मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन, दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव, तर टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अध्यादेश काढण्याची क्रांती मोर्चाची मागणी आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन, दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव, तर टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे. कोल्हापुरात मराठा आंदोलक मुंबई आणि पुण्याला येणारा दूध पुरवठा रोखणार आहेत, तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे. (Maratha Kranti Morcha protest for Maratha Reservation)

औरंगाबादेत ढोल बजाव

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा आज ढोल बजाव आंदोलन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दोन्ही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ढोल वाजवणार आहेत. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अध्यादेश काढण्याची क्रांती मोर्चाची मागणी आहे.

मुंबई-पुण्याकडे जाणारा दूध पुरवठा रोखणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. गोकुळमधून रोज पुण्यासाठी 15 टँकर, तर मुंबईसाठी 35 टँकर दूधपुरवठा होतो. हा सर्व दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न आंदोलक करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघ कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राजेश टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अशोक चव्हाणांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त

दुसरीकडे, नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. (Maratha Kranti Morcha protest for Maratha Reservation)

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षण : आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाही : फडणवीस

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरच घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी

(Maratha Kranti Morcha protest for Maratha Reservation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *