AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीआरमधील तो शब्द… हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती येताच मनोज जरांगे आक्रमक, गंभीर आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण संपवल्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, काही राजकीय टीकांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जीआरमधील तो शब्द... हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती येताच मनोज जरांगे आक्रमक, गंभीर आरोप काय?
manoj jarange
| Updated on: Sep 03, 2025 | 1:08 PM
Share

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय चांगलाच गाजताना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन केले. या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या ठेवल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील एक गंभीर आरोप केला आहे.

हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल येत असलेल्या विविध जीआरवरुन होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, त्यांना ज्या गॅझेटवर राजकारण करायचं होतं. ज्याच्यावर ते आपलं जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं आहे. हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत. कोणताही निर्णय झाला की मराठा समाजाला वाटतं की हे करायला नको होतं, यानंतर ८-१५ दिवसांनी वाटतं की पाटलांनी केलं तेच बरोबर केलं, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे

मी जे काही करतोय ते मराठा बांधवांसाठी करतोय. ज्याच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी आता आपण गॅझेटचा वापर करतोय. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि आमचं भलं होणार नाही. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत. मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे. कोणी काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मंत्रिमंडळातील लोकांना स्पष्ट केले आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

एखाद्या शब्दात घोळ झाला असेल तर…

मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडायचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर गरीब मराठ्यांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका. मी तुमचं वाटोळं करणार नाही. तसं करायचं असतं तर एवढं केलं नसतं. मात्र माझ्यावरील तुमचा विश्वास ढळू देऊ नका. जर जीआरमधील एखाद्या शब्दात घोळ झाला असेल तर ते बदलण्याचा शब्द सरकारने दिला आहे. पण मराठवाड्यातील मराठे ओबीसीत गेले बाकी कोणाला काय समजायचं ते समजा. मराठ्यातील काही लोकं सोशल मीडियावर काहीतरी दिशाभूल करत आहेत. जे विरोधात बोलत आहेत त्यांनी 70 वर्षात काही दिले नाही. मी किमान समाजाला काहीतरी दिले, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...