AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, युवा मुलांच्या मनात..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. मात्र, आंदोलक हे मुंबईमध्ये काही भागात ठिय्या करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी काल गेल्या असताना त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, युवा मुलांच्या मनात..
Supriya Sule
| Updated on: Sep 01, 2025 | 11:24 AM
Share

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना त्यांना एक वाईट अनुभव आला. मराठा समाजाचा आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी केली. यासोबतच मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे काही आंदोलकांनी म्हटले. ज्यावेळी सुप्रिया सुळे यांना गाडीमध्येही आंदोलक बसू देत नव्हते. हेच नाही तर विरोधात घोषणाबाजी करत थेट त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल्स देखील फेकण्यात आल्या. आता यावर सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, एखादी अशी गोष्ट घडने ठिक आहे. तरूण मुले आहेत, त्यांच्या काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल तिथे गेले. युवा मुलांच्या मनात काही भावना असतात. पाटलांची तब्येत खराब झाली होती, मी तिथे केले. थोडक्यात चर्चा झाली. माझी राज्याच्या सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की, आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले पाहिजे.

पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी लाईट नाहीये, आंदोलकांची गैरसोय होत आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, 2018 मध्ये फडणवीसांनी जो मार्ग आरक्षणाचा सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा. आम्हाला छोटे छोटे पक्ष म्हणून हिणवले जात होते, अडीचशे आमदार तीनशे खासदार असलेला पक्ष परत शरद पवारांकडेच वळतो म्हणजे कमाल आहे. सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे.

या सगळ्यांचा केंद्रबिंदू ज्यांचे आमदार खासदार जास्त आहेत हे सगळे महायुतीकडेच आहे. अपेक्षा सगळे शरद पवार यांच्याकडे आहे ही गंमत आहे. आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा. अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.

आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा. गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे, जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का आणि काल जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले आहे. सरकारकडून अजून कोणीही गेले नाही ,पोलिस कोणी गेले नाही, अतिशय अस्वच्छता आहे, सरकार ऐकत नसेल पण काही अधिकारी काम करत आहेत.मुंबईकरांना वेठीस धरले जाते तर चर्चेला बसा. भुजबळ साहेब यांना का उतरावे लागते आहे,न्यायासाठी उतरवा लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.