AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांच्यासमोरच सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ३० मे पासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी भेटीत आंदोलन न करण्याची विनंती केली असतानाही, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मागील लाठीचार्जच्या घटनेवरून त्यांनी सरकार आणि प्रसाद लाड यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली, तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Manoj Jarange Patil : आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांच्यासमोरच सवाल
मनोज जरांगे पाटील यांचा खडा सवाल
| Updated on: May 22, 2026 | 11:51 AM
Share

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असन 30 मेच्या तारखेची घोषणाही केली. मराठा समाज आणि मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या मान्य न झाल्याने ते पुन्हा आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाबद्दल घोषणा केली. मात्र त्यापूर्वी अनेक मोठ्या घडामोडींना वेग आला असून भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज अंतरवली सराटीत पोहोचले. त्यांनी जरांगे यांच्याशी संवाद सआदत उपोषण न करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली. मागील आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरूनही जरांगे यांनी खडेबोल सुनावले. “ तुमची आई खरंच आमची आई आहे, इतकी संस्कृती सोडलेले आम्ही लोकं नाहीयोत. पण ज्या दिवशी आमच्या आईला माराल,आम्ही त्यांच्या आईवर का बोलू नये  ? ” असा खडा सवाल जरांगे यांनी विचारला.

म्हणून ते शब्द बोलले गेले..

” त्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं?  त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता हो. तुमचीच आई आहे. मी तर उपोषणात होतो. उपोषणात कसेही शब्द जातील, पण उपोषणाच्या बाहेर असे शब्द वापरले असतील तर दाखवा. उपोषण ही अशी विचित्र चीज आहे की माणसाला काहीच दिसत नाही. इतकी भयंकर स्थिती आहे.  त्यांना इतक मारलं, बरं पाणी पाजावं ना, पोलिसांना पण आई असेलच ना. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने मारलं होतं त्यांना. तुम्ही हे सहन करून दाखवला का ? “असा सवाल जरांगे यांनी विचारला.  तिला मारलं, गोळ्या घातल्या, नाक तुटून गेलं, कान तुटून गेलं, अशा शब्दांत जरांगे यांनी त्या परिस्थितीचं वर्णन केलं.

आणि मुख्यमंत्री म्हणतात माझे पोलिस आहेत, माझ्या लोकांना मारलं. जनता तुमची नाही का ? असा सवाल विचारत , म्हणून ते शब्द बोलले गेले, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

तुमच्या मंडळी आमच्या ताई आहेत, जर आत्ता फोन आला की त्यांना कोणी मारलं म्हणून, तुम्ही अंतरवालीत बसून रहाल का  ? आणि आम्हीही ते सहन करू शकणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात माझ्या पोलिसांना हाणलं, फक्त तुमचे पोलिस आहेत का ? तेव्हापासून त्यांच्याविषयीचं आमचं मन बदललं, असंही जरांगे म्हणाले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ