मोठी बातमी! हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का, आता पुढे काय होणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं आहे. जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत, मुख्य मागणी म्हणेज हैदराबाद गॅझट लागू करण्यात आलं आहे, सरकारने हैदरबाद गॅझेटचा जीआर काढला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाजामध्ये नाराजी दिसून येत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्ष द्या, ओबीसीमधून नको अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे, तर मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. दरम्यान हैदराबाज गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. मोठी बातमी समोर येत आहे.
मराठा समजाबाबत सरकारने जो निर्णय घेतला त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे, येत्या दोन ते तीन दिवसांत आम्ही कोर्टात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे, दरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्यास हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आणि मराठा समाजासाठी धक्का असणार आहे, कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर सरकार आपली बाजू कशा पद्धतीने मांडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय म्हणाले शेंडगे?
मराठा समाजाबद्दल सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाज नाराज आहे, दोन ते तीन दिवसांत आम्ही कोर्टात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ओबीसी समाजाला आवश्यक असणारी भूमिका घ्यावी. आज त्यांनी बैठक बोलावली आहे, पण या बैठकीला आम्हाला निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे वेगवेगळी भूमिका मांडण्यापेक्षा सर्व ओबीसी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षात असो एका व्यासपीठावर येऊन ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करावा, असं समाजाच्या वतीने त्यांना मी आवाहन करतो असं शेंडगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरंगे पाटील सरकारला आव्हान देत आहेत, पण मुळात या मागण्या मान्य होण्यासारख्या नाहीयेत, सरकार दबावाला बळी पडतंय, ते पडू नये अन्यथा ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर मोठे आंदोलन करेल याची सरकारने दखल घ्यावी, असा इशाराही यावेळी प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे.
