AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा आणि कुणबी वेगळे, असं आरक्षण देताच येत नाही’; मराठा आरक्षणावर काय म्हणाले छगन भुजबळ?

मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मराठा आणि कुणबी वेगळे, असं आरक्षण देताच येत नाही'; मराठा आरक्षणावर काय म्हणाले छगन भुजबळ?
Chhagan-Bhujbal-
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 02, 2025 | 9:47 PM
Share

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा जीआर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि कुणबी वेगळे, असं आरक्षण देताच येत नाही असं भुजबळ म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले छगन भुजबळ?

मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याने ते आता ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा व कुणबी हे दोन समाज वेगळे आहे, या वेगळ्या जाती आहेत असं मुंबई उच्च न्यायलयाने म्हटलं आहे. तसेच या दोन्ही जातींना एकत्र मानणं हे सामाजिक मूर्खपणा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे एकत्र येऊ शकत नाही असं म्हटलं आहे. कुठलाही मुख्यमंत्री आणि मंत्री असं आरक्षण देऊ शकत नाही. 1993 नंतर आयोग ही संकल्पना देशात रुजू झाल्यानंतर तुम्हाला यासाठी आयोगाकडे जावे लागते असं भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षण संपलं – लक्ष्मण हाके

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हाके म्हणाले की, हा जीआर संविधान विरोधी आहे, ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आलेलं आहे. सरकार हतबल होतं, हतबलते पुढे ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्याचं कामं सरकारने केलं आहे. या जीआरला स्टे लावणं, PIL दाखलं करणं गरजेचं आहे. आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहोत.

पुढे बोलताना हाके म्हणाले की, ओबीसींनो गावगाड्यात तुम्ही दुय्यम आहात, मागास आहात. सरपंच होण्याचा तुमचा मार्ग संपलेला आहे. सरकारने संविधान विरोधी निर्णय घेतलाय. उद्या गावातून आपल्याला हुसकवून लावलं जाईल. ओबीसींनो जर तुम्ही एकजूट नाही झाला, तर इथून पुढच्या काळात गावच्या चावडीवर येऊन गप्पा मारण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार राहणार नाही. पुन्हा गुलामगिरीत जा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा. तुम्हाला माझ्या शुभेच्छा.’

Follow Us
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना