दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा कारवाई, नाशिक पालिका आयुक्तांच्या निर्णयाचं सर्वपक्षीयांकडून स्वागत

नाशिक शहरातील दुकानांवर मराठी पाट्या दिसल्याच पाहिजेत, असे आदेश पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहेत. Marathi Language Board Compulsory In nashik

दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा कारवाई, नाशिक पालिका आयुक्तांच्या निर्णयाचं सर्वपक्षीयांकडून स्वागत
नाशिक पालिका आयुक्त कैलास जाधव


मुंबई :  नाशिक पालिका आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील दुकानांवर मराठी पाट्या दिसल्याच पाहिजेत, असे आदेश नाशिक पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहेत. (Marathi Language Board Compulsory In nashik palika Commissioner kailas Jadhav Decision)

आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार मराठी पाट्या न लावणाऱ्या 53 हजार दुकानांना नाशिक महापालिका नोटीस बजावणार आहे. या नोटीसीमधून मराठी पाटी का लावली नाही, असा प्रश्न विचारण्यात आलाय.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतेलल्या निर्णयाचं सर्वपक्षीयांकडून स्वागत देखील करण्यात आलं आहे. दुकानांना अन्य भाषेतील फलक दिसल्यास थेट कारवाईचे प्रशासनाला आदेश देण्यात आलेत.

उर्दू , इंग्रजी अथवा अन्य भाषेतील फलक लावल्यास शासन नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तसे अधिकार महापालिकेला दिलेले आहेत. आयुक्त कैलास जाधव यांच्या भूमिकेचं मनसे आणि शिवसेनेकडून स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 नुसार नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या विविध आस्थापनांनी मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. त्यातच प्रत्येक आस्थापनांच्या नावाची पाटी मराठीत असली पाहिजे. जर मराठीत पाटी नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच पालिका आयुक्तांनी दिला आहे.

(Marathi Language Board Compulsory In nashik palika Commissioner kailas Jadhav Decision)

हे ही वाचा :

झेरॉक्सचे पैसे तातडीने भागवा, असीम सरोदेंची ED ला नोटीस!

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI