतापून म्हणाले. तसेच मी तुम्हाला गोडीत आरक्षण देतो, असे सांगत त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले.

जाम झालेली मुंबई मोकळी करा

सीएसएमटी स्थानकावरील मुलं कोणाच्या ओळखीचे आहे. सरकार आपल्याला सहकार्य करत आहे. मला उपोषणामुळे उद्यापासून बोलता येणार नाही. मला पुन्हा कोणाचा फोन येऊ देऊ नका. सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मुंबई जाम करणार असे बोललो होतो. आता सरकार सहकार्य करत आहे. त्यामुळे आता मुंबई जी जाम झाली आहे ती मोकळी करणे गरजेचे आहे, असे आवाहनही जरांगे यांनी आंदोलकांना केले.

सीएसटी स्थानकावर नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत जोरदार पाऊस चालू आहे. पाऊस चालू झाला तेव्हा काही मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात होते. त्यामुळे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून काही आंदोलक हे सीएसएमटी स्थानकात गेले. हळूहळू येथील गर्दी वाढत गेली. गर्दी वाढल्यानंतर काही आंदोलकांनी या भागात पाटील-पाटील नावाच्या घोषणा दिल्या. तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थही त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागू नये, म्हणून सीएसटी स्थानकावरील परिस्थितीची माहिती लगेच जरांगे यांना देण्यात आली. तसेच जरांगे यांनीदेखील लगेच उपोषणस्थळावरूनच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना थांबवण्याच्या सूचना केल्या.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.