AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचा खास माणूस थेट पोलीस ठाण्यात, हत्येच्या कटानंतर सर्वात मोठी अपडेट समोर!

मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला, असा गंभीर आरोप केलेला आहे. असे असतानाच आता जरांगे यांचे जवळचे सहकारी पोलिसांकडे पोहोचले आहेत. जालन्यातून मोठी माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगेंचा खास माणूस थेट पोलीस ठाण्यात, हत्येच्या कटानंतर सर्वात मोठी अपडेट समोर!
manoj jarange Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 7:37 PM
Share

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे गेल्या काही दिवासांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी जरांगे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. तसेच मुंडे जरांगी यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देत आहेत. माझी आणि जरांगे यांची नार्को टेस्ट करा, खरं काय ते समोर येईल, असे थेट आव्हानच मुंडे यांनी दिले होते. मुंडेंचे हे आव्हान मनोज जरांगे यांनीदेखील स्वीकारलेले आहे. असे असतानाच आता जालना जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचा खास माणूस पोलीस ठाण्यात गेला आहे.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी असलेले किशोर मरकड हे जालन्याच्या पोलrस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यांनी आज (19 नोव्हेंबर) त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत मनोज जरांगे यांची सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी केली होती. याच मागणीसंदर्भात त्यांनी पोलिसांना एक अर्जही दिला आहे. 2 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी माझ्या हत्येच्या कटाप्रकरणी जो तपास आहे तो थंडावल्याची शंका उपस्थित केली होती.

किशोर मरकड पोलीस ठाण्यात

यासह जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरदेखील जोरदार टीका केली होती. मला पोलीस सुरक्षा नको, असंही मनोज जरांगे यांनी बोलून दाखवले होते. त्यानंतर आता जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जरांगे यांची पोलीस सुरक्षा काढावी अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंडे- जरांगे यांच्यात संघर्ष का पेटला?

मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मी खळबळजनक गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे, असा थेट आरोपच जरांगे यांनी केला होता. त्यासाठी काही कथित कॉल रेकॉर्डिंगची मदत जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळले होते. तसेच जरांगे यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयची चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, असेही त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले होते. अजूनही या दोन्ही नेत्यांमधील वाद संपलेला नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...