सोलापूर महापालिकेचे डॉक्टर संपावर, पगार कपात केल्यानं कामबंद आंदोलनाला सुरुवात

2 जुलैच्या आयुक्तांच्या आदेशानुसार महिना 30 हजार इतके मानधन देण्याचा आदेश दिला गेला. हा आदेश अमान्य करत पूर्वी ठरल्याप्रमाणे 40 हजार मानधन देण्याची मागणी करत आज वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. त्यांनी पालिका आवारात ठिय्या आंदोलनास सुरवात केलीय.

सोलापूर महापालिकेचे डॉक्टर संपावर, पगार कपात केल्यानं कामबंद आंदोलनाला सुरुवात
सोलापूर महापालिका डॉक्टरांचं आंदोलन
रोहित पाटील

| Edited By: सागर जोशी

Jul 06, 2021 | 2:50 PM

सोलापूर : कोरोना संकटाच्या काळात BAMS, BUMS, BHMS, BDS वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती महापालिकेने विविध ठिकाणी केली होती. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना महापौर यांच्या आदेशाने 28 एप्रिल रोजी महिना 40 हजार इतके मानधन द्यायचे ठरले होते. मात्र 2 जुलैच्या आयुक्तांच्या आदेशानुसार महिना 30 हजार इतके मानधन देण्याचा आदेश दिला गेला. हा आदेश अमान्य करत पूर्वी ठरल्याप्रमाणे 40 हजार मानधन देण्याची मागणी करत आज वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. त्यांनी पालिका आवारात ठिय्या आंदोलनास सुरवात केलीय. (Medical officers of Solapur Municipal Corporation go on strike)

महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचा पुनर्विचार न झाल्यास आम्ही सर्व BAMS, BUMS, BHMS, BDS वैद्यकीय अधिकारी 6 जुलै पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वी दिला होता. मात्र, आद्याप आमच्या मागणीबाबत कोणत्याही विचार न करता आमची मानसिक पिळवणूक प्रशासनाने थांबवावी अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे.

आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला यश

राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 23 जून रोजी मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होतं. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी केली. त्यानंतर 24 जूनपासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर रुजू झाल्या.

मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा

राजेश टोपे यांनी निर्णय जाहीर करण्याच्या सुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतलाय. त्याचा राज्यातील 68 हजार 297 आशा सेविका आणि 3 हजार 570 गट प्रवर्तक यांना लाभ होणार आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | रेशन कार्डवरुन वाद, नायब तहसीलदारांना महिलेची कार्यालयातच मारहाण

बालकांना दिव्यांगमुक्त करण्याचा ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचा निर्धार, एकनाथ शिंदेंच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

Medical officers of Solapur Municipal Corporation go on strike

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें