AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणाचा तिढा, रामदास आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला; म्हणाले- ओबीसीच्या नोंदी नसलेल्या…

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केले आहे. तसेच दुष्काळावरही बोलले आहेत. राज्य सरकारने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. […]

मराठा आरक्षणाचा तिढा, रामदास आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला; म्हणाले- ओबीसीच्या नोंदी नसलेल्या...
| Updated on: Oct 03, 2026 | 10:09 PM
Share

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केले आहे. तसेच दुष्काळावरही बोलले आहेत.

राज्य सरकारने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामुळे दुष्काळग्रस्तांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार, असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगतानाच आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही रामदास आठवले यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ते म्हणाले की, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र संपूर्ण मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देता येणार नाही. ज्या मराठा कुटुंबांच्या जुन्या नोंदी ओबीसीशी संबंधित आहेत, त्यांना उपलब्ध नोंदी आणि कायदेशीर पात्रतेच्या आधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. तर ओबीसीच्या नोंदी नसलेल्या गरीब मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेलाही त्यांनी समर्थन दिलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचा संदर्भ देताना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याचं रामदास आठवले यांनी नमूद केलं. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. यानंतर त्यांनी अभिजीत दिपकेंवर जोरदार टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना डॉ. बी. आर. आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ‘बेजबाबदार’ आणि ‘अनादरपूर्ण’ वक्तव्ये करण्याविरोधात इशारा दिला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आंबेडकरांना प्रसिद्धी मिळवून देण्यास मदत केली. या अभिजीत दीपकेंच्या विधानावर रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर