AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठ्याकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण द्यायचं नाही, मग मी तुम्हाला छगन भुजबळकडे..काढा त्याची..मनोज जरांगे यांचं ओपन चॅलेंज

Manoj jarange patil : "विदर्भातल्या मराठ्याला तुम्ही आरक्षण दिल ते शेती करतात म्हणून. व्यवसायावर आधारीत, मग आमच्याकडे समुद्र आहे का? काय निकष कळला नाही तुमचा" असं मनोज जरांगे पाटील बोलले.

मराठ्याकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण द्यायचं नाही, मग मी तुम्हाला छगन भुजबळकडे..काढा त्याची..मनोज जरांगे यांचं ओपन चॅलेंज
Manoj jarange patil
| Updated on: May 22, 2026 | 12:03 PM
Share

“मी दादा आपल्याला हेच सांगायलया आलोय की, या गोष्टी छोट्या नाहीत. मी तुझ्याकडे का आलो? भाऊ म्हणून आलो. या गोष्टी थांबल्या असतील तर का थांबल्या आहेत? मी गंगाधरशी बोलल्यानंतर तो मला म्हणाला की, दादांच्या मनात सात-आठ विषय आहेत. मी म्हटलं मी येऊन बोलतो” असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. “आपण या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही मोठ्या मनाने जीआर काढला. ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या. आंदोलन सुरु असताना 26 जाती घातल्या. आंदोलन आमचं, जाती घालता त्यांच्या, ज्या बसत नाहीत. कोण गरीब आहेत? आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

“गरीब म्हणून निकष लावला का? तसं असेल तर आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचं नाही का?. असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळकडे कारखाने दाखवतो. काढा त्याची जात बाहेर” असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.

काढा जात बाहेर

“तो निकष असेल, मराठे श्रीमंत आहेत, यांना द्यायचं नाही. यांच्याकडे साखर कारखाने, शाळा आहेत. मी छगन भुजबळचा कारखाना दाखवतो. काढा त्याची जात बाहेर?. तो तुमचा निकष असेल तर. तुम्हाला वाटत असेल मराठ्यांकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण नाही. मी तुम्हाला परळीला पेट्रोल पंप दाखवतो. काढा जात बाहेर. काय आहे तुमचा आरक्षणाचा निकष. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळत नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

मग आमच्याकडे समुद्र आहे का?

“व्यवसायावर आधारित तुम्ही आरक्षण दिलं. असा जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम, निकष असेल, तर त्यांना मागास सिद्ध केलय. विदर्भातल्या मराठ्याला तुम्ही आरक्षण दिल ते शेती करतात म्हणून. व्यवसायावर आधारीत, मग आमच्याकडे समुद्र आहे का? काय निकष कळला नाही तुमचा” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

तरी आरक्षण मिळालं नाही

त्यावर प्रसाद लाड म्हणाले की, ‘दादा याच विषयावर मराठा समाज कसा मागास झाला? यावर संभागृहात माझं भाषण आहे’ त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “गायकवाड कमिशन, नारायण राणे साहेबांच्या समितीने सिद्ध केलय तरी आरक्षण मिळालं नाही”

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ