मनोज जरांगे पाटील खेळणार मोठा डाव, आणखी एक जात घेणार सोबत, 3 तारखेला जुळणार महासमीकरण?

आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मनोज जरांगे पाटील खेळणार मोठा डाव, आणखी एक जात घेणार सोबत, 3 तारखेला जुळणार महासमीकरण?
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 3:24 PM

आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू, आणि दलित नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, बौद्ध आणि मराठा समीकरण जुळलं आहे, आम्ही एकत्र आलो आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे आम्ही बंजारा आणि ओबीसी समजासोबत देखील चर्चा करणार आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. येत्या तीन तारखेला किती उमेदवार रिंगणात उतरवायचे, कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे याबाबत निर्णय होईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुस्लीम, दलित आणि मराठा समाजासोबत बंजारा समाज देखील जरांगे पाटलांना साथ देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

आज बौद्ध आणि मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये समीकरण जुळलं आहे. मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले आहेत. आता बंजारा आणि ओबीसी समाजासोबत देखील चर्चा करणार आहे. आम्ही लोकशाही मार्गानं निवडणूक लढवणार आहोत. कोणाची दादागिरी, गुंडगिरी  चालू देणार नाही. आता गुलामगिरीमध्ये आयुष्य जगायचं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

उमेदवारांचा निर्णय तीन नोव्हेंबरला 

दरम्यान आता मराठा, मुस्लीम आणि दलित समीकरण जुळलं आहे, त्यानंतर आता कोणत्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोण-कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची? याबाबतचा निर्णय येत्या तीन नोव्हेंबरला घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता तीन नोव्हेंबरला काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....